अल्पारंभ
-
युद्धे व सशस्त्र संघर्ष: पर्यावरण एक मूक बळी
– आज अमेरिका,इस्त्रायल – इराण युद्ध असो की रशिया – युक्रेन युद्ध असो, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जिवितहानी, महत्त्वाच्या पायाभूत सुविधा आणि अनेकदा ऊर्जा प्रकल्पाचा नाश, शहरांचा नाश,देशाच्या अर्थव्यवस्थेचा ऱ्हास सोबतच, पर्यावरणीय धोके दिवसेंदिवस वाढतच आहे. हवा व जल प्रदूषण,व मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन निसर्गाला विनाशाकडे नेत आहे.या युद्धांमध्ये दोन्ही बाजूंचे लाखो सैनिक एकतर मृत्युमुखी पडले… Continue reading
-
वसंत चित्रलिपी
– दहावीची परीक्षा झाली आणि रेणू मामाकडे सुटीसाठी आली.दहावीचे वर्ष खूप अभ्यासात गेले होते. त्यामुळे नुसती मज्जा-मस्ती- खेळ खेळायचे, असे तिने ठरवले होते. खूप झोपायचे, मस्त जेवण करायचे आणि भरपूर फिरायचे हा तिचा प्लान होता. दुसऱ्या दिवशी सकाळी तिला जाग आली ती आरतीमुळे. मामी देवाची आरती, पूजा करीत होती. आवाजाच्या दिशेने तीची पावले देव घराकडे… Continue reading
-
तिचे अर्थभान …डॉ. रुपाली कुलकर्णी.
तिच्या अर्थभानावर बोलण्याआधी, आपल्या आजुबाजूला घडणारे ‘अर्था‘शी निगडीत काही प्रसंग आधी पाहुयात. समजा, श्री. चिंतामणी आपल्या कुटुंबासाठी काही आर्थिक गुंतवणूक करतात किंवा करणार आहेत. अशावेळी घरातील सौ.चिंतामणींशी ते कसे संवाद साधतात ते पाहुयात. प्रसंग १: शून्य संवाद ! सौ.चिंतामणींना आपल्या आर्थिक गुंतवणूकीविषयी घरात माहिती देण्यास अजिबात आवडत नाही किंवा तसे करण्याची त्यांना आवश्यकताही वाटत नाही. … Continue reading
-
कविता : तगमग
– तगमग…बघून शहरातली,धूर ,आवाजी दिवाळी,ह्रदयी काजळी,पसरे माझ्या! धूर, दणक्यात,त्यांना येते मजा,पर्यावरणा सजा,दुर्लक्षती ! कोंडला किती,पृथ्वीचा श्वास,प्राणिमात्रास त्रास,चालला रे ! बहुतेकांनी,बांधले हो डोळे,का असे हे सोहळे,चालले रे ! कोणा सांगणे – शिकवणे,झाले आहे व्यर्थ,आनंदाचा स्वार्थ,चोहीकडे ! शोध मग जीवा,असे शांत जग,जिथे नसे तगमग,कोणाचीही! -सौ. रुपाली दिपक कुलकर्णी Continue reading
-
प्रवास – आत्मभानापासून ते आत्ममग्नेतेपर्यंतचा
– विज्ञान, मानसशास्त्र, व समाजशास्त्र क्षेत्रात आत्मभान असणे हे चांगले लक्षण मानले आहे.. कारण आत्मभानाची व्याप्ती व्यक्ती पुरती सिमीत न राहाता ती कुटुंब, समाज आणि देशावर प्रभाव टाकते. आत्मभान, माणसाला एक डोळस आणि सकारात्मक दृष्टीकोन देतो. त्यात बेरजेचे किंबहुना गुणाकाराचे सामर्थ्य असते. त्यात जबाबदारीही असते. हे बाळकडू जर लहानपणापासून कुटुंबात आणि शाळेत मिळत गेले तर… Continue reading
-
कॅलेंडरची पुनरावृत्ती
– (अल्पारंभ फाऊंडेशन संचलित ‘कापरेकर कॉर्नर’ या उपक्रमाशी निगडीत ही पोस्ट!) हे आहे फेब्रुवारी २०२६ चे कॅलेंडर ज्यामध्ये सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार म्हणजे आठवड्यातील सातही वार बरोबर चार वेळा आलेले आहेत. सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. तुम्ही युट्युब वर किंवा इतरही सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या बातम्या बघितल्या असतील की हा फेब्रुवारी महिना… Continue reading
-
गणिती दिनदर्शिका @ कापरेकर कॉर्नर
– (अल्पारंभ फाऊंडेशन संचलित ‘कापरेकर कॉर्नर’ या उपक्रमाशी निगडीत ही पोस्ट!) थोडे प्रोत्साहन दिले आणि त्यांच्या कल्पकतेला वाव दिला की विद्यार्थी दिलेल्या विषयावर अफलातून काम करतात, मग तो विषय गणित का असेना ! हे सिद्ध झालेय ‘कापरेकर कॉर्नर’ अंतर्गत काम करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांच्या माध्यमातून. असाच एक उपक्रम आहे ‘गणिती दिनदर्शिका’. या उपक्रमात विद्यार्थी दिनदर्शिकेसाठी… Continue reading
-
चालवा डोकं, सोडवा कोडं: भाग 2
– (अल्पारंभ फाऊंडेशन संचलित ‘कापरेकर कॉर्नर’ या उपक्रमाशी निगडीत ही पोस्ट!) 4 ने गुणल्यावर उलट होणारी चार आकडी संख्या कोणती ? प्रश्न : ABCD ही एक चार आकडी संख्या आहे. ही संख्या 4 ने गुणली असता ती उलटी होऊन DCBA होते.म्हणजेच, 4 × ABCD = DCBA भाग 1 : तर्कावर आधारित सोडवणूक (Student Friendly) स्टेप… Continue reading
Recent Posts
