।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन


अल्पारंभ

  • कलाभान ५ : रागदारीतील नियमबद्ध अनंतता

    – बारा स्वर, त्यांचे असंख्य कॉम्बिनेशन्स, धून, थाट, या सगळ्यामधून निसर्गाच्या अदृश्य सदृश्य संदेशांमधून स्फुरलेल्या स्वरावलींना नियमांमध्ये, स्वरसंगतींमध्ये गुंफत राग तयार झाले असावेत. वेगवेगळ्या संगीतप्रकारात, बारा स्वर ‘धुन’ स्वरूपात वास करतात. परंतु जेव्हा ही स्वरप्रधानता आणखी बारकाव्यांसकट थोडी पुढे जाऊन स्वरसंगतींमध्ये रचनाबद्ध होते तेव्हा राग तयार होतो. (Image Source: pinterest India) माझ्या गुरू प्रख्यात गायिका विदुषी… Continue reading

  • उपयुक्त अशी पावकी

    – (अल्पारंभ फाऊंडेशन संचलित ‘कापरेकर कॉर्नर’ या उपक्रमाशी निगडीत ही पोस्ट!) गणितातील अनेक गुणाकार काही सोप्या युक्त्यांच्या साहाय्याने तोंडी करता येतात. त्यापैकी पावकीचा पाढा अत्यंत उपयुक्त आहे. २५ ने किंवा २५ च्या जवळच्या संख्यांनी गुणाकार करताना या पाढ्याचा आधार घेतल्यास काही क्षणांत अचूक उत्तर मिळते. विद्यार्थ्यांनी ही पद्धत आत्मसात केली तर त्यांच्या तोंडी गणिताचा वेग… Continue reading

  • कलाभान ४ : रियाज – शारीरिक मानसिक भावनिक प्रवास

    – रियाजविषयी खूप कल्पना आणि अनुभवातून सिद्ध झालेली मते आहेत. कला म्हटलं की थेअरी, विचार, चिंतन, मनन या सगळ्याबरोबरच जोपर्यंत हे सर्व मनातून गळ्यात किंवा हातात उतरत नाही तोपर्यंत कलाकार घडत नाही. अथक वाचन, चिंतन, श्रवण करून व्यक्ती माहितगार, जाणकार रसिक, समीक्षक होऊच शकतो पण प्रत्यक्षात कलाकार होणे हे या सगळ्यांबरोबर अखंड शारीरिक मेहनत आणि… Continue reading

  • गणिताशी मैत्री ! श्रीनिवास रामानुजन आणि अंकांची अद्भुत दुनिया

    – या महिन्यात मैत्री दिन (Friendship Day) साजरा झाला. मित्र म्हणजे आनंद वाटून घेणारा आपला जिवलग साथीदार ! गणितातही काही संख्याही एकमेकांच्या “मित्र” असतात! त्यांच्या परस्पर संबंधांमुळे गणितज्ञांनी त्यांना “मैत्री अंक” (Amicable Numbers) असे नाव दिले आहे. त्याविषयी अल्पारंभ फाऊंडेशन संचलित ‘कापरेकर कॉर्नर’ या उपक्रमाशी निगडीत ही पोस्ट! भारतीय गणितविश्वातील तेजस्वी तारा श्रीनिवास रामानुजन यांना… Continue reading

  • कलाभान ३ : सर्वांगसुंदर रसिक

    – संगीत रसिक होण्यासाठी श्रवणाचे महत्व तर आपण जाणलेच, आता श्रवण म्हणजे नेमके काय आणि कसे करायचे यावर चिंतन करूया. अष्टपैलू गायक, वादक, संगीतकार हे आपण अनुभवलंय. मग चतुरस्त्र रसिक का नाही ? आपल्याला ही म्हण माहिती आहे, ‘जॅक ऑफ ऑल ट्रेड्स मास्टर ऑफ नन’ म्हणजे अनेक गोष्टींमध्ये पारंगत असणारी व्यक्ती कुठल्यातरी एका विषयातील सखोल… Continue reading

  • आपण थॉम्पसन आहोत की फिलिप्स?

