–

या कोड्याचा थोडा विचार केल्यावर लक्षात येते — यात अंकांची रचना, स्थानिक किंमत आणि तर्कशुद्ध विचार यांचा सुंदर संगम आहे.
आपल्याला दिले आहे:
ABCD × 9 = DCBA
इथे A, B, C, D हे अंक (0 ते 9) आहेत आणि दोन्ही संख्या चार अंकी आहेत.
म्हणजेच A आणि D हे शून्य असू शकत नाही.
- भाग १ – तर्कशुद्ध पद्धतीने उकल
टप्पा १ – संख्येची मर्यादा
ABCD ही चार अंकी संख्या आहे.
ती 9 ने गुणल्यावरही चार अंकीच राहिली पाहिजे. चार अंकी मोठ्यात मोठी संख्या 9999 आहे
आणि 9999/9 =1,111
याचाच अर्थ
👉 ABCD < 1111 (साधारण अंदाज)
यावरून:
➡️ A = 1 असणे आवश्यक आहे
टप्पा २ – शेवटच्या अंकाचा विचार
आपल्याला माहीत आहे:
D × 9 → शेवटी 1 येतो
फक्त एकच शक्यता:
👉 9 × 9 = 81 ( 9 चा पाढा )
म्हणजेच
➡️ D = 9
टप्पा ३ – संख्या आता अशी दिसते
1BC9 * 9 = 9CB1
टप्पा ४ – शतक आणि दशक स्थानाचा विचार
•9 × 9 = 81 → 1 लिहून 8 हातचे येणार ( कॅरी )
दहाच्या स्थानासाठी:
9 × C + 8 → शेवटी 0 यायला हवा
म्हणजे:
👉 9C + 8 हा 10 चा पटीत असायला हवा
तपासल्यावर:
➡️ C = 8
टप्पा ५ – उरलेला अंक
आता:
1 B 8 9 × 9 = 9 8 B 1
शेकड्यांच्या स्थानावर कॅरी येऊ नये म्हणून:
➡️ B = 0
✅ उत्तर
1089 × 9 = 9801
टीप – दुसऱ्या टप्प्यानंतर आपण असाही विचार करु शकतो – 1 ने सुरु होणाऱ्या आणि 9 ने संपणाऱ्या 4 अंकी संख्या ज्या 1111 पेक्षा लहान आहेत त्या 1009, 1019, 1029, 1039, 1049, 1059, 1069, 1079, 1089, 1099, 1109 या आहेत म्हणजेच यापैकीच कोणतेतरी उत्तर असायला हवे. तसेच एक अपवाद वगळता आपल्याला दिसते की B ही संख्या 0 च असायला हवी
⸻
भाग २ – स्थानिक किंमत पद्धतीने उकल
आता हेच कोडे स्थानिक किंमत वापरून सोडवूया.
टप्पा १ – मांडणी
ABCD = 1000A + 100B + 10C + D
DCBA = 1000D + 100C + 10B + A
दिलेल्या अटीप्रमाणे:
9(1000A + 100B + 10C + D) = 1000D + 100C + 10B + A
टप्पा २ – विस्तार
9000A + 900B + 90C + 9D = 1000D + 100C + 10B + A
8999A + 890B – 10C – 991D = 0
टप्पा ३ – अंदाज आणि निवड
या समीकरणात:
•8999A मोठा घटक
•991D मोठा घटक
संतुलनासाठी:
➡️ A = 1, D = 9
( A = 1 आणि D = 9 का असायला हवे ते आपण आधी बघितले आहे)
टप्पा ४ – वरील समीकरण सोडवल्यानंतर
80 + 890B – 10C = 0
89B – C = -8
C = 89B + 8
अंकांच्या मर्यादेमुळे: ( ABCD ही 1111 पेक्षा लहान आहे)
➡️ B = 0, C = 8
✅ उत्तर
1089 × 9 = 9801
⸻
विशेष निरीक्षण
ही संख्या अत्यंत रंजक आहे:
•1089 = 33²
•9801 = 99²
अंक उलटले आणि संख्या बदलली, तरीही दोन्ही संख्या पूर्ण वर्गच राहतात — आहे की नाही गंमत? यात एक विलक्षण गणिती सममिती दिसते.
गमतीशीर पॅटर्न
10989 × 9 = 98901
109989 × 9 = 989901
1099989 × 9 = 9899901
स्पष्टीकरण:
9 हा अंक 9 ने गुणल्यावर 81 हा अंक येतो. म्हणून प्रत्येक 9 मुळे carry तयार होतो. जसे-जसे 9 वाढतात तसे carry पुढे सरकत जातो. आणि असा हा गमतीशीर व सुंदर पॅटर्न तयार होतो.
अजुन एक गमतीशीर गोष्ट म्हणजे आधीच्या कोड्यामध्ये आपण 2178 * 4 =8,712 हे बघितले. आता 1089*2=2,178 येते , आहे की नाही गंमत ?
अजुन एक गंमत तुमच्या लक्षात आली का ? 4 आणि 9 ज्यांनी आपण गुणले त्या पुर्ण वर्ग संख्या आहेत. तसेच 2178 आणि 1089 या संख्यांना 9 ने भाग जातो.
तुम्हाला अजुन काही गंमत लक्षात येत असेल तर जरुर कळवा. तसेच असे संख्यांची उलटापालट होणारे काही पॅटर्न्स तुम्हाला सापडतात का – हे नक्की बघा आणि मला कळवा.

श्री. रघुवीर अधिकारी
Mobile No- 9822000883

Leave a comment