।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन


कविता

  • कविता : तगमग

    – तगमग…बघून शहरातली,धूर ,आवाजी दिवाळी,ह्रदयी काजळी,पसरे माझ्या! धूर, दणक्यात,त्यांना येते मजा,पर्यावरणा सजा,दुर्लक्षती ! कोंडला किती,पृथ्वीचा श्वास,प्राणिमात्रास त्रास,चालला रे ! बहुतेकांनी,बांधले हो डोळे,का असे हे सोहळे,चालले रे ! कोणा सांगणे – शिकवणे,झाले आहे व्यर्थ,आनंदाचा स्वार्थ,चोहीकडे ! शोध मग जीवा,असे शांत जग,जिथे नसे तगमग,कोणाचीही! -सौ. रुपाली दिपक कुलकर्णी Continue reading

  • विसर्जन ?

    – जो सुखकर्ता, दुःखहर्ता, लंबोदर,जो अनंत,सर्वव्यापी,सर्वदूर,ज्याच्यासाठी वाहतो भक्तीचा पूर,जो असे आमच्या जगण्याचा सूर !! अशा श्रीगणेशाचा आनंदमयी सण,हर्षोल्हासाची सर्वत्र करितो उधळण,भक्ती- उत्साहाने उजळते जीवन,आयुष्यातील चिंता जणू विसरते मन !! गाठीभेटी अन आरती-प्रसाद,मोरया जयघोषाचा घुमतसे नाद,परस्परांतील वाढवितो संवाद,लाडक्या बाप्पाचा जणू हाच आशीर्वाद !! त्याच्या पावलांनीच होते गौरींचे आगमन,भक्तिभावाने साजरा होतो तोही सण,लक्ष्मी सेवेचे मिळते अतीव समाधान,एकत्र… Continue reading

अल्पारंभाविषयी अधिक माहिती:

Our Officlal Website

 ई-मेल:alparambha@gmail.com

दुरध्वनी: ९०११८९६६८१