    – मागील काही वर्षांत मुद्रण व्यवसायातील अनेक मित्रांशी संवाद साधताना एक गोष्ट माझ्या प्रकर्षाने लक्षात आली आहे. आपण व्यवसायाविषयी बोलतो त्यापेक्षा परिस्थितीविषयी अधिक बोलतो. आपल्या चर्चांमध्ये ग्राहक असतो, स्पर्धा असते, वाढते खर्च असतात, बदलणारे तंत्रज्ञान असते, कामगारांची समस्या असते, भाव न मिळण्याची खंत असते, एआय असते, कॅन्व्हा असते, डिजिटल माध्यमांचा प्रभाव असतो. हे सारे खरे… Continue reading

  • २२ जुलै : पाय सन्निकटन दिवस

    – (अल्पारंभ फाऊंडेशन संचलित ‘कापरेकर कॉर्नर’ या उपक्रमाशी निगडीत ही पोस्ट!) २२ जुलै या दिवसाचे गणितीय दिनविशेष काय आहे तुम्हाला माहिती आहे का ? वर्तुळाचे क्षेत्रफळ किंवा परीघ काढण्यासाठी आपण π चा वापर करतो ज्याची किंमत आपण २२ / ७ किंवा ३.१४ अशी घेतो. कोणत्याही वर्तुळाचा परिघ ÷ व्यास = π हेही आपल्याला माहित आहे.… Continue reading

  • आव्हान कोलॅत्झ अटकळीचे : डॉ.विवेक पाटकर

    – (अल्पारंभ फाऊंडेशन संचलित ‘कापरेकर कॉर्नर’ या उपक्रमाशी निगडीत ही पोस्ट!) अचूकता आणि निश्चितता यावर भर देणारा गणित हा विषय त्यातील अटकळींसाठीही प्रसिद्ध आहे. म्हणजे काही गणिती निष्कर्षांचे मर्यादित स्वरुपातील कल लक्षात घेऊन ते व्यापकपणे मान्य करता येतील असा अंदाज वर्तवला जातो. त्यांची परिपूर्ण औपचारिक सिध्दता मात्र मिळालेली नसते. वरवर सहज दिसणारी १९३७ साली मांडलेली… Continue reading

  • कलाभान २ : संगीताचे डोळे म्हणजे कान !

    – माझे आजोबा नाशिक क्षेत्रातील नामवंत संगीततज्ञ व गुरू पं प्रभाकर गोविंदशास्त्री दसककर. घरात नेहमीच त्यांच्या शिकवण्यांचे आवाज कानावर पडता पडता अनेक बंदिशी प्रत्यक्ष न बसता शिकायला मिळायच्या. ते त्यांच्या विद्यार्थ्यांना नेहमी “संगीत कानाने बघायला शिका.” असे सांगत असत. शिकण्याच्या पायऱ्यांमध्ये निरीक्षण, संस्कार, अनुभव, सराव असे अनेक पैलू आहेत. संगीत शिकण्याची पहिली पायरी म्हणजे ‘श्रवण’… Continue reading

  • थोर गणितज्ञ् कै. द. रा. कापरेकर यांचे स्मारक : गरज आणि उपयुक्तता

    – (अल्पारंभ फाऊंडेशन संचलित ‘कापरेकर कॉर्नर’ या उपक्रमाशी निगडीत ही पोस्ट!) अलीकडे लोकसत्तामध्ये प्रसिद्ध झालेल्या स्लोव्हेनियाची राजधानी ल्युब्लियाना येथील शिक्षणव्यवस्थेवरील प्रवासलेखात एक अत्यंत महत्त्वाचा विचार मांडण्यात आला आहे. कोणत्याही देशाची खरी प्रगती केवळ रस्ते, पूल किंवा इमारतींमध्ये मोजली जात नाही; ती त्या देशाने आपल्या शिक्षकांना, संशोधकांना आणि ज्ञाननिर्मात्यांना दिलेल्या सन्मानातून दिसून येते. हा विचार वाचल्यानंतर… Continue reading