काव्यानंद
-
Soulful Verses: A Symphony of Poems Unveiled
by Ms. Radha Odhekar & Ms. Shatakshi Risbud You Can Failure is okayBut you must try again,You have a second chance,For there’s no winning without pain. You must never say I can’t,For surely it’s not true!And there’s a fighting spirit,Deep down inside of you. You must never feel remorse,You must never feel regret,For surely you’ll have taken,Every… Continue reading
-
नदीकिनारी पाऊस !
गोदावरीच्या तीरावरती, आनंद होतो पाहतांना,मुले पोहती पाण्यात, हसता हसता खेळतांना !! झाडे उगवली, फुले उमलली नदीच्या तीराला,शोभा पाहुनी मुले आली, पाने फुले वेचायला,मुलांचे विनोद ऐकुन, ढग हसले पोट धरून,हसता हसता त्यांच्याकडील, पाणी उडाले भरभरून !! मुलेही भिजली, फुले ही भिजली, पावसाच्या पाण्यातसंगतीला आले मोर सारे, नाचू लागले रानात,मोर, फुलं, मुलं सारे, संगतीने नाचु लागलेत्यांना पाहून… Continue reading
-
कुब्जा : कवयित्री इंदिरा संत यांच्या कवितेबद्दल मनोगत
– श्री. विनय कुलकर्णी अजून नाही जागी राधा,अजून नाही जागें गोकुळअशा अवेळीं पैलतीरावर,आज घुमे कां पावा मंजुळ ll माझ्या आईचे हे अगदी आवडते गाणे. आपण हे गाणे छान आणि सुरात म्हणतो हे माझ्या आईला पक्के ठावूक आहे. कुठल्याही घरगुती समारंभात माझ्या आईला गाणं म्हणण्याचा आग्रह झाला की, जी काही ठराविक गाणी ती अगदी तयारीने म्हणत… Continue reading
-
Path to Change
राधा धनंजय ओढेकर ! बारा-तेरा वर्षांची चिमुरडी ! तिच्या वर्ग शिक्षकांच्या ग्रीटिंग कार्डसाठी तिने ही Path to Change ही इंग्रजी कविता लिहिली आणि आल्या लेकीकडून प्रेरणा घेऊन तिच्या आईने त्या कवितेचा मराठीत स्वैर अनुवाद केला आहे !! या दोन्ही कविता , अल्पारंभाच्या वाचकांसाठी !! Path to ChangeThe path to change is dark and coldTo crosss,… Continue reading
-
संत जनाबाईंची मानसहोळी
संत जनाबाईंची मानसहोळी कराया साजरा | होलिकेचा सण | मनाचे स्थान | निवडिले || ऐसे ते स्थान | साधने सारवले | भक्तीने शिंपिले | केले सिद्ध || त्या स्थानी खळगा | समर्पणाचा केला | त्यात उभा ठेला | अहंकार एरंड || रचलीया तेथे | लाकडे वासनांची | इंद्रीय गोवऱ्याची | रास भली || गुरुकृपा… Continue reading
-
बोलावे ऐसे..
बोलावे ऐसे, न व्हावे जे रटाळ, 🥱 नेमकेच वदावे, का ठरावे वाचाळ !! 🤬 लिहावे ऐसे, मांडावा मतितार्थ, 🎯 कमी,अचूक शब्दांत, उतरवावा अर्क !! 💧 ऐकावे ऐसे, की समजून घ्यावे,😊 प्रतिक्रिया टाळुनी, प्रतिसादा द्यावे !!😇 वर्तावे ऐसे, जे बोलू ते चालावे, 😎 गदारोळ टाळुनिया, जगा शांतवावे !!😇 ऐसे गुणदर्शने, जनी जनी वाढितो सन्मान,🙌🏽 अपेक्षित फलश्रुती,अपेक्षित परिणाम !!🎯 – रुपाली Continue reading
-
सिग्नलवरची दिवाळी …
– डॉ. रुपाली दिपक कुलकर्णी पुन्हा एकदा दीपावली, रोषणाई, खरेदी,फराळ आणि आप्त, या सगळयात रममाण असतानाही, मनात थोडीशी असते खंत ! आठवतात तेव्हाही, सिग्नलवर भटकून आकाशदिवे,पणत्या विकणारी मुले, काय करत असतील ते, जेव्हा फटाके उडवितात आपले चिमुकले ? सिग्नल लाल होईपर्यन्त, नजर त्यांची न्याहाळत असते आकाशातील रोषणाई, एकमेकांना दाखवायची असते त्यांना, आपण पाहत असलेली नवलाई… Continue reading
-
विसर्जन ?
जो सुखकर्ता, दुःखहर्ता, लंबोदर, जो अनंत,सर्वव्यापी,सर्वदूर, ज्याच्यासाठी वाहतो भक्तीचा पूर, जो आमच्या जगण्याचा असे सूर !! भक्तांच्या मनी अधिष्ठित गजानन, त्याचे काय संभव विसर्जन ? संकल्प घ्यावा त्यास आज प्रार्थून, मीपणा आणि अहंभावाचे, करितो आज विसर्जन !! 🙏🏼 – रुपाली Continue reading
-
वाकळ
संत जनाबाईला दळण—कांडणात मदत करणारा पंढरपूरचा पांडुरंग, परत जाताना त्याचा शेला विसरतो व चुकून तिची वाकळ घेऊन जातो, ह्या प्रसंगावर मराठवाड्यातील ज्येष्ठ कवी दिवंगत श्री. दि. इनामदार ह्यांनी लिहिलेली एक “वाकळ” नावाची सुंदर कविता वाचनात आली. ती आपणांसाठी सादर. पीठ शेल्याला लागले, झाला राऊळी गोंधळ कुण्या घरचे दळण, आला दळून विठ्ठल पीठ चाखले एकाने, म्हणे… Continue reading
-
चित्रकाव्य : कौलारू घर
असावे सुंदर 👌🏽 कौलारू घर 🏠 आणि सभोताली 😇 आप्तांचा वावर 👨👩👧👧 लाल अंगणी साजिरे 🏡 शोभे भरदार वृंदावन 🍃 चाफा, जास्वंदी , मोगरीने 🥀🌺 सतत धुंदाविते मन 😊 नारळी, केळी,पोफळीची 🌴🌴 छपरावरी चामर दारी उभे स्वागताला 😊 आंबे, फणस तत्पर 🙏🏼 दरवळ भोजनाचा रांधे सुगरणीचा हात 🍤🥙🥭 मन आणि पोट 😊 भर तृप्तीची… Continue reading
Recent Posts
