सामाजिक
-
|| अथ योगानुशासनम् ||
– भारतीय जीवन शैली अतिशय निरामय आहे. फार पूर्वी म्हणजे पाच हजार वर्षांपूर्वी भारतीय ऋषी-मुनींनी हया जीवन शैलीचे वर्णन करून ठेवले आहे. महर्षी पातंजली मुनींनी हे ‘जीवनशैली ज्ञान’ सूत्रबद्ध करून समाजापुढे ठेवले आहे. यात एकूण १९५ सूत्रे आहेत, ज्यांची विभागणी चार पादात ( विभागात) केलेली आहे. पहिला पाद आहे समाधी पाद. त्यातील पहिले सूत्र आहे.… Continue reading
-
उत्तुंग झेपेसाठी सुसज्ज : हीरकमहोत्सवी.. मराठी विज्ञान परिषद
– दिनांक १ मे १९६० रोजी स्थापन झालेल्या नव्या महाराष्ट्र राज्यात वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवण्यासाठी एक विशेष मंच विकसित करावा ही कल्पना श्री. म. ना. गोगटे (१९३२-२०२२) यांना स्फुरली. ते व्यवसायाने स्थापत्य अभियंता असले तरी, त्यांना अनेक विषयांत रस होता. जी भाषा लोकांना सहजपणे समजते त्या भाषेत विज्ञान सांगितले जावे हे धोरण त्यांनी ठरवले. समाजातील काही… Continue reading
-
डॉ. आनंद नाडकर्णी : विनम्र श्रद्धांजली.
– समाज घडविणारे प्रतिभावंत जेंव्हा ह्या जगाचा निरोप घेतात तेंव्हा एक मोठी पोकळी निर्माण होते. डाॅ.आनंद नाडकर्णी यांच्या जाण्याने ती पोकळी आज फार प्रकर्षाने जाणवत आहे. डॉ. आनंद नाडकर्णी यांचे व्यक्तिमत्त्व समजून घ्यायचे असेल, तर त्यांच्या वैद्यकीय कार्याइतकेच त्यांच्या संवादकलेचाही विचार करावा लागेल. कारण ते फक्त मानसोपचारतज्ज्ञ नव्हते. ते समाजमनाशी सतत संवाद साधणारे, माणसाच्या भावविश्वाला… Continue reading
-
भारतातील “तरूण” लोकसंखेचे “रुपेरी” आव्हान…
– भारत आज जगातील सर्वात मोठ्या तरूण लोकसंखेचा देश म्हणून ओळखला जातो. हीच तरूण लोकसंख्या देशाची सर्वात मोठी ताकद मानली जाते. मात्र, या ताकदीसोबत एक दीर्घकालीन वास्तव जोडलेले आहे—आजचा हा तरुण वर्ग पुढील दोन दशकांत मोठ्या प्रमाणावर ज्येष्ठ नागरिकांमध्ये रूपांतरित होणार आहे. त्यामुळे भारताच्या आरोग्य व्यवस्थेसमोर उभे राहणारे आव्हान हे केवळ व्यवस्थापनाचे नसून, ते सामाजिक,… Continue reading
-
आत्महत्या… नसावा शेवटचा पर्याय !!
– आत्महत्या घटनांबाबत जे घडतं , ते एखाद्या व्यक्तीपुरतं मर्यादित नाही.ते अस्वस्थ करून जातं, कारण ते आपल्या आजूबाजूच्या असंख्य ओळखीच्या चेहऱ्यांशी जोडलेलं आहे.आपल्या भोवती अनेक जण असतात —हसणारे, कामात रमलेले, यशस्वी दिसणारे, सुसंस्कृत, प्रेमळ.पण आत कुठेतरी, न दिसणाऱ्या पातळीवर,ते सतत एक युद्ध लढत असतात.त्या वेदना नेहमी मोठ्या नसतात.पण त्या एकट्याने सहन करण्याइतक्या मात्र नक्कीच असतात.… Continue reading
-
प्रवास – आत्मभानापासून ते आत्ममग्नेतेपर्यंतचा
– विज्ञान, मानसशास्त्र, व समाजशास्त्र क्षेत्रात आत्मभान असणे हे चांगले लक्षण मानले आहे.. कारण आत्मभानाची व्याप्ती व्यक्ती पुरती सिमीत न राहाता ती कुटुंब, समाज आणि देशावर प्रभाव टाकते. आत्मभान, माणसाला एक डोळस आणि सकारात्मक दृष्टीकोन देतो. त्यात बेरजेचे किंबहुना गुणाकाराचे सामर्थ्य असते. त्यात जबाबदारीही असते. हे बाळकडू जर लहानपणापासून कुटुंबात आणि शाळेत मिळत गेले तर… Continue reading
Recent Posts
