।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन


Contents@SWS

  • निःशब्द आधारस्तंभ : दिव्यांग व्यक्तींच्या विकासातील काळजीवाहकांची भूमिका

    निःशब्द आधारस्तंभ : दिव्यांग व्यक्तींच्या विकासातील काळजीवाहकांची भूमिका

    साक्षी देशमुख – मानसशास्त्रज्ञ दिव्यांग व्यक्तींची काळजी घेणे , मग ते दृष्टिहीन, श्रवणबाधित असोत किंवा त्यांना कोणत्याही शारीरिक अथवा बौद्धिक अडचणी असोत ही केवळ सेवा नव्हे, तर प्रेम, चिकाटी आणि भावनिक गुंतवणुकीची एक अविरत प्रक्रिया असते. कुटुंबातील सदस्य, व्यावसायिक किंवा संस्थात्मक कर्मचाऱ्यांच्या रूपाने काळजीवाहक (Caregivers) हे या व्यक्तींच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण आधारस्तंभ असतात. केवळ दैनंदिन मदत पुरवण्यापलीकडे Continue reading

  • डेटा सेंटर्समुळे जलसंकटात वाढ होणार?

    डेटा सेंटर्समुळे जलसंकटात वाढ होणार?

    प्रा.डॉ.संजय छाया त्रिंबकराव खडक्कार आर्टिफिशियल इंटेलिजन्स ,बिग डेटा आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज असलेल्या तंत्रज्ञानाच्या युगात,आपण एकामेकाशी नेहमीपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे जोडल्या गेलो आहोत. या जोडण्याला (कनेक्टिव्हिटीला) शक्ती देणारी पायाभूत सुविधा म्हणजे डेटा सेंटर्स,आपल्याला ऑनलाइन ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व्हर आणि स्टोरेज सिस्टम्स असलेल्या भौतिक इमारती, यामुळे आपले डिजिटल जग अविरत चालू आहे. संगणकीय-केंद्रित कामाची उर्जा कार्यक्षमता Continue reading

  • खो-खो विश्वचषक २०२५: भारताचे दुहेरी यश !!

    – २०२५ सालचा खो-खो विश्वचषक हा पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला होता. भारत या विश्वचषकाचा आयोजक देश होता. नवी दिल्लीतील इंदिरा गांधी एरिनामध्ये १३ ते १९ जानेवारी २०२५ दरम्यान या विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जगभरातील २० पुरुष आणि १९ महिला संघांनी सहभाग घेतला होता. भारताने खो-खो विश्वचषकाच्या पहिल्याच आवृत्तीमध्ये पुरुष आणि महिला दोन्ही Continue reading

  • आशादायक स्वप्नांपासून ते वेदनादायी अनुभवांपर्यंत !

    साक्षी देशमुख – मानसशास्त्रज्ञ यांचा एक अनुभव ही कथा आहे अर्जुनची ! १९ वर्षांचा अर्जुन, तरुण वयातच आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि त्याद्वारे जीवनमान उंचाविण्यासाठी अनेक महत्त्वाकांक्षा उराशी बाळगून होता. या सुंदर, आशादायक स्वप्नापासून सुरु झालेला त्याचा प्रवास त्याच्याच काही चुकांमुळे, मानसिकतेमुळे त्याला कर्जाच्या खाईपर्यंत कसा घेऊन गेला ते बघुयात. हे सर्व सुरू झाले एका स्वप्नापासून! Continue reading

  • भावपूर्ण काव्य-श्रद्धांजली स्व . उस्ताद झाकीर हुसेनजींना.

    श्री. शंतनु श्रीरंग गुणे. त्याच्या ह्रुदयी होती शिवतांडवातली शिवभूत लय आणि डमरूतल्या अंगभूत उर्जेचा, आहत नाद, जन्मतःच गुरूपित्याने,अभिजात तालमंत्राची संथा देत, घातली सृष्टीच्या सृजनत्वाला साद ! विधात्याच्या प्रसन्न आशिर्वादातून उमलले ते नादपुष्प, लयतालाभिषेकातून, अखिल मानवाजातीवर नादब्रह्माचा वर्षाव करायला, प्रत्येक व्यक्तित्वात असलेल्या, सुप्त वा प्रकट सांगितिक तत्वाला, जागृत व चैतन्यमय करायला ! त्याच्या नुसत्या आगमनानेच, कलामंचावर Continue reading

