।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन


Contents@SWS

  • सापशिडी आणि संत ज्ञानेश्वर

    – लहानपणी आपण सगळ्यांनीच सापशिडीचा खेळ खेळला असेल. शिडी मिळाली की आनंदाने अंतिम घराकडे मजल व्हायची आणि सापाने गिळलं की पुन्हा खालच्या घरात येऊन पडावं लागे. पण मनोरंजन करणाऱ्या या साध्या खेळाच्या जन्माचा मागोवा तुम्ही कधी घेतलाय का ? चला जरा पाहुयात … सापशिडी किंवा स्नेक अँड लॅडर या खेळाचं मूळ नाव ‘मोक्षपट’ किंवा ‘मोक्षपत’… Continue reading

  • संख्यांच्या वर्गांमधील लय शोधूया !

    – (अल्पारंभ फाऊंडेशन संचलित ‘कापरेकर कॉर्नर’ या उपक्रमाशी निगडीत ही पोस्ट!) संख्यांकडे थोड्या वेगळ्या नजरेने पाहिले, तर त्यांच्यात दडलेली लय आपल्याला जाणवते. या लेखात आपण संख्यांच्या वर्गांचे दोन भाग करू, त्या भागांमध्ये होणारे बदल पाहू आणि त्यांचा उपयोग करून मनातल्या मनात वर्ग काढू. यासाठी आपल्याला फक्त ० ते ९ या संख्यांचे वर्ग आणि थोडी बेरीज-वजाबाकी… Continue reading

  • कलाभान ६: पार्श्वसंगीत

    – आपल्याला निसर्गतःच संगीत लाभलेले आहे. गळ्याच्या रुपात स्वर, हृदयाच्या ठोक्याच्या रुपात ताल या देणग्या आपल्याला मिळाल्या आहेत. निसर्गात आपण शोधले तर संगीतच संगीत सापडेल. आपल्या प्रत्येकाच्या रुटीनमध्ये पार्श्वसंगीत सुरू असते. आपण अचानक खाता खाता खाऊचा डबाच वाजवत बसतो, रस्त्यावर वरात बघितली की मान, खांदे आपसूकच डोलावले जातात, अचानक रेडिओवर किंवा आजूबाजूला ऐकलेले गाणे आपल्या… Continue reading

  • उलुवाटू मंदिर: समुद्राच्या भव्य कॅनव्हासवरील शिल्प

    बाली डायरी : भाग ३ :– बालीला भेट देणाऱ्या प्रत्येक प्रवाशाच्या यादीत उलुवाटू मंदिराचं नाव वरच्या क्रमांकावर असतं ! याचं कारण म्हणजे समुद्राच्या भव्य कॅनव्हासवर दिसणारे त्याचे लोभस रुप, जागेच्या उंचीमुळे होणारे समुद्राचे विशाल दर्शन, तिथला अभूतरम्य सूर्यास्त आणि या सगळ्याच्या साथीने तिथे सादर केले जाणारे पारंपरिक आणि अनोखे.. केचक नृत्य ! हे सर्व एकत्र… Continue reading

  • इलेक्ट्रिक कार की हायड्रोजन कार?

    – भारतातील पहिली हायड्रोजन रेल्वे १७ जुलै २०२६ पासून हरियाणातील जिंद- सोनपत मार्गावर सुरू झाली.ही १० डब्यांची स्वदेशी ट्रेन हायड्रोजन इंधन सेल तंत्रज्ञानाचा वापर करते. यामुळे कार्बन उत्सर्जनाऐवजी केवळ पाण्याची वाफ बाहेर पडते, त्यामुळे पर्यावरणात प्रदुषण होत नाही.तसेच दररोज ३,००० लिटर डिझेलची बचत होते. मग काय अशाच तंत्रज्ञानावर आधारित हायड्रोजन कार पेट्रोल किंवा इलेक्ट्रिक कारला… Continue reading

