–

तगमग…
बघून शहरातली,
धूर ,आवाजी दिवाळी,
ह्रदयी काजळी,
पसरे माझ्या!
धूर, दणक्यात,
त्यांना येते मजा,
पर्यावरणा सजा,
दुर्लक्षती !
कोंडला किती,
पृथ्वीचा श्वास,
प्राणिमात्रास त्रास,
चालला रे !
बहुतेकांनी,
बांधले हो डोळे,
का असे हे सोहळे,
चालले रे !
कोणा सांगणे – शिकवणे,
झाले आहे व्यर्थ