  • सायबर गुन्हेगारी : प्रकार आणि तपास यंत्रणा

    डॉ. रुपाली कुलकर्णी सध्याचे युग हे डिजीटलयुग आहे. कोणत्याही दुकानातील UPI पेमेंटपासून ते बॅकिंग व्यवहारापर्यंत, ऑनलाईन शॉपिंग पासून ते गुंतवणूकीपर्यंत , ‘वर्क फ्रॉम होम’ संस्कृतीमुळे ऑनलाईन ऑफिसचे कामकाज करण्यापासून ते मनोरंजनही OTT प्लॅटफॉर्म मार्फत होण्यापर्यंत सर्वच आयुष्य डिजीटल झालं आहे. त्यामुळेच डिजीटल क्षेत्रात गुन्हेगारीचा प्रवेश होऊन सायबर गुन्ह्यांचं प्रमाणही कमालीचं वाढलं आहे. सर्वत्र ऑनलाईन घोटाळे Continue reading

  • काव्यानंद …

    सौ. विभा सुनील बोकील हृदय…. प्रत्येक श्वासाबरोबर, स्पंदने चालती हृदयाची,रात्र अन दिवसाची खरोखर, अथक सेवा चाले कायेची ! चाले भाव भावनांचे मंथन, होई संवाद अपुलाच आपल्याशी,अंतरंगी होई चालचलन, येती अंतरीचे बोल ओठाशी ! साठती कित्येक सुखदुःखे, असे प्रेम माया जिद्द लालसा,असती कित्येक कप्पे अनुभवांचे, परी धडधडून अविरत देई दिलासा ! प्रत्येकाच्या हृदयांची, रूपे निरनिराळी असती, Continue reading

  • स्त्री आणि काॅॅर्पोरेेट जग

    डाॅ.सौ.मृणालिनी दोडके. गेली २५ वर्ष काॅॅर्पोरेेट जगताचा अनुभव घेतल्यानंतर एक सुजाण स्त्री म्हणुन काॅॅर्पोरेेट जगतातील स्त्रीची वाटचाल आणि त्या अनुषंगाने कार्पोरेट मधील चांगली व वाईट बाजू मांडणे ह्यावर आजचा लेख. नोकरदार स्त्रियांचा कारकिर्दीकडे बघण्याचा दृष्टीकोनही कसा महत्वाचा आहे हेही मांडण्याचा हा प्रयत्न ! सौ. सूधा मूर्ती ह्यांचेकडे आज सारे जग अभिमानाने बघते. त्यांचा प्रवास हा Continue reading

  • देणार का तुम्ही मदतीचा हात ?

    खारीचा वाटा: कापडी पिशवी प्रकल्प मागील काही दिवस आपण भारतवासीय आहोत याचा अभिमान पुन्हा एकदा वाटायला लावणारे वर्तमानपत्रातील मथळे वाचनात येत होते. जसे… ‘भारत जगातील सर्वात प्रगतीशील अर्थव्यवस्था’, ‘बुद्धीबळाच्या खेळात भारत देश जगात आघाडीवर.’ इ. पण याच महिन्यात वर्तमानपत्रातील एक अस्वस्थ करणारा मथळा वाचण्यात आला.. ‘भारत हा जगातील क्रमांक एकचा प्लास्टिक प्रदूषक! भारत दरवर्षी ९.३ Continue reading

  • टाटा – नावातच सर्व काही..

    डाॅ.सौ.मृणालिनी दोडके स्व. श्री. रतन टाटा ह्यांच्या निधनाने संपूर्ण देश हळहळतो आहे. त्यांच्याविषयी असलेले प्रत्येक भारतीयाचे प्रेम हे शुद्ध, सात्विक आणि पवित्र आहे. सहजच मनात विचार आला की ‘विठू माऊली’ हा उच्चार मनात आला की जसे प्रेम दाटून येते तसेच प्रेम ‘टाटा’ हा शब्द उच्चारला गेला की हृदयातून प्रकटते. विठू माऊली ही अनुभवण्याची भावना आहे Continue reading