ललित
-
लाल मातीवरील नदालवाद !
– बरोबर दोन दशकांपूर्वी घडलेली घटना! २००५साल होते ते. त्या १९वर्षीय टेनिसपटूने नुकतीच पहिल्याच प्रयत्नांत फ्रेंच ओपन जिंकली होती. साहजिकच सर्व स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत होता.त्याच्या जवळच्या वर्तुळातील एक व्यक्ती मात्र अगदी तटस्थपणे या साऱ्याकडे बघत होती. त्या युवा टेनिसपटूचा प्रशिक्षक, टोनी, जो त्याचा काकाही होता. त्याने अतिशय थंडपणे त्याला सांगितले की, “मुला,तुझा प्रतिस्पर्धी Continue reading
-
पं. ओंकार गुलवडी – लयदार ठेक्याचा मानदंड: श्री. धनंजय खरवंडीकर
– गेली अनेक वर्षे ओंकारजींच्या लयदार ठेक्यातून, रसिक श्रोते ओंकाराच्या नादाची अनुभूती घेत आलेले आहेत. प्रथमतः त्यांच्या ८० च्या वाढदिवसानिमित्त त्यांना चरणस्पर्श आणि त्यांच्या दिर्घायुष्यासाठी संगीतातील अनाहताला विनम्र प्रार्थना! काही वर्षांपूर्वी अहमदनगरमधील (सध्याचे अहिल्यानगर) आमच्या बंदिश या संस्थेसाठी विदुषी पद्माताई तळवलकर यांची मैफल सुरु होती. ओंकारजी, तबल्याच्या साथीसाठी होते. विलंबित झुमरा सुरू होता. ओंकारजींचा लयदार, Continue reading
-
औली: स्किईंगचा चित्तथरारक अनुभव !
विश्राम (संजू) व शुभांगी कुलकर्णी, पुणे. मित्र मैत्रिणींनो व प्रियजनांनो……तुंम्हा सर्वांना कल्पना आहेच की दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात मी उत्तराखंडमध्ये औलीच्या सुंदर हिमालयीन पर्वतरांगांच्या उतारांवर कमीतकमी एक आठवडा तरी स्किईंग हा साहसी खेळ खेळावयास जातो. यावर्षी सुध्दा आंम्ही दहा हरहुन्नरी सदस्यांनी २२ ते २८ फेब्रुवारी, २०२५ हा एक आठवड्याचा कालावधी स्किईंग करण्याचा बेत पक्का केला व Continue reading
-
काठावरील प्रवास..
डाॅ. सौ.मृणालिनी दोडके माणुस हा सामाजिक प्राणी आहे आणि तो सामाजिक रचनेमधे आपले कर्तृत्व, वक्तृत्व,सर्जनशीलता, बौद्धिक उर्जा ह्याचे देवाण-घेवाण करत असतो. समाज रचनेमधे तो स्वतःला निश्चिंत आणि सुरक्षित ठेवू शकतो. ह्या समाजरचनेत शिक्षण व्यवस्था, कुटुंब व्यवस्था, लग्न व्यवस्था, उद्योग-नोकरी हे घटक माणसाला प्रगत बनवायला अनेक व्यवस्था वर्षानुवर्ष कार्यरत आहे. साधारण १९७०-१९७५ दरम्यान एखाद्या कुटुंबात ३ Continue reading
-
नाशिकच्या संगीत मैफलींच्या स्वरूपात होणारे बदल
डॉ. आशिष रानडे कुठलाही संगीत प्रकार म्हणला की त्यात सादरीकरण हे त्या अनुषंगाने आलंच. मग ते कुठल्यातरी देवाला प्रसन्न करण्यासाठी असो, राजाला प्रसन्न करण्यासाठी असो, लोकरंजनासाठी असो.. त्यात त्या ‘कलेचं सादरीकरण’ हा भाग अतिशय महत्वाचा आहेच. त्याशिवाय कुठलीही कला ही परिपूर्ण म्हणता येणार नाही. नाशिक मधील शास्त्रीय संगीताच्या मैफिली आणि त्यांच बदलत स्वरूप या विषयावर Continue reading
-
तुम्हाला फक्त वाटतंय की तुम्ही विचार करताय !

