।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन


सामाजिक

  • ई-कचरा ! चिंताजनक बाब

      महानगरांमध्ये निर्माण होणारा इलेक्ट्रॉनिक कचरा आणि त्याच्या निर्मितीचे वाढते प्रमाण  चिंताजनक बाब आहे. पर्यावरणपूरक पद्धतीने याचे निःसारण होत नसल्याचे चित्र सर्वसामान्य आहे !!  अ ई-कचर्‍याचे व्यवस्थापन सुरळीत होण्यासाठी त्याचे संकलन आणि पुनर्प्रक्रियेमध्ये असणार्‍या त्रुटी सुधारणे आवश्यक आहेत. तसे न झाल्यास ई-कचरा भविष्यामध्ये मोठ्या समस्येचे रूप धारण करणार आहे.  ई-कचरा म्हणजे काय ? निरुपयोगी इलेक्ट्रॉनिक Continue reading

  • भारताचा युवा वैज्ञानिक : प्रताप

      महिन्यातून अठ्ठावीस दिवस विदेशांचा प्रवास करणारा हा अवघे २१ वर्षांचे वय असलेला युवा आहे प्रताप.फ्रान्सने त्याला त्यांच्याकडे नोकरी करण्याचे निमंत्रण दिले आहे. मासिक सोळा लाखांचा गलेलठ्ठ पगार, पाच शयनकक्षांचे घर, अडीच कोटींची दिमाखदार कार, अशा प्रलोभनपूर्ण प्रस्तावांनी अनेक संस्थांनी त्याला बोलावले. ह्या पठ्ठ्याने या सर्वांना सरळ नकार दिला. आपले पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींनी त्याला Continue reading

  • सिग्नलवरची दिवाळी …

    – डॉ.  रुपाली दिपक कुलकर्णी   पुन्हा एकदा दीपावली, रोषणाई, खरेदी,फराळ आणि आप्त, या सगळयात रममाण असतानाही, मनात थोडीशी असते खंत ! आठवतात तेव्हाही, सिग्नलवर भटकून आकाशदिवे,पणत्या विकणारी मुले, काय करत असतील ते, जेव्हा फटाके उडवितात आपले  चिमुकले ?  सिग्नल लाल होईपर्यन्त, नजर त्यांची  न्याहाळत असते आकाशातील रोषणाई, एकमेकांना दाखवायची असते त्यांना, आपण पाहत असलेली नवलाई Continue reading

  • शूरा मी वंदिले – अनघा मोडक

        II  ॐ स्वातंत्र्यलक्ष्मी कि जय II भारतीयस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने अल्पारंभा एज्यूकेशनल फाऊंडेशन, नाशिक आणि  महाराष्ट्रसमाज सेवा संघ तसेच  नाशिकशिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने, “शूरा मी वंदिले !” याकार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  सुप्रसिद्धआकाशवाणी निवेदिका, अनघा मोडक हिने , स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील शूरवीर सैनिकांच्या कथा, गाथा आपल्या अमोघ वाणीद्वारे  शालेयमुलांसमोर उलगडल्या !! रचनाविद्यालय Continue reading

  • मनोगत : अल्पारंभाच्या उपक्रमांविषयी : श्री. अविनाश गोसावी.

      अल्पारंभा एज्यूकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन या संस्थेचा २०१८ साली उदय झाला. संस्थेची प्राथमिक उद्दिष्ट्ये ठरवितांना, अर्थातच समाजावर प्राथमिक परिणाम करणारी, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्र ही प्रामुख्याने विचारात घेतली गेली. या दोन्ही विषयांच्या कक्षेत कार्य करतांना, त्यातील विविध निकडी ओळखून, त्यासाठी कार्य करणाऱ्या संस्थांना मदत करणे आणि त्या निगडीत उपक्रम राबवणे हे अप्लारंभाचे प्राथमिक उद्दिष्ट्य Continue reading

  • निमित्त : ५ जून : जागतिक पर्यावरण दिवस : प्लास्टिकचे रस्ते, प्लास्टिकचे फ्युएल!

    प्लास्टिकचे रस्ते, प्लास्टिकचे फ्युएल! आपल्या आजूबाजूच्या कचरापेट्यात, रस्त्यावरच्या मोकळ्या जागेत, हायवे आणि रेल्वेरूळांच्या शेजारी सहज नजर गेली तरी काय दिसतं? प्लास्टिकच्या पिशव्या, चिप्स, खाऊची रिकामी पाकिटं, कोल्डड्रिंकच्या बाटल्या यांचा अगदी खच. असं वाटतं की हे प्लास्टिक पृथ्वीला दशांगुळे व्यापून राहतंय की काय?  अगदी गायी- गुरं यांच्या पोटात प्लास्टिक गेल्याच्या अनेक बातम्या आपण वाचत असतो. अशीच Continue reading

  • अनोखी भेट : घरकुल परिवार संस्थेला

           अनोखी भेट : घरकुल परिवार संस्थेला ! SWS करत असलेल्या सामाजिक कामांबद्दल यापूर्वी बरेच ऐकले होते. आज अनुभवण्याचा योग आला. SWSटीम सोबत  आज ‘घरकुल परिवार’ या संस्थेच्या कार्यस्थळी भेट द्यायला गेलो होतो.  मानसिकरीत्या दिव्यांग असलेल्या जाणत्या महिलांना आधार देणारी, त्यांची काळजी घेणारी व त्यांना विविध कौशल्ये शिकवणारी आणि स्त्रियांसाठी चालविली जाणारी, ही Continue reading

  • अल्पारंभ: – श्री. रघुवीर अधिकारी

       SWS चे राैप्य महाेत्सवी वर्ष साजरे करत असतांना, आमच्या संस्थेमार्फत गेल्या २५ वर्षात झालेल्या अनेक सामाजिक उपक्रमांचा आढावा घेतला. सुरवात अर्थातच अगदी छाेट्या स्वरुपात हाेती – ‘।।अल्पारंभ: क्षेमकरा ।।‘ या आमच्या ब्रीदवाक्याप्रमाणे ! राैप्य महाेत्सवी वर्षात या सामाजिक कार्याला संघटित स्वरूप द्यावे व स्वतंत्र संस्थेमार्फतच हे काम करावे – म्हणजे अधिक संघटितरित्या आणि परिणामकारक स्वरूपात कार्य पुढे Continue reading