।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन


Contents@SWS

  • π (पाय) दिन – १४ मार्च

    – π (पाय) हा गणितातील एक अत्यंत महत्त्वाचा स्थिरांक आहे. गणितातील अत्यंत महत्त्वाच्या स्थिरांकांपैकी एक असलेल्या π (पाय) या संख्येचा गौरव करण्यासाठी हा दिवस निवडला आहे. या संख्येतील सुरुवातीचे आकडे 3.14 असे असल्यामुळे दरवर्षी १४ मार्च (३/१४) हा दिवस Pi Day म्हणून साजरा केला जातो. १४ मार्च हा दिवस महान शास्त्रज्ञ आल्बर्ट आइन्स्टाईन यांचा जन्मदिवस… Continue reading

  • युद्धे व सशस्त्र संघर्ष: पर्यावरण एक मूक बळी

    – आज अमेरिका,इस्त्रायल – इराण युद्ध असो की रशिया – युक्रेन युद्ध असो, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जिवितहानी, महत्त्वाच्या पायाभूत सुविधा आणि अनेकदा ऊर्जा प्रकल्पाचा नाश, शहरांचा नाश,देशाच्या अर्थव्यवस्थेचा ऱ्हास सोबतच, पर्यावरणीय धोके दिवसेंदिवस वाढतच आहे. हवा व जल प्रदूषण,व मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन निसर्गाला विनाशाकडे नेत आहे.या युद्धांमध्ये दोन्ही बाजूंचे लाखो सैनिक एकतर मृत्युमुखी पडले… Continue reading

  • वसंत चित्रलिपी

    – दहावीची परीक्षा झाली आणि रेणू मामाकडे सुटीसाठी आली.दहावीचे वर्ष खूप अभ्यासात गेले होते. त्यामुळे नुसती मज्जा-मस्ती- खेळ खेळायचे, असे तिने ठरवले होते. खूप झोपायचे, मस्त जेवण करायचे आणि भरपूर फिरायचे हा तिचा प्लान होता. दुसऱ्या दिवशी सकाळी तिला जाग आली ती आरतीमुळे. मामी देवाची आरती, पूजा करीत होती. आवाजाच्या दिशेने तीची पावले देव घराकडे… Continue reading

  • तिचे अर्थभान …डॉ. रुपाली कुलकर्णी.

    तिच्या अर्थभानावर बोलण्याआधी, आपल्या आजुबाजूला घडणारे ‘अर्था‘शी  निगडीत काही प्रसंग आधी पाहुयात. समजा,  श्री.  चिंतामणी आपल्या कुटुंबासाठी काही आर्थिक गुंतवणूक करतात किंवा करणार आहेत. अशावेळी घरातील सौ.चिंतामणींशी ते कसे संवाद साधतात ते पाहुयात.  प्रसंग १:  शून्य  संवाद ! सौ.चिंतामणींना आपल्या आर्थिक गुंतवणूकीविषयी  घरात माहिती देण्यास अजिबात आवडत नाही किंवा तसे करण्याची त्यांना आवश्यकताही वाटत नाही.  … Continue reading

  • SWS – ३१ वर्षांचा प्रवास

    – एकतीस वर्षांचा प्रवास.. खेळ नाही केवळ आकड्यांचा,एक संपन्न कालखंड हा.. जोडल्या गेलेल्या नात्यांचा !ग्राहकांच्या विश्वासाचा, अखंड तेवतो नंदादीप,हजार कोटींचा टप्पा गाठत, यश आले आणखी समीप !! तंत्रज्ञानाच्या वेगात आणि AI च्या नवयुगात,ग्राहकांचा विश्वास स्थिर, अजूनही प्रत्येक क्षणात !GPT आणि अँप्स द्वारे, जरी सर्व माहिती तुमच्या हातात,तरीही निर्णय घ्यायला लागतोय, आपल्या माणसांचाच आधार !! कारण… Continue reading

  • आत्महत्या… नसावा शेवटचा पर्याय !!

    – आत्महत्या घटनांबाबत जे घडतं , ते एखाद्या व्यक्तीपुरतं मर्यादित नाही.ते अस्वस्थ करून जातं, कारण ते आपल्या आजूबाजूच्या असंख्य ओळखीच्या चेहऱ्यांशी जोडलेलं आहे.आपल्या भोवती अनेक जण असतात —हसणारे, कामात रमलेले, यशस्वी दिसणारे, सुसंस्कृत, प्रेमळ.पण आत कुठेतरी, न दिसणाऱ्या पातळीवर,ते सतत एक युद्ध लढत असतात.त्या वेदना नेहमी मोठ्या नसतात.पण त्या एकट्याने सहन करण्याइतक्या मात्र नक्कीच असतात.… Continue reading

  • कविता : तगमग

    – तगमग…बघून शहरातली,धूर ,आवाजी दिवाळी,ह्रदयी काजळी,पसरे माझ्या! धूर, दणक्यात,त्यांना येते मजा,पर्यावरणा सजा,दुर्लक्षती ! कोंडला किती,पृथ्वीचा श्वास,प्राणिमात्रास त्रास,चालला रे ! बहुतेकांनी,बांधले हो डोळे,का असे हे सोहळे,चालले रे ! कोणा सांगणे – शिकवणे,झाले आहे व्यर्थ,आनंदाचा स्वार्थ,चोहीकडे ! शोध मग जीवा,असे शांत जग,जिथे नसे तगमग,कोणाचीही! -सौ. रुपाली दिपक कुलकर्णी Continue reading

  • प्रवास – आत्मभानापासून ते आत्ममग्नेतेपर्यंतचा

    – विज्ञान, मानसशास्त्र, व समाजशास्त्र क्षेत्रात आत्मभान असणे हे चांगले लक्षण मानले आहे.. कारण आत्मभानाची व्याप्ती व्यक्ती पुरती सिमीत न राहाता ती कुटुंब, समाज आणि देशावर प्रभाव टाकते. आत्मभान, माणसाला एक डोळस आणि सकारात्मक दृष्टीकोन देतो. त्यात बेरजेचे किंबहुना गुणाकाराचे सामर्थ्य असते. त्यात जबाबदारीही असते. हे बाळकडू जर लहानपणापासून कुटुंबात आणि शाळेत मिळत गेले तर… Continue reading

अल्पारंभाविषयी अधिक माहिती:

Our Officlal Website

 ई-मेल:alparambha@gmail.com

दुरध्वनी: ९०११८९६६८१