।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन


अल्पारंभ

  • सिग्नलवरची दिवाळी …

    – डॉ.  रुपाली दिपक कुलकर्णी   पुन्हा एकदा दीपावली, रोषणाई, खरेदी,फराळ आणि आप्त, या सगळयात रममाण असतानाही, मनात थोडीशी असते खंत ! आठवतात तेव्हाही, सिग्नलवर भटकून आकाशदिवे,पणत्या विकणारी मुले, काय करत असतील ते, जेव्हा फटाके उडवितात आपले  चिमुकले ?  सिग्नल लाल होईपर्यन्त, नजर त्यांची  न्याहाळत असते आकाशातील रोषणाई, एकमेकांना दाखवायची असते त्यांना, आपण पाहत असलेली नवलाई… Continue reading

  • लाल बहादूर शास्त्री

     भारतीय राजकारणातील अत्यंत निस्पृह, स्वच्छ व्यक्तिमत्त्व – लाल बहादूर शास्त्री- जयंती २ ऑक्टोबर. ११८ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! प्रसंग १.  देशाच्या केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची आई एका कार्यक्रमात पोचली. अर्थात तिला कोणीच ओळखले नाही. तिने चौकशी केली की, माझा मुलगा तिथे आला आहे. तुम्ही पाहिलं का? लोकांनी विचारले की तो काय करतो? ती म्हणाली की तो रेल्वेत… Continue reading

  • ग्रंथराज ज्ञानेश्वरी: भावार्थ-दीपिका…चिंतन

        श्रीमद् भगवद् गीता म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी महाभारताच्या युद्धप्रसंगी केलेलेला उपदेश आहे हे आपणां सर्वांना माहित आहे. अर्जुनाच्या मनात विषाद निर्माण झाला. आणि तो म्हणू लागला , मी युद्ध करणार नाही. तो स्व-धर्मा पासून दूर जावू लागला. अर्जुन हा कृष्णाचा सखा आहे. अर्जुनाच्या निमित्ताने भगवंतांनी आपणां सर्वांच्या कल्याणासाठी कुरुक्षेत्रावर गीता सांगितली. आणि अर्जुनास बोध… Continue reading

  • विसर्जन ?

    जो सुखकर्ता, दुःखहर्ता, लंबोदर, जो अनंत,सर्वव्यापी,सर्वदूर, ज्याच्यासाठी वाहतो भक्तीचा पूर, जो आमच्या जगण्याचा असे सूर  !!  भक्तांच्या मनी अधिष्ठित गजानन, त्याचे काय संभव  विसर्जन ? संकल्प घ्यावा  त्यास आज प्रार्थून, मीपणा आणि अहंभावाचे, करितो आज  विसर्जन !! 🙏🏼 – रुपाली Continue reading

  • शूरा मी वंदिले – अनघा मोडक

        II  ॐ स्वातंत्र्यलक्ष्मी कि जय II भारतीयस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने अल्पारंभा एज्यूकेशनल फाऊंडेशन, नाशिक आणि  महाराष्ट्रसमाज सेवा संघ तसेच  नाशिकशिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने, “शूरा मी वंदिले !” याकार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  सुप्रसिद्धआकाशवाणी निवेदिका, अनघा मोडक हिने , स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील शूरवीर सैनिकांच्या कथा, गाथा आपल्या अमोघ वाणीद्वारे  शालेयमुलांसमोर उलगडल्या !! रचनाविद्यालय… Continue reading

  • मनोगत : अल्पारंभाच्या उपक्रमांविषयी : श्री. अविनाश गोसावी.

      अल्पारंभा एज्यूकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन या संस्थेचा २०१८ साली उदय झाला. संस्थेची प्राथमिक उद्दिष्ट्ये ठरवितांना, अर्थातच समाजावर प्राथमिक परिणाम करणारी, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्र ही प्रामुख्याने विचारात घेतली गेली. या दोन्ही विषयांच्या कक्षेत कार्य करतांना, त्यातील विविध निकडी ओळखून, त्यासाठी कार्य करणाऱ्या संस्थांना मदत करणे आणि त्या निगडीत उपक्रम राबवणे हे अप्लारंभाचे प्राथमिक उद्दिष्ट्य… Continue reading

  • हरवून सापडलेल्या मोबाईलची गोष्ट

     हरवून सापडलेल्या मोबाईलची गोष्ट सेंट्रल पार्क येथे चालू असलेल्या घे भरारीच्या भव्य प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी भेट देण्यासाठी माझी मावशी  आली होती. तशी ती बहुतेक सर्व घे भरारीच्या प्रदर्शनात आवर्जून भेट देतेच. पण काल मात्र प्रदर्शना दरम्यान तिचा मोबाईल हरवला. सध्याच्या दिवसांत मोबाईल म्हणजे प्राणवायू. तो जितका अचानक हरवला तितक्याच आश्चर्यकारक रितीने सापडला देखील. त्याला कारणीभूत… Continue reading

  • उगवतीचे रंग : मृत्यूकडून जीवनाकडे…

     मृत्यूकडून जीवनाकडे… कधी कधी हे सत्य हे कल्पनेपेक्षा भयानक असते. आपण स्वप्नातही कल्पना करू शकणार नाही अशा गोष्टी प्रत्यक्षात घडतात. अशीच ही एका मुलीची कथा. अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून वाचलेली. जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती कोणता चमत्कार घडवू शकते, त्याचे प्रत्यंतर देणारी. ही घटना आहे २४ डिसेंबर १९७१ ची. ज्युलियन कोपकी, एक १७ वर्षांची मुलगी. पेरू देशाची राजधानी… Continue reading

  • हस्ताक्षरातील अक्षर…

    काही मान्यवर अन् प्रथितयश साहित्यिकांच्या हस्ताक्षरातलं एक अक्षर जरी कळत असेल तर शपथ.’ असे काही प्रकाशक आणि संपादक सदरहू साहित्यिकांच्या लिखाणाऐवजी ‘लेखना’वर टिप्पणी करताना जरूर बोलून जातात. याला काही माननीय अपवाद असतील, नाही असे नाही. तरीही यथातथा असलेल्या अक्षरातूनच ‘अक्षर’ वाङ्मय निपजते यात कुणाला शंका नसावी. हस्ताक्षर चांगले नाही वा संपादकांना वाचन सुलभ व्हावे म्हणून… Continue reading

  • वाकळ

    संत जनाबाईला दळण—कांडणात मदत करणारा पंढरपूरचा पांडुरंग, परत जाताना त्याचा शेला विसरतो व चुकून तिची वाकळ घेऊन जातो, ह्या प्रसंगावर मराठवाड्यातील ज्येष्ठ कवी दिवंगत श्री. दि. इनामदार ह्यांनी लिहिलेली एक “वाकळ” नावाची सुंदर कविता वाचनात आली. ती आपणांसाठी सादर. पीठ शेल्याला लागले, झाला राऊळी गोंधळ कुण्या घरचे दळण, आला दळून विठ्ठल पीठ चाखले एकाने, म्हणे… Continue reading

अल्पारंभाविषयी अधिक माहिती:

Our Officlal Website

 ई-मेल:alparambha@gmail.com

दुरध्वनी: ९०११८९६६८१