अल्पारंभ
-
२२ जुलै : पाय सन्निकटन दिवस
– (अल्पारंभ फाऊंडेशन संचलित ‘कापरेकर कॉर्नर’ या उपक्रमाशी निगडीत ही पोस्ट!) २२ जुलै या दिवसाचे गणितीय दिनविशेष काय आहे तुम्हाला माहिती आहे का ? वर्तुळाचे क्षेत्रफळ किंवा परीघ काढण्यासाठी आपण π चा वापर करतो ज्याची किंमत आपण २२ / ७ किंवा ३.१४ अशी घेतो. कोणत्याही वर्तुळाचा परिघ ÷ व्यास = π हेही आपल्याला माहित आहे.… Continue reading
-
आव्हान कोलॅत्झ अटकळीचे : डॉ.विवेक पाटकर
– (अल्पारंभ फाऊंडेशन संचलित ‘कापरेकर कॉर्नर’ या उपक्रमाशी निगडीत ही पोस्ट!) अचूकता आणि निश्चितता यावर भर देणारा गणित हा विषय त्यातील अटकळींसाठीही प्रसिद्ध आहे. म्हणजे काही गणिती निष्कर्षांचे मर्यादित स्वरुपातील कल लक्षात घेऊन ते व्यापकपणे मान्य करता येतील असा अंदाज वर्तवला जातो. त्यांची परिपूर्ण औपचारिक सिध्दता मात्र मिळालेली नसते. वरवर सहज दिसणारी १९३७ साली मांडलेली… Continue reading
-
कलाभान २ : संगीताचे डोळे म्हणजे कान !
– माझे आजोबा नाशिक क्षेत्रातील नामवंत संगीततज्ञ व गुरू पं प्रभाकर गोविंदशास्त्री दसककर. घरात नेहमीच त्यांच्या शिकवण्यांचे आवाज कानावर पडता पडता अनेक बंदिशी प्रत्यक्ष न बसता शिकायला मिळायच्या. ते त्यांच्या विद्यार्थ्यांना नेहमी “संगीत कानाने बघायला शिका.” असे सांगत असत. शिकण्याच्या पायऱ्यांमध्ये निरीक्षण, संस्कार, अनुभव, सराव असे अनेक पैलू आहेत. संगीत शिकण्याची पहिली पायरी म्हणजे ‘श्रवण’… Continue reading
-
थोर गणितज्ञ् कै. द. रा. कापरेकर यांचे स्मारक : गरज आणि उपयुक्तता
– (अल्पारंभ फाऊंडेशन संचलित ‘कापरेकर कॉर्नर’ या उपक्रमाशी निगडीत ही पोस्ट!) अलीकडे लोकसत्तामध्ये प्रसिद्ध झालेल्या स्लोव्हेनियाची राजधानी ल्युब्लियाना येथील शिक्षणव्यवस्थेवरील प्रवासलेखात एक अत्यंत महत्त्वाचा विचार मांडण्यात आला आहे. कोणत्याही देशाची खरी प्रगती केवळ रस्ते, पूल किंवा इमारतींमध्ये मोजली जात नाही; ती त्या देशाने आपल्या शिक्षकांना, संशोधकांना आणि ज्ञाननिर्मात्यांना दिलेल्या सन्मानातून दिसून येते. हा विचार वाचल्यानंतर… Continue reading
-
शोध वास्तवाचा :- भाग २: God’s Particle
– शोध वास्तवाचा भाग २: God’s Particle श्रीमद् भगवद्गीता :- अध्याय ९ श्लोक ४ मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना। मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्ववस्थितः॥ हे संपूर्ण जग माझ्या अव्यक्तमूर्तिने (अदृश्य रूपाने) व्यापले आहे. सर्व भूत माझ्यामध्ये स्थित आहेत, परंतु मी त्यांच्या मध्ये मर्यादित नाही. शोध वास्तवाचा भाग १ या लेखामध्ये आपण पाहिले की पदार्थाचे ९९% वस्तुमान… Continue reading
-
|| अथ योगानुशासनम् ||
– भारतीय जीवन शैली अतिशय निरामय आहे. फार पूर्वी म्हणजे पाच हजार वर्षांपूर्वी भारतीय ऋषी-मुनींनी हया जीवन शैलीचे वर्णन करून ठेवले आहे. महर्षी पातंजली मुनींनी हे ‘जीवनशैली ज्ञान’ सूत्रबद्ध करून समाजापुढे ठेवले आहे. यात एकूण १९५ सूत्रे आहेत, ज्यांची विभागणी चार पादात ( विभागात) केलेली आहे. पहिला पाद आहे समाधी पाद. त्यातील पहिले सूत्र आहे.… Continue reading
-
अधिक मास : समाजासाठी योगदान देण्याची अधिकची संधी !!
– “परोपकाराय पुण्याय, पापाय परपीडनम्” — दुसऱ्यांच्या हितासाठी केलेले कार्य हेच खरे पुण्य मानले गेले आहे. भारतीय संस्कृतीत दान, सेवा आणि समाजहित ही केवळ धार्मिक संकल्पना नसून जीवनमूल्ये आहेत. या मूल्यांचा अनुभव घेण्याची आणि प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याची सर्वोत्तम संधी म्हणजे अधिक मास, अर्थात पुरुषोत्तम मास. हिंदू पंचांगानुसार साधारणतः प्रत्येक बत्तीस महिन्यांनी येणारा अधिक मास हा… Continue reading
-
कलाभान १ : संगीताचे रसग्रहण
– मला एक रसिक भेटला होता त्याने सहजरित्या सांगितलं, “मला काही कळत नाही क्लासिकल, बॉलिवूड संगीत वगैरे. पण मला ऐकायला फार मजा येते. गाणं गाणं असतं ना कानाला मनाला जे शांतता देत उत्साह देत, थोडक्यात, भावना जागृत करत ते सर्व आवडत.” खरंच किती सोपं आहे. आणि खऱ्या निरागस संगीतप्रेमींच हे लक्षण आहे. ज्याला संगीत ऐकण्यापुरतं… Continue reading
-
डॉ. आनंद नाडकर्णी : विनम्र श्रद्धांजली.
– समाज घडविणारे प्रतिभावंत जेंव्हा ह्या जगाचा निरोप घेतात तेंव्हा एक मोठी पोकळी निर्माण होते. डाॅ.आनंद नाडकर्णी यांच्या जाण्याने ती पोकळी आज फार प्रकर्षाने जाणवत आहे. डॉ. आनंद नाडकर्णी यांचे व्यक्तिमत्त्व समजून घ्यायचे असेल, तर त्यांच्या वैद्यकीय कार्याइतकेच त्यांच्या संवादकलेचाही विचार करावा लागेल. कारण ते फक्त मानसोपचारतज्ज्ञ नव्हते. ते समाजमनाशी सतत संवाद साधणारे, माणसाच्या भावविश्वाला… Continue reading
-
भारतातील “तरूण” लोकसंखेचे “रुपेरी” आव्हान…
– भारत आज जगातील सर्वात मोठ्या तरूण लोकसंखेचा देश म्हणून ओळखला जातो. हीच तरूण लोकसंख्या देशाची सर्वात मोठी ताकद मानली जाते. मात्र, या ताकदीसोबत एक दीर्घकालीन वास्तव जोडलेले आहे—आजचा हा तरुण वर्ग पुढील दोन दशकांत मोठ्या प्रमाणावर ज्येष्ठ नागरिकांमध्ये रूपांतरित होणार आहे. त्यामुळे भारताच्या आरोग्य व्यवस्थेसमोर उभे राहणारे आव्हान हे केवळ व्यवस्थापनाचे नसून, ते सामाजिक,… Continue reading
Recent Posts
