काव्यानंद
-
SWS – ३१ वर्षांचा प्रवास
– एकतीस वर्षांचा प्रवास.. खेळ नाही केवळ आकड्यांचा,एक संपन्न कालखंड हा.. जोडल्या गेलेल्या नात्यांचा !ग्राहकांच्या विश्वासाचा, अखंड तेवतो नंदादीप,हजार कोटींचा टप्पा गाठत, यश आले आणखी समीप !! तंत्रज्ञानाच्या वेगात आणि AI च्या नवयुगात,ग्राहकांचा विश्वास स्थिर, अजूनही प्रत्येक क्षणात !GPT आणि अँप्स द्वारे, जरी सर्व माहिती तुमच्या हातात,तरीही निर्णय घ्यायला लागतोय, आपल्या माणसांचाच आधार !! कारण… Continue reading
-
कविता : तगमग
– तगमग…बघून शहरातली,धूर ,आवाजी दिवाळी,ह्रदयी काजळी,पसरे माझ्या! धूर, दणक्यात,त्यांना येते मजा,पर्यावरणा सजा,दुर्लक्षती ! कोंडला किती,पृथ्वीचा श्वास,प्राणिमात्रास त्रास,चालला रे ! बहुतेकांनी,बांधले हो डोळे,का असे हे सोहळे,चालले रे ! कोणा सांगणे – शिकवणे,झाले आहे व्यर्थ,आनंदाचा स्वार्थ,चोहीकडे ! शोध मग जीवा,असे शांत जग,जिथे नसे तगमग,कोणाचीही! -सौ. रुपाली दिपक कुलकर्णी Continue reading
-
विसर्जन ?
– जो सुखकर्ता, दुःखहर्ता, लंबोदर,जो अनंत,सर्वव्यापी,सर्वदूर,ज्याच्यासाठी वाहतो भक्तीचा पूर,जो असे आमच्या जगण्याचा सूर !! अशा श्रीगणेशाचा आनंदमयी सण,हर्षोल्हासाची सर्वत्र करितो उधळण,भक्ती- उत्साहाने उजळते जीवन,आयुष्यातील चिंता जणू विसरते मन !! गाठीभेटी अन आरती-प्रसाद,मोरया जयघोषाचा घुमतसे नाद,परस्परांतील वाढवितो संवाद,लाडक्या बाप्पाचा जणू हाच आशीर्वाद !! त्याच्या पावलांनीच होते गौरींचे आगमन,भक्तिभावाने साजरा होतो तोही सण,लक्ष्मी सेवेचे मिळते अतीव समाधान,एकत्र… Continue reading
-
हेच मागणे गणरायाला
– जगास साऱ्या सुखात ठेवा, हेच मागणे गणरायाला,संकटकाळी तुम्हीच धावा, हेच मागणे गणरायाला.. जरी वेगळे विचार अमुचे, माणुस म्हणुनी नको दुरावा,मनामनातिल मिटवा हेवा, हेच मागणे गणरायाला.. दुर्वांची मी जुडी वाहतो, मोदक लाडू अर्पण करतो,खिरापतीचा प्रसाद घ्यावा, हेच मागणे गणरायाला.. लहानग्यांचे तुम्ही लाडके, ज्येष्ठांचेही आवडते हो,तरुणाईला रस्ता दावा, हेच मागणे गणरायाला.. अनेक नावे जरी तुम्हाला, एकोप्याचे… Continue reading
-
अनुभव : बियास कुंड ट्रेक
– मे २०२५ मध्ये आम्ही जवळपास ३५ जणांच्या मित्र मैत्रिणींच्या ग्रुपने, IBEX HIKES च्या मार्गदर्शनाखाली तीन दिवसांचा, मॉडरेट कॅटेगरीतला बियास कुंड ट्रेक केला. मनालीजवळील हिमाचल प्रदेशातील बियास कुंड सुमारे १२,२०० फूट उंचीवर वसलेलं आहे. हा ट्रेक करण्यासाठी उन्हाळ्याचे दिवस चांगले. ट्रेक मार्गावरील हिरवीगार कुरणे, फुलांनी बहरलेली झुडुपे, हिमाच्छादित पर्वत शिखरे, सोबतीला खळाळत वाहणारी बियास नदी… Continue reading
-
कविता
–मंजिरी विश्वनाथ भारती कृष्ण असे माझा सखा कृष्ण असे माझा सखादेई मज नित्य साथ ।धाव घेई सावरण्याहरी माझा जगन्नाथ। तारी मज राधावरकृपा करी कृपाघन।दावी दया अनाथासीघेई मज स्वीकारून । आले आले चरणाशीमाथा पदी झुकवून ।सुख वाटे माझ्या जीवागाता मुखी तुझे गुण । नको पसारा मजलामाया , बंधने , आसक्ती ।मन विटले संसाराहरी देई मज मुक्ती… Continue reading
-
मायने..
– रुपाली ज़िंदगी के सफ़र में कई बार मायनों का वज़न समय, दिशा और समझ पर टिक जाता है यह कविता उन अनकहे सवालों, अधूरे प्रयासों और बिखरते रिश्तों की बात करती है, जो वक्त की कसौटी पर खरे न उतरने पर अपना अर्थ खो बैठते हैं। Continue reading
Recent Posts
