–
थोडे प्रोत्साहन दिले आणि त्यांच्या कल्पकतेला वाव दिला की विद्यार्थी दिलेल्या विषयावर अफलातून काम करतात, मग तो विषय गणित का असेना ! हे सिद्ध झालेय ‘कापरेकर कॉर्नर’ अंतर्गत काम करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांच्या माध्यमातून. असाच एक उपक्रम आहे ‘गणिती दिनदर्शिका’. या उपक्रमात विद्यार्थी दिनदर्शिकेसाठी घेतलेली संकल्पना (जसे खरेदी-विक्री, गुणांची सरासरी, वेळेचे विभाजन इ. ) केवळ पाठांतरापुरती / सरावापुरती शिकत नाहीत, तर ती प्रत्यक्ष जीवनाशी जोडून समजून घेतात. परिणामी गणित विषयातील त्यांची रुची, समज आणि आत्मविश्वास अधिक दृढ होतो. घेतलेली संकल्पना वापरून विद्यार्थी दिनांक १ ते ३० पर्यंत प्रत्येक दिवस गणिती समीकरण्याच्या साह्याने दिनदर्शिकेत दर्शवितात.
उदा. टक्केवारीच्या माध्यमातून दिनांक दाखविणे.

गणिती संकल्पनांवर आधारित मासिक कॅलेंडर प्रकल्प कसा तयार करता येईल यावर पुढीलप्रमाणे विचार केलेला आहे.
Math Concept–Based Monthly Calendar Project Guidelines
Raghuvir Adhikari
Dec 29, 2025, 5:00 PM (23 hours ago)
to me
गणिती संकल्पनांवर आधारित मासिक कॅलेंडर प्रकल्प
Math Concept–Based Monthly Calendar Project Guidelines
- कालावधी व वेळापत्रक
Duration and schedule
• दर महिन्याला गणिती संकल्पनांचा वापर करून कॅलेंडर तयार करणे.
Every month, students will prepare a calendar using different math concepts.
• हे काम शक्यतो महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू करावी. This activity should preferably begin in the first week of each month.
• पुढील महिन्याचे कॅलेंडर चालू महिन्यात तयार करावे.
The calendar for the next month should be designed during the current month - कॅलेंडरची रचना
Calendar design
• सर्वप्रथम कोणत्या गणिती संकल्पनेवर काम करायचे आहे ते निश्चित करणे.
First, decide which mathematical concept (उदा. गुणाकार, अपूर्णांक, टक्केवारी, घनमूळ इ.) will be used for that month.
• ब्रेनस्टॉर्मिंग सत्र घेऊन विद्यार्थ्यांकडून प्रश्न तयार करून घ्यावेत.
Conduct a brainstorming session and let students frame interesting questions based on the chosen concept.
• प्रत्येक प्रश्नाचे उत्तर संबंधित दिनांकावर (कॅलेंडरमधील अंकावर) येईल असे प्रश्न असावेत.
Each question should be designed so that its answer matches a specific date (number) on the calendar. - गणितज्ञांचा सन्मान
Honoring mathematicians
• त्या महिन्यात जन्मतारीख किंवा पुण्यतिथी असणारा एखादा जागतिक ख्यातीचा गणितज्ञ निवडावा.
For each month, select a renowned mathematician whose birth anniversary or death anniversary falls in that month.
• त्याची माहिती कॅलेंडरच्या वरच्या भागात द्यावी.
Display a brief profile of the chosen mathematician (छायाचित्र, कामगिरी, महत्त्वाची शोध/सिद्धांत) at the top of the calendar. - संकल्पनेची मांडणी
Presentation of the concept
• उरलेल्या जागेत निवडलेल्या गणिती संकल्पनेविषयी माहिती व उदाहरणे द्यावीत.
Use the remaining space to present clear information and simple examples related to the selected math concept.
• उदाहरणे शक्य तितकी विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनाशी जोडून द्यावीत.
Wherever possible, relate the examples to students’ daily life so that they see practical use of the concept. - पुनरावलोकन
Review
• सहा महिन्यांनंतर या प्रकल्पाचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांच्या संख्याज्ञानात, गणिती विचारक्षमतेत व दिनदर्शिकेच्या उपयोगात झालेल्या बदलांवर चर्चा करावी.
After six months, review the project and discuss the changes observed in students’ number sense, mathematical thinking, and effective use of calendars.
• विद्यार्थ्यांकडून अनुभव शेअर करून घ्यावेत व पुढील सहा महिन्यांसाठी सुधारणा सुचवाव्यात.
Invite students to share their experiences and suggest improvements for the next six months of the activity.

वेगवेगळ्या गणिती संकल्पना घेऊन हा उपक्रम सातत्याने राबवता येणे शक्य आहे. दिनदर्शिकेप्रमाणेच वर्गातील घड्याळे, सेल फोन वरील की पॅड इ. ही अशा प्रकारे तयार करता येतील.

सी. एच. एम. ई. सोसायटी संचालित विद्या प्रबोधिनी प्रशाला (मराठी माध्यम) येथे ‘गणित दिनदर्शिका’ हा अभिनव उपक्रम राबवला जातो आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :
श्री. रघुवीर अधिकारी. 98220 00883
टीम, अल्पारंभ फाउंडेशन


Leave a comment