।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन


सामाजिक

  • वित्तीय साक्षरता – प्रत्येकासाठी

    अल्पारंभा फाऊंडेशनचे नवीन ध्येय ! नवीन आर्थिक वर्ष सुरु झाल्यानंतर, अल्पारंभा फाउंडेशनचा हा पहिला ब्लॉग. आपण शिक्षण, तंत्रज्ञान आणि डिजिटल प्रगतीच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असलो तरीही भारतात वित्तीय साक्षरता ही अजूनही एक मोठी आव्हानात्मक बाब आहे. ‘वित्तीय साक्षरता:प्रचार आणि प्रसार’ हे फाउंडेशनचे सुरुवातीपासूनचे एक ध्येय आहेच. त्या अनुषंगाने, संस्थेमार्फत विविध उपक्रम चालविले जातात. परंतु… Continue reading

  • नाशिकच्या संगीत मैफलींच्या स्वरूपात होणारे बदल

    डॉ. आशिष रानडे कुठलाही संगीत प्रकार म्हणला की त्यात सादरीकरण हे त्या अनुषंगाने आलंच. मग ते कुठल्यातरी देवाला प्रसन्न करण्यासाठी असो, राजाला प्रसन्न करण्यासाठी असो, लोकरंजनासाठी असो.. त्यात त्या ‘कलेचं सादरीकरण’ हा भाग अतिशय महत्वाचा आहेच. त्याशिवाय कुठलीही कला ही परिपूर्ण म्हणता येणार नाही. नाशिक मधील शास्त्रीय संगीताच्या मैफिली आणि त्यांच बदलत स्वरूप या विषयावर… Continue reading

  • तुम्हाला फक्त वाटतंय की तुम्ही विचार करताय !

    तुम्हाला फक्त वाटतंय की तुम्ही विचार करताय !

    AI आणि लिखाण मी तंत्रज्ञानाबद्दल भविष्यवाणी करायला फारसा उत्सुक नसतो, पण मला पूर्ण खात्री वाटू लागली आहे की काही दशकांनंतर फार कमी लोक लिहू शकतील. खरं तर, लिहिणं हे मुळातच अवघड काम आहे. चांगलं लिहायचं असेल तर नीट विचार करावा लागतो, आणि तोच मुख्य त्रास आहे – कारण स्पष्ट विचार करायला स्वतःचं डोकं लावावं लागतं.… Continue reading

  • निःशब्द आधारस्तंभ : दिव्यांग व्यक्तींच्या विकासातील काळजीवाहकांची भूमिका

    निःशब्द आधारस्तंभ : दिव्यांग व्यक्तींच्या विकासातील काळजीवाहकांची भूमिका

    साक्षी देशमुख – मानसशास्त्रज्ञ दिव्यांग व्यक्तींची काळजी घेणे , मग ते दृष्टिहीन, श्रवणबाधित असोत किंवा त्यांना कोणत्याही शारीरिक अथवा बौद्धिक अडचणी असोत ही केवळ सेवा नव्हे, तर प्रेम, चिकाटी आणि भावनिक गुंतवणुकीची एक अविरत प्रक्रिया असते. कुटुंबातील सदस्य, व्यावसायिक किंवा संस्थात्मक कर्मचाऱ्यांच्या रूपाने काळजीवाहक (Caregivers) हे या व्यक्तींच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण आधारस्तंभ असतात. केवळ दैनंदिन मदत पुरवण्यापलीकडे… Continue reading

  • डेटा सेंटर्समुळे जलसंकटात वाढ होणार?

    डेटा सेंटर्समुळे जलसंकटात वाढ होणार?

    प्रा.डॉ.संजय छाया त्रिंबकराव खडक्कार आर्टिफिशियल इंटेलिजन्स ,बिग डेटा आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज असलेल्या तंत्रज्ञानाच्या युगात,आपण एकामेकाशी नेहमीपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे जोडल्या गेलो आहोत. या जोडण्याला (कनेक्टिव्हिटीला) शक्ती देणारी पायाभूत सुविधा म्हणजे डेटा सेंटर्स,आपल्याला ऑनलाइन ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व्हर आणि स्टोरेज सिस्टम्स असलेल्या भौतिक इमारती, यामुळे आपले डिजिटल जग अविरत चालू आहे. संगणकीय-केंद्रित कामाची उर्जा कार्यक्षमता… Continue reading

  • खो-खो विश्वचषक २०२५: भारताचे दुहेरी यश !!

    – २०२५ सालचा खो-खो विश्वचषक हा पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला होता. भारत या विश्वचषकाचा आयोजक देश होता. नवी दिल्लीतील इंदिरा गांधी एरिनामध्ये १३ ते १९ जानेवारी २०२५ दरम्यान या विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जगभरातील २० पुरुष आणि १९ महिला संघांनी सहभाग घेतला होता. भारताने खो-खो विश्वचषकाच्या पहिल्याच आवृत्तीमध्ये पुरुष आणि महिला दोन्ही… Continue reading

  • आशादायक स्वप्नांपासून ते वेदनादायी अनुभवांपर्यंत !

    साक्षी देशमुख – मानसशास्त्रज्ञ यांचा एक अनुभव ही कथा आहे अर्जुनची ! १९ वर्षांचा अर्जुन, तरुण वयातच आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि त्याद्वारे जीवनमान उंचाविण्यासाठी अनेक महत्त्वाकांक्षा उराशी बाळगून होता. या सुंदर, आशादायक स्वप्नापासून सुरु झालेला त्याचा प्रवास त्याच्याच काही चुकांमुळे, मानसिकतेमुळे त्याला कर्जाच्या खाईपर्यंत कसा घेऊन गेला ते बघुयात. हे सर्व सुरू झाले एका स्वप्नापासून!… Continue reading

  • देणार का तुम्ही मदतीचा हात ?

    खारीचा वाटा: कापडी पिशवी प्रकल्प मागील काही दिवस आपण भारतवासीय आहोत याचा अभिमान पुन्हा एकदा वाटायला लावणारे वर्तमानपत्रातील मथळे वाचनात येत होते. जसे… ‘भारत जगातील सर्वात प्रगतीशील अर्थव्यवस्था’, ‘बुद्धीबळाच्या खेळात भारत देश जगात आघाडीवर.’ इ. पण याच महिन्यात वर्तमानपत्रातील एक अस्वस्थ करणारा मथळा वाचण्यात आला.. ‘भारत हा जगातील क्रमांक एकचा प्लास्टिक प्रदूषक! भारत दरवर्षी ९.३… Continue reading

  • कर्करोग आणि लक्षणे

    डॉ.क्षमा वैरागी जगभरात  कर्करोगाचे प्रमाण फार वाढत आहे.  भारतातही  कर्करोग रुग्णांची  संख्या बरीच वाढत चालली आहे. कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाणही खूप जास्त आहे. त्यामुळे हा आजार ही  एक गंभीर समस्या  बनली आहे.  जवळजवळ प्रत्येकाच्या  परिचयात  कर्करोग झालेल्या तसेच ककरोगामुळे  मृत्यू  झालेल्या  व्यक्ती असतातच.  पण जसे आजाराचे प्रमाण वाढत आहे त्याच बरोबरीने त्यावरील संशोधनाचे प्रमाणही वाढत… Continue reading

  • Financial Literacy for Women

    विद्येसह वित्त येते… विद्ये विना मती गेली, मती विना नीती गेली,निती विना गती गेली, गती विना वित्त गेलेइतके सर्व अनर्थ, एका अविद्येने केले !! हे महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार, शिक्षण घेण्याच्या बाबतीत जितके खरे आहे तितकेच खरे ते आर्थिक शिक्षणाच्या बाबतीतही लागू पडतात.ज्योतिबा म्हणत “एक स्त्री साक्षर झाली तर पूर्ण कुटुंब शिक्षित होते”. याच… Continue reading