।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन


कविता

  • शिरीष

    – मांडव परतुनी शिशिर सोहळा,रंगित गंधित वसंत आला,वसंतासवे शिरीष दारी,कळ्या कळ्यांनी बहरून आला. थंड हवा ही सांजसकाळी,गोड गुदगुली स्पर्शुन गाली,भर माध्यान्ही झळा उन्हाळी,तप्त धरा अन् नभी काहिली. पर्ण फुले अन् पक्षी प्राणी,सुकते जळते अवघी अवनी,अतीव अंगारातुन बहरी,शिरीष दारी वटवृक्षापरि. हिरव्या पानी मोरपिसारा,फुलवुनी बसला झेली दिनकरा,शीतल छाया शीतल वारा,तप्त धरेला मिळे किनारा. पानापानातुनी हासरा,गुलाब रंगी फुले… Continue reading

  • कविता : तगमग

    – तगमग…बघून शहरातली,धूर ,आवाजी दिवाळी,ह्रदयी काजळी,पसरे माझ्या! धूर, दणक्यात,त्यांना येते मजा,पर्यावरणा सजा,दुर्लक्षती ! कोंडला किती,पृथ्वीचा श्वास,प्राणिमात्रास त्रास,चालला रे ! बहुतेकांनी,बांधले हो डोळे,का असे हे सोहळे,चालले रे ! कोणा सांगणे – शिकवणे,झाले आहे व्यर्थ,आनंदाचा स्वार्थ,चोहीकडे ! शोध मग जीवा,असे शांत जग,जिथे नसे तगमग,कोणाचीही! -सौ. रुपाली दिपक कुलकर्णी Continue reading

  • विसर्जन ?

    – जो सुखकर्ता, दुःखहर्ता, लंबोदर,जो अनंत,सर्वव्यापी,सर्वदूर,ज्याच्यासाठी वाहतो भक्तीचा पूर,जो असे आमच्या जगण्याचा सूर !! अशा श्रीगणेशाचा आनंदमयी सण,हर्षोल्हासाची सर्वत्र करितो उधळण,भक्ती- उत्साहाने उजळते जीवन,आयुष्यातील चिंता जणू विसरते मन !! गाठीभेटी अन आरती-प्रसाद,मोरया जयघोषाचा घुमतसे नाद,परस्परांतील वाढवितो संवाद,लाडक्या बाप्पाचा जणू हाच आशीर्वाद !! त्याच्या पावलांनीच होते गौरींचे आगमन,भक्तिभावाने साजरा होतो तोही सण,लक्ष्मी सेवेचे मिळते अतीव समाधान,एकत्र… Continue reading