सामाजिक
-
जीव झाडाले टांगला
– ‘अहम् आवाम् वयम्’ हे किशोरवयीन मुलांचे मासिक आहे. वयम् आणि अल्पारंभ फाऊंडेशनच्या विद्यमाने, ‘गोष्टी विचारवंतांच्या’ आणि ‘गप्पा आजोबांशी’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कै. श्री बाळकृष्ण शुक्ल यांच्या स्मरणार्थ किशोर मुलांच्या वयोगटासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘कथा स्पर्धा २०२५’ या कथा स्पर्धेत यंदा ७५ लेखकांनी सहभाग घेतला. आलेल्या गोष्टींचे प्राथमिक परीक्षण कांचन जोशी यांनी करून त्यातील Continue reading
-
सॅपियन्स – एका विलक्षण प्रवासाची विचारप्रवर्तक सांगड : श्री. बिपीन बाकळे
– ‘सॅपियन्स’ हे पुस्तक केवळ मानवाच्या इतिहासाचा आलेख मांडत नाही, तर तो आपल्याला अंतर्मुख करणारा आणि अस्वस्थ करणारा प्रवास आहे. युवाल नोआ हरारी यांनी आपल्याला साडेतेरा अब्ज वर्षांचा प्रचंड कालपट समोर ठेवला आहे आणि तो माणसाच्या डोळ्यांसमोर अगदी तपशीलात उलगडतो. पण ही संख्या – साडेतेरा अब्ज वर्षं – सामान्य मनाला समजेल अशी नाही. साडेतेरा अब्ज Continue reading
-
पर्यावरण संरक्षणार्थ खारीचा वाटा
आपल्या सर्वाना माहीतच आहे की भारत हा जगातील क्रमांक एकचा प्लास्टिक प्रदूषक देश आहे. भारत दरवर्षी ९.३ दशलक्ष टन प्लास्टिक कचऱ्याची पर्यावरणात भर घालतो आहे. धरती, पाणी, वायू यांचे अतिरेकी प्रदूषण जगभरात सुरु आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन ‘खारीचा वाटा’ या विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या लहान मुलांच्या संघटनेने आपल्याला ह्यावर काय करता येईल यावर समाधान Continue reading
-
शाळांमध्ये स्मार्टफोनवर बंदी असावीच
प्रा.डॉ.संजय छाया त्रिंबकराव खडक्कार आर्थिक सहकार्य आणि विकास संघटनेच्या (OECD) आंतरराष्ट्रीय विद्यार्थी मूल्यांकन कार्यक्रम २०२२ च्या अहवालात असे आढळून आले की शाळेतील विद्यार्थ्यांजवळील स्मार्टफोन वर्गातील लक्ष विचलित करण्यात एक प्रभावी कारण आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक गोष्टीकडे लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेवर नकारात्मक परिणाम होतो. मोबाईल फोनवर येणाऱ्या सूचना पण विद्यार्थांचे लक्ष विचलित करू शकतात. अजून एका Continue reading
-
दूरदर्शी कै. महादेव बल्लाळ नामजोशी
वित्तीय साक्षरतेचे महत्व ओळखणारे अनोखे व्यक्तिमत्व महाराष्ट्रातील जनतेला, उद्योग व्यवसायाला पुढे नेण्यासाठी अनेक दृष्ट्या, बुद्धिमान व्यक्तिमत्वांनी हातभार लावलेले आहेत,. त्यातील कित्येक नावे आपल्या परिचयाचीही नाहीत. परंतु अलीकडेच ‘महादेव बल्लाळ नामजोशी’ यांच्या कार्याविषयी वाचनात आले. इ. स. १८८० सालीच त्यांनी वित्तीय साक्षरतेचे महत्व ओळखलेले होते आणि त्या अनुषंगाने मोठे कार्य उभे केले होते हे वाचून आश्चर्य Continue reading
-
काठावरील प्रवास..
डाॅ. सौ.मृणालिनी दोडके माणुस हा सामाजिक प्राणी आहे आणि तो सामाजिक रचनेमधे आपले कर्तृत्व, वक्तृत्व,सर्जनशीलता, बौद्धिक उर्जा ह्याचे देवाण-घेवाण करत असतो. समाज रचनेमधे तो स्वतःला निश्चिंत आणि सुरक्षित ठेवू शकतो. ह्या समाजरचनेत शिक्षण व्यवस्था, कुटुंब व्यवस्था, लग्न व्यवस्था, उद्योग-नोकरी हे घटक माणसाला प्रगत बनवायला अनेक व्यवस्था वर्षानुवर्ष कार्यरत आहे. साधारण १९७०-१९७५ दरम्यान एखाद्या कुटुंबात ३ Continue reading
-
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी जीवनाचे बदलते वळण
डॉ. मृणालिनी दोडके व श्री. दिपक दोडके, कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) हा आजकाल सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. शास्त्रज्ञ, उद्योगपती, समाजशास्त्रज्ञ सर्वच जीवनाच्या प्रत्येक पैलूत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता प्रभावीपणा अनुभवत आहेत. मानवाच्या वर्तनातील सर्वात मोठा बदल AI आणू शकते, असे मानले जात आहे. उद्योग, शिक्षण आणि समाज यांचे कार्यपद्धती येत्या काही वर्षांत पूर्णपणे Continue reading
-
वित्तीय साक्षरता – प्रत्येकासाठी
अल्पारंभा फाऊंडेशनचे नवीन ध्येय ! नवीन आर्थिक वर्ष सुरु झाल्यानंतर, अल्पारंभा फाउंडेशनचा हा पहिला ब्लॉग. आपण शिक्षण, तंत्रज्ञान आणि डिजिटल प्रगतीच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असलो तरीही भारतात वित्तीय साक्षरता ही अजूनही एक मोठी आव्हानात्मक बाब आहे. ‘वित्तीय साक्षरता:प्रचार आणि प्रसार’ हे फाउंडेशनचे सुरुवातीपासूनचे एक ध्येय आहेच. त्या अनुषंगाने, संस्थेमार्फत विविध उपक्रम चालविले जातात. परंतु Continue reading
-
नाशिकच्या संगीत मैफलींच्या स्वरूपात होणारे बदल
डॉ. आशिष रानडे कुठलाही संगीत प्रकार म्हणला की त्यात सादरीकरण हे त्या अनुषंगाने आलंच. मग ते कुठल्यातरी देवाला प्रसन्न करण्यासाठी असो, राजाला प्रसन्न करण्यासाठी असो, लोकरंजनासाठी असो.. त्यात त्या ‘कलेचं सादरीकरण’ हा भाग अतिशय महत्वाचा आहेच. त्याशिवाय कुठलीही कला ही परिपूर्ण म्हणता येणार नाही. नाशिक मधील शास्त्रीय संगीताच्या मैफिली आणि त्यांच बदलत स्वरूप या विषयावर Continue reading
-
तुम्हाला फक्त वाटतंय की तुम्ही विचार करताय !

AI आणि लिखाण मी तंत्रज्ञानाबद्दल भविष्यवाणी करायला फारसा उत्सुक नसतो, पण मला पूर्ण खात्री वाटू लागली आहे की काही दशकांनंतर फार कमी लोक लिहू शकतील. खरं तर, लिहिणं हे मुळातच अवघड काम आहे. चांगलं लिहायचं असेल तर नीट विचार करावा लागतो, आणि तोच मुख्य त्रास आहे – कारण स्पष्ट विचार करायला स्वतःचं डोकं लावावं लागतं. Continue reading
Recent Posts
