शैक्षणिक
-
विचारांची दिशा जेंव्हा खिशातून जाते तेंव्हा..
डाॅ. सौ. मृणालिनी दोडके ‘विचारांची दिशा जेंव्हा खिशातून जाते तेंव्हा..’, काल वर्तमान पत्रातील एका लेखात हे वाक्य वाचले आणि ते आजच्या युगात किती तंतोतंत लागू पडते ह्याची जाणीव झाली. त्याची पार्श्वभूमी म्हणजे IIT मधील विद्यार्थी, सरकारच्या खर्चाने पदवी घेतात आणि नंतर स्वतःच्या खिशाचा विचार करत बाहेरच्या देशात निघून जातात. किती खरी परिस्थिती आहे ! फार… Continue reading
-
अल्पारंभ फाउंडेशन संचलित कापरेकर संशोधन प्रसार उपक्रम

श्री. रघुवीर अधिकारी अल्पारंभ फाउंडेशन संचलित कापरेकर संशोधन प्रसार उपक्रम कै. दत्तात्रय रामचंद्र कापरेकर हे जागतिक कीर्तीचे गणितज्ञ होते. त्यांच्या महाविद्यालयीन काळात त्यांना गणितातले प्रतिष्ठित रॅंग्लर परांजपे पारितोषिक मिळाले होते. ते नाशिकजवळील देवळाली येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते. विशेष म्हणजे, त्यांनी शालेय स्तरावर संशोधनपर लेखन केले, जी अत्यंत दुर्मिळपणे आढळणारी बाब आहे. कापरेकर सरांचे अद्वितीय… Continue reading
-
निःशब्द आधारस्तंभ : दिव्यांग व्यक्तींच्या विकासातील काळजीवाहकांची भूमिका

साक्षी देशमुख – मानसशास्त्रज्ञ दिव्यांग व्यक्तींची काळजी घेणे , मग ते दृष्टिहीन, श्रवणबाधित असोत किंवा त्यांना कोणत्याही शारीरिक अथवा बौद्धिक अडचणी असोत ही केवळ सेवा नव्हे, तर प्रेम, चिकाटी आणि भावनिक गुंतवणुकीची एक अविरत प्रक्रिया असते. कुटुंबातील सदस्य, व्यावसायिक किंवा संस्थात्मक कर्मचाऱ्यांच्या रूपाने काळजीवाहक (Caregivers) हे या व्यक्तींच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण आधारस्तंभ असतात. केवळ दैनंदिन मदत पुरवण्यापलीकडे… Continue reading
-
डेटा सेंटर्समुळे जलसंकटात वाढ होणार?

प्रा.डॉ.संजय छाया त्रिंबकराव खडक्कार आर्टिफिशियल इंटेलिजन्स ,बिग डेटा आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज असलेल्या तंत्रज्ञानाच्या युगात,आपण एकामेकाशी नेहमीपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे जोडल्या गेलो आहोत. या जोडण्याला (कनेक्टिव्हिटीला) शक्ती देणारी पायाभूत सुविधा म्हणजे डेटा सेंटर्स,आपल्याला ऑनलाइन ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व्हर आणि स्टोरेज सिस्टम्स असलेल्या भौतिक इमारती, यामुळे आपले डिजिटल जग अविरत चालू आहे. संगणकीय-केंद्रित कामाची उर्जा कार्यक्षमता… Continue reading
-
सायबर गुन्हेगारी : प्रकार आणि तपास यंत्रणा
डॉ. रुपाली कुलकर्णी सध्याचे युग हे डिजीटलयुग आहे. कोणत्याही दुकानातील UPI पेमेंटपासून ते बॅकिंग व्यवहारापर्यंत, ऑनलाईन शॉपिंग पासून ते गुंतवणूकीपर्यंत , ‘वर्क फ्रॉम होम’ संस्कृतीमुळे ऑनलाईन ऑफिसचे कामकाज करण्यापासून ते मनोरंजनही OTT प्लॅटफॉर्म मार्फत होण्यापर्यंत सर्वच आयुष्य डिजीटल झालं आहे. त्यामुळेच डिजीटल क्षेत्रात गुन्हेगारीचा प्रवेश होऊन सायबर गुन्ह्यांचं प्रमाणही कमालीचं वाढलं आहे. सर्वत्र ऑनलाईन घोटाळे… Continue reading
-
Financial Literacy for Women
विद्येसह वित्त येते… विद्ये विना मती गेली, मती विना नीती गेली,निती विना गती गेली, गती विना वित्त गेलेइतके सर्व अनर्थ, एका अविद्येने केले !! हे महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार, शिक्षण घेण्याच्या बाबतीत जितके खरे आहे तितकेच खरे ते आर्थिक शिक्षणाच्या बाबतीतही लागू पडतात.ज्योतिबा म्हणत “एक स्त्री साक्षर झाली तर पूर्ण कुटुंब शिक्षित होते”. याच… Continue reading
-
सोशल निवेश की इमोशनल कहाणीया !!
अल्पारंभ फौंडेशन द्वारा चलित “अर्थ साक्षरता अभियान” के अंतर्गत , ये नुक्कड नाटिका प्रस्तुत की गई !! हमारा प्रयास हे की लोग सोशल मीडिया से प्रभावित होकर अपने वित्तीय निर्णय ना ले !! यही इस प्रस्तुत नाटिका का विषय हे ! कोरस १ : सोशल निवेश की इमोशनल कहाणीया कोरस २: सोशल निवेश ? सोशल… Continue reading
-
Gurupornima 2023
गुरु शिष्य : कापरेकर आणि गोटखिंडीकर ! गणकयंत्र मानव, अंकमित्र, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे गणित तज्ञ दत्तात्रय रामचंद्र कापरेकर सर ५६ वर्षे नाशिक मध्ये राहत होते. प्रज्ञावंत गणिती असलेले कापरेकर सर देवळाली कॅम्पच्या झोराष्ट्रीयन पारशी निवासी शाळेत एक जून १९३२ रोजी शिक्षक म्हणून नोकरीस लागले. आर्थिक डबघााईमुळे १९४६मध्ये ती शाळा बंद पडल्यावर १९४६ते १९६२ या काळात देवळाली… Continue reading
-
मराठी भाषा गौरव दिन
मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले गेले आहेत. आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा… Continue reading
-
ई-कचरा ! चिंताजनक बाब
महानगरांमध्ये निर्माण होणारा इलेक्ट्रॉनिक कचरा आणि त्याच्या निर्मितीचे वाढते प्रमाण चिंताजनक बाब आहे. पर्यावरणपूरक पद्धतीने याचे निःसारण होत नसल्याचे चित्र सर्वसामान्य आहे !! अ ई-कचर्याचे व्यवस्थापन सुरळीत होण्यासाठी त्याचे संकलन आणि पुनर्प्रक्रियेमध्ये असणार्या त्रुटी सुधारणे आवश्यक आहेत. तसे न झाल्यास ई-कचरा भविष्यामध्ये मोठ्या समस्येचे रूप धारण करणार आहे. ई-कचरा म्हणजे काय ? निरुपयोगी इलेक्ट्रॉनिक… Continue reading
Recent Posts
