।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन


ललित

  • कलाभान ४ : रियाज – शारीरिक मानसिक भावनिक प्रवास

    – रियाजविषयी खूप कल्पना आणि अनुभवातून सिद्ध झालेली मते आहेत. कला म्हटलं की थेअरी, विचार, चिंतन, मनन या सगळ्याबरोबरच जोपर्यंत हे सर्व मनातून गळ्यात किंवा हातात उतरत नाही तोपर्यंत कलाकार घडत नाही. अथक वाचन, चिंतन, श्रवण करून व्यक्ती माहितगार, जाणकार रसिक, समीक्षक होऊच शकतो पण प्रत्यक्षात कलाकार होणे हे या सगळ्यांबरोबर अखंड शारीरिक मेहनत आणि… Continue reading

  • कलाभान ३ : सर्वांगसुंदर रसिक

    – संगीत रसिक होण्यासाठी श्रवणाचे महत्व तर आपण जाणलेच, आता श्रवण म्हणजे नेमके काय आणि कसे करायचे यावर चिंतन करूया. अष्टपैलू गायक, वादक, संगीतकार हे आपण अनुभवलंय. मग चतुरस्त्र रसिक का नाही ? आपल्याला ही म्हण माहिती आहे, ‘जॅक ऑफ ऑल ट्रेड्स मास्टर ऑफ नन’ म्हणजे अनेक गोष्टींमध्ये पारंगत असणारी व्यक्ती कुठल्यातरी एका विषयातील सखोल… Continue reading

  • कलाभान २ : संगीताचे डोळे म्हणजे कान !

    – माझे आजोबा नाशिक क्षेत्रातील नामवंत संगीततज्ञ व गुरू पं प्रभाकर गोविंदशास्त्री दसककर. घरात नेहमीच त्यांच्या शिकवण्यांचे आवाज कानावर पडता पडता अनेक बंदिशी प्रत्यक्ष न बसता शिकायला मिळायच्या. ते त्यांच्या विद्यार्थ्यांना नेहमी “संगीत कानाने बघायला शिका.” असे सांगत असत. शिकण्याच्या पायऱ्यांमध्ये निरीक्षण, संस्कार, अनुभव, सराव असे अनेक पैलू आहेत. संगीत शिकण्याची पहिली पायरी म्हणजे ‘श्रवण’… Continue reading

  • शोध वास्तवाचा :- भाग २: God’s Particle

    – शोध वास्तवाचा भाग २: God’s Particle श्रीमद् भगवद्गीता :- अध्याय ९ श्लोक ४ मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना। मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्ववस्थितः॥ हे संपूर्ण जग माझ्या अव्यक्तमूर्तिने (अदृश्य रूपाने) व्यापले आहे. सर्व भूत माझ्यामध्ये स्थित आहेत, परंतु मी त्यांच्या मध्ये मर्यादित नाही. शोध वास्तवाचा भाग १ या लेखामध्ये आपण पाहिले की पदार्थाचे ९९% वस्तुमान… Continue reading

  • उत्तुंग झेपेसाठी सुसज्ज : हीरकमहोत्सवी.. मराठी विज्ञान परिषद

    – दिनांक १ मे १९६० रोजी स्थापन झालेल्या नव्या महाराष्ट्र राज्यात वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवण्यासाठी एक विशेष मंच विकसित करावा ही कल्पना श्री. म. ना. गोगटे (१९३२-२०२२) यांना स्फुरली. ते व्यवसायाने स्थापत्य अभियंता असले तरी, त्यांना अनेक विषयांत रस होता. जी भाषा लोकांना सहजपणे समजते त्या भाषेत विज्ञान सांगितले जावे हे धोरण त्यांनी ठरवले. समाजातील काही… Continue reading

  • कलाभान १ : संगीताचे रसग्रहण

    – मला एक रसिक भेटला होता त्याने सहजरित्या सांगितलं, “मला काही कळत नाही क्लासिकल, बॉलिवूड संगीत वगैरे. पण मला ऐकायला फार मजा येते. गाणं गाणं असतं ना कानाला मनाला जे शांतता देत उत्साह देत, थोडक्यात, भावना जागृत करत ते सर्व आवडत.” खरंच किती सोपं आहे. आणि खऱ्या निरागस संगीतप्रेमींच हे लक्षण आहे. ज्याला संगीत ऐकण्यापुरतं… Continue reading

  • भारतातील “तरूण” लोकसंखेचे “रुपेरी” आव्हान…

    – भारत आज जगातील सर्वात मोठ्या तरूण लोकसंखेचा देश म्हणून ओळखला जातो. हीच तरूण लोकसंख्या देशाची सर्वात मोठी ताकद मानली जाते. मात्र, या ताकदीसोबत एक दीर्घकालीन वास्तव जोडलेले आहे—आजचा हा तरुण वर्ग पुढील दोन दशकांत मोठ्या प्रमाणावर ज्येष्ठ नागरिकांमध्ये रूपांतरित होणार आहे. त्यामुळे भारताच्या आरोग्य व्यवस्थेसमोर उभे राहणारे आव्हान हे केवळ व्यवस्थापनाचे नसून, ते सामाजिक,… Continue reading

  • शोध वास्तवाचा :- भाग १: आदि शक्ती

    – “या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥” आपल्या सर्वांमध्ये, यत्र-तत्र-सर्वत्र, संपूर्ण सृष्टीत शक्तीच्या रूपाने वसणाऱ्या आदि शक्तीला माझा शतशः प्रणाम.   आपण बनलो कशापासून आहोत? आपल्या आजूबाजूला दिसणारे हे विश्व नेमके कशाने तयार झाले आहे? असे प्रश्न मानवाला खूप पूर्वीपासून पडत आले आहेत. साध्या भाषेत उत्तर द्यायचे झाले तर आपण म्हणतो—आपण… Continue reading

  • आत्महत्या… नसावा शेवटचा पर्याय !!

    – आत्महत्या घटनांबाबत जे घडतं , ते एखाद्या व्यक्तीपुरतं मर्यादित नाही.ते अस्वस्थ करून जातं, कारण ते आपल्या आजूबाजूच्या असंख्य ओळखीच्या चेहऱ्यांशी जोडलेलं आहे.आपल्या भोवती अनेक जण असतात —हसणारे, कामात रमलेले, यशस्वी दिसणारे, सुसंस्कृत, प्रेमळ.पण आत कुठेतरी, न दिसणाऱ्या पातळीवर,ते सतत एक युद्ध लढत असतात.त्या वेदना नेहमी मोठ्या नसतात.पण त्या एकट्याने सहन करण्याइतक्या मात्र नक्कीच असतात.… Continue reading

  • प्रवास – आत्मभानापासून ते आत्ममग्नेतेपर्यंतचा

    – विज्ञान, मानसशास्त्र, व समाजशास्त्र क्षेत्रात आत्मभान असणे हे चांगले लक्षण मानले आहे.. कारण आत्मभानाची व्याप्ती व्यक्ती पुरती सिमीत न राहाता ती कुटुंब, समाज आणि देशावर प्रभाव टाकते. आत्मभान, माणसाला एक डोळस आणि सकारात्मक दृष्टीकोन देतो. त्यात बेरजेचे किंबहुना गुणाकाराचे सामर्थ्य असते. त्यात जबाबदारीही असते. हे बाळकडू जर लहानपणापासून कुटुंबात आणि शाळेत मिळत गेले तर… Continue reading