।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन


अल्पारंभ

  • तुमचं विस्मृतीत गेलेले धन परत मिळवा @ RBI UDGAM Portal

    – पुरेशी काळजी घेतली नाही ,कागदपत्रांची नीट नोंद ठेवली नाही, आळसापोटी दुर्लक्ष केले की कधी कधी आपलीच संपत्ती आपल्या नकळत गहाळ होते. आणि जेव्हा अशा अनेकांची हीच परिस्थिती होते तेव्हा लहान -सहान ठेवी एकत्रितपणे मोठा आकडा उभा करतात. जुलै २०२५ च्या आकडेवारीनुसार भारतीय बँकांमध्ये ₹६७,००३ कोटींपर्यंतच्या अवशेष ठेवी (Unclaimed Deposits) जमा आहेत. ही ठेवी अनेकदा… Continue reading

  • सायबर गुन्हेगारी आणि RBI ची मार्गदर्शक तत्वे

    – गेल्या काही महिन्यात अल्पारंभाच्या ब्लॉग्स आणि कार्यक्रमांद्वारे ‘सायबर गुन्हेगारी आणि प्रकार’ यासंबंधी जगजागृती करण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे. नुकतेच १९ जुलै २०२५ रोजी CoinDCX या भारतातील सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंजपैकी एक असलेल्या एक्स्चेंजवर मोठा सायबर हल्ला झाला. त्यानिमित्ताने क्रिप्टो आणि डिजिटल करन्सीच्या वापराबाबत RBI ने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांवर चर्चा होणे गरजेचे वाटते. CoinDCX च्या… Continue reading

  • दुहेरी परीक्षा – परीक्षेचे पावित्र्य तर कमी करणार नाही?

    – नवीन शैक्षणिक धोरणामध्ये (२०२०), विद्यार्थी-केंद्रित दृष्टिकोनातून, विद्यार्थांची वर्षातून दोनदा परीक्षा घेतली पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्यांवर परीक्षेचा ताण कमी होईल व अधिक लवचिकता मिळेल आणि त्यामुळे आनंददायी शिक्षण वातावरण निर्माण होईल,अशी शिफारस करण्यात आली होती. त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई), सन २०२६ पासून,एका शैक्षणिक सत्रात दहावीच्या बोर्ड परीक्षा दोनदा घेण्याच्या नियमांना नुकतीच… Continue reading

  • अनुभव : बियास कुंड ट्रेक

    – मे २०२५ मध्ये आम्ही जवळपास ३५ जणांच्या मित्र मैत्रिणींच्या ग्रुपने, IBEX HIKES च्या मार्गदर्शनाखाली तीन दिवसांचा, मॉडरेट कॅटेगरीतला बियास कुंड ट्रेक केला. मनालीजवळील हिमाचल प्रदेशातील बियास कुंड सुमारे १२,२०० फूट उंचीवर वसलेलं आहे. हा ट्रेक करण्यासाठी उन्हाळ्याचे दिवस चांगले. ट्रेक मार्गावरील हिरवीगार कुरणे, फुलांनी बहरलेली झुडुपे, हिमाच्छादित पर्वत शिखरे, सोबतीला खळाळत वाहणारी बियास नदी… Continue reading

  • लाल मातीवरील नदालवाद !

    – बरोबर दोन दशकांपूर्वी घडलेली घटना! २००५साल होते ते. त्या १९वर्षीय टेनिसपटूने नुकतीच पहिल्याच प्रयत्नांत फ्रेंच ओपन जिंकली होती. साहजिकच सर्व स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत होता.त्याच्या जवळच्या वर्तुळातील एक व्यक्ती मात्र अगदी तटस्थपणे या साऱ्याकडे बघत होती. त्या युवा टेनिसपटूचा प्रशिक्षक, टोनी, जो त्याचा काकाही होता. त्याने अतिशय थंडपणे त्याला सांगितले की, “मुला,तुझा प्रतिस्पर्धी… Continue reading

  • सॅपियन्स – एका विलक्षण प्रवासाची विचारप्रवर्तक सांगड : श्री. बिपीन बाकळे

    – ‘सॅपियन्स’ हे पुस्तक केवळ मानवाच्या इतिहासाचा आलेख मांडत नाही, तर तो आपल्याला अंतर्मुख करणारा आणि अस्वस्थ करणारा प्रवास आहे. युवाल नोआ हरारी यांनी आपल्याला साडेतेरा अब्ज वर्षांचा प्रचंड कालपट समोर ठेवला आहे आणि तो माणसाच्या डोळ्यांसमोर अगदी तपशीलात उलगडतो. पण ही संख्या – साडेतेरा अब्ज वर्षं – सामान्य मनाला समजेल अशी नाही. साडेतेरा अब्ज… Continue reading

  • पर्यावरण संरक्षणार्थ खारीचा वाटा

    आपल्या सर्वाना माहीतच आहे की भारत हा जगातील क्रमांक एकचा प्लास्टिक प्रदूषक देश आहे. भारत दरवर्षी ९.३ दशलक्ष टन प्लास्टिक कचऱ्याची पर्यावरणात भर घालतो आहे. धरती, पाणी, वायू यांचे अतिरेकी प्रदूषण जगभरात सुरु आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन ‘खारीचा वाटा’ या विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या लहान मुलांच्या संघटनेने आपल्याला ह्यावर काय करता येईल यावर समाधान… Continue reading

  • कविता

    –मंजिरी विश्वनाथ भारती कृष्ण असे माझा सखा कृष्ण असे माझा सखादेई मज नित्य साथ ।धाव घेई सावरण्याहरी माझा जगन्नाथ। तारी मज राधावरकृपा करी कृपाघन।दावी दया अनाथासी‌घेई मज स्वीकारून । आले आले चरणाशीमाथा पदी झुकवून ।सुख वाटे माझ्या जीवागाता मुखी तुझे गुण । नको पसारा मजलामाया , बंधने , आसक्ती ।मन विटले संसाराहरी देई मज मुक्ती… Continue reading

  • पं. ओंकार गुलवडी – लयदार ठेक्याचा मानदंड: श्री. धनंजय खरवंडीकर

    – गेली अनेक वर्षे ओंकारजींच्या लयदार ठेक्यातून, रसिक श्रोते ओंकाराच्या नादाची अनुभूती घेत आलेले आहेत. प्रथमतः त्यांच्या ८० च्या वाढदिव‌सानिमित्त त्यांना चरणस्पर्श आणि त्यांच्या दिर्घायुष्यासाठी संगीतातील अनाहताला विनम्र प्रार्थना! काही वर्षांपूर्वी अहमदनगरमधील (सध्याचे अहिल्यानगर) आमच्या बंदिश या संस्थेसाठी विदुषी पद्‌माताई तळवलकर यांची मैफल सुरु होती. ओंकारजी, तबल्याच्या साथीसाठी होते. विलंबित झुमरा सुरू होता. ओंकारजींचा लयदार,… Continue reading

अल्पारंभाविषयी अधिक माहिती:

Our Officlal Website

 ई-मेल:alparambha@gmail.com

दुरध्वनी: ९०११८९६६८१