  • प्रा. सी. आर. राव : आकडेवारीला नवे गणिती अधिष्ठान देणारे भारतीय गणितज्ञ

    – (अल्पारंभ फाऊंडेशन संचलित ‘कापरेकर कॉर्नर’ या उपक्रमाशी निगडीत ही पोस्ट!) गणित ही केवळ आकडेमोड नसून विचार करण्याची एक शिस्तबद्ध पद्धत आहे. उपलब्ध माहितीमधून योग्य निष्कर्ष कसा काढायचा, अंदाज किती अचूक आहे आणि निर्णयामध्ये किती अनिश्चितता आहे, हे शिकवणारी सांख्यिकी ही गणिताची अत्यंत उपयुक्त शाखा आहे. या शाखेला आधुनिक स्वरूप देणाऱ्या महान भारतीय शास्त्रज्ञांमध्ये प्रा.… Continue reading

  • कलाभान ५ : रागदारीतील नियमबद्ध अनंतता

    – बारा स्वर, त्यांचे असंख्य कॉम्बिनेशन्स, धून, थाट, या सगळ्यामधून निसर्गाच्या अदृश्य सदृश्य संदेशांमधून स्फुरलेल्या स्वरावलींना नियमांमध्ये, स्वरसंगतींमध्ये गुंफत राग तयार झाले असावेत. वेगवेगळ्या संगीतप्रकारात, बारा स्वर ‘धुन’ स्वरूपात वास करतात. परंतु जेव्हा ही स्वरप्रधानता आणखी बारकाव्यांसकट थोडी पुढे जाऊन स्वरसंगतींमध्ये रचनाबद्ध होते तेव्हा राग तयार होतो. (Image Source: pinterest India) माझ्या गुरू प्रख्यात गायिका विदुषी… Continue reading

  • नुसा पेनिडा – समुद्राच्या निळाईतले अद्भुत शिल्प!

    बाली डायरी : भाग २ :- बाली म्हटलं की डोळ्यांसमोर येतात हिरवीगार भातशेते, अप्रतिम शिल्पकलेने नटलेली मंदिरे आणि सुंदर समुद्रकिनारे. बालीतील वास्तव्याच्या पहिल्या तीन दिवसात आम्ही हे सारे डोळ्यात आणि मनात जमले तसे भरून घेतले होते. मग खुणावत होते ते नुसा पेनिडा बेट! बालीच्या मुख्य बेटापासून थोडं दूर गेलं की निसर्गाचं एक अगदी वेगळंच रूप… Continue reading

  • उपयुक्त अशी पावकी

    – (अल्पारंभ फाऊंडेशन संचलित ‘कापरेकर कॉर्नर’ या उपक्रमाशी निगडीत ही पोस्ट!) गणितातील अनेक गुणाकार काही सोप्या युक्त्यांच्या साहाय्याने तोंडी करता येतात. त्यापैकी पावकीचा पाढा अत्यंत उपयुक्त आहे. २५ ने किंवा २५ च्या जवळच्या संख्यांनी गुणाकार करताना या पाढ्याचा आधार घेतल्यास काही क्षणांत अचूक उत्तर मिळते. विद्यार्थ्यांनी ही पद्धत आत्मसात केली तर त्यांच्या तोंडी गणिताचा वेग… Continue reading

  • कलाभान ४ : रियाज – शारीरिक मानसिक भावनिक प्रवास

    – रियाजविषयी खूप कल्पना आणि अनुभवातून सिद्ध झालेली मते आहेत. कला म्हटलं की थेअरी, विचार, चिंतन, मनन या सगळ्याबरोबरच जोपर्यंत हे सर्व मनातून गळ्यात किंवा हातात उतरत नाही तोपर्यंत कलाकार घडत नाही. अथक वाचन, चिंतन, श्रवण करून व्यक्ती माहितगार, जाणकार रसिक, समीक्षक होऊच शकतो पण प्रत्यक्षात कलाकार होणे हे या सगळ्यांबरोबर अखंड शारीरिक मेहनत आणि… Continue reading