।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन


बोलावे ऐसे..

 



बोलावे ऐसे, न व्हावे जे रटाळ, 🥱

 नेमकेच वदावे, का ठरावे वाचाळ !! 🤬

 

लिहावे ऐसे, मांडावा मतितार्थ, 🎯

 कमी,अचूक शब्दांत, उतरवावा अर्क !! 💧

 

ऐकावे ऐसे, की समजून घ्यावे,😊

 प्रतिक्रिया टाळुनी, प्रतिसादा द्यावे !!😇

 

वर्तावे ऐसे, जे बोलू ते चालावे, 😎

 गदारोळ टाळुनिया, जगा शांतवावे !!😇

 

ऐसे गुणदर्शने, जनी जनी वाढितो सन्मान,🙌🏽

अपेक्षित फलश्रुती,अपेक्षित परिणाम !!🎯

 

– रुपाली



Discover more from ।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

Subscribe to get the latest posts sent to your email.



Leave a Reply