AI आणि लिखाण मी तंत्रज्ञानाबद्दल भविष्यवाणी करायला फारसा उत्सुक नसतो, पण मला पूर्ण खात्री वाटू लागली आहे की काही दशकांनंतर फार कमी लोक लिहू शकतील. खरं तर, लिहिणं हे मुळातच अवघड काम आहे. चांगलं लिहायचं असेल तर नीट विचार करावा लागतो, आणि तोच मुख्य त्रास आहे – कारण स्पष्ट विचार करायला स्वतःचं डोकं लावावं लागतं. Continue reading
-
विचारांची दिशा जेंव्हा खिशातून जाते तेंव्हा..
डाॅ. सौ. मृणालिनी दोडके ‘विचारांची दिशा जेंव्हा खिशातून जाते तेंव्हा..’, काल वर्तमान पत्रातील एका लेखात हे वाक्य वाचले आणि ते आजच्या युगात किती तंतोतंत लागू पडते ह्याची जाणीव झाली. त्याची पार्श्वभूमी म्हणजे IIT मधील विद्यार्थी, सरकारच्या खर्चाने पदवी घेतात आणि नंतर स्वतःच्या खिशाचा विचार करत बाहेरच्या देशात निघून जातात. किती खरी परिस्थिती आहे ! फार Continue reading
-
आशादायक स्वप्नांपासून ते वेदनादायी अनुभवांपर्यंत !
साक्षी देशमुख – मानसशास्त्रज्ञ यांचा एक अनुभव ही कथा आहे अर्जुनची ! १९ वर्षांचा अर्जुन, तरुण वयातच आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि त्याद्वारे जीवनमान उंचाविण्यासाठी अनेक महत्त्वाकांक्षा उराशी बाळगून होता. या सुंदर, आशादायक स्वप्नापासून सुरु झालेला त्याचा प्रवास त्याच्याच काही चुकांमुळे, मानसिकतेमुळे त्याला कर्जाच्या खाईपर्यंत कसा घेऊन गेला ते बघुयात. हे सर्व सुरू झाले एका स्वप्नापासून! Continue reading
-
भावपूर्ण काव्य-श्रद्धांजली स्व . उस्ताद झाकीर हुसेनजींना.
श्री. शंतनु श्रीरंग गुणे. त्याच्या ह्रुदयी होती शिवतांडवातली शिवभूत लय आणि डमरूतल्या अंगभूत उर्जेचा, आहत नाद, जन्मतःच गुरूपित्याने,अभिजात तालमंत्राची संथा देत, घातली सृष्टीच्या सृजनत्वाला साद ! विधात्याच्या प्रसन्न आशिर्वादातून उमलले ते नादपुष्प, लयतालाभिषेकातून, अखिल मानवाजातीवर नादब्रह्माचा वर्षाव करायला, प्रत्येक व्यक्तित्वात असलेल्या, सुप्त वा प्रकट सांगितिक तत्वाला, जागृत व चैतन्यमय करायला ! त्याच्या नुसत्या आगमनानेच, कलामंचावर Continue reading
-
स्त्री आणि काॅॅर्पोरेेट जग
डाॅ.सौ.मृणालिनी दोडके. गेली २५ वर्ष काॅॅर्पोरेेट जगताचा अनुभव घेतल्यानंतर एक सुजाण स्त्री म्हणुन काॅॅर्पोरेेट जगतातील स्त्रीची वाटचाल आणि त्या अनुषंगाने कार्पोरेट मधील चांगली व वाईट बाजू मांडणे ह्यावर आजचा लेख. नोकरदार स्त्रियांचा कारकिर्दीकडे बघण्याचा दृष्टीकोनही कसा महत्वाचा आहे हेही मांडण्याचा हा प्रयत्न ! सौ. सूधा मूर्ती ह्यांचेकडे आज सारे जग अभिमानाने बघते. त्यांचा प्रवास हा Continue reading
Recent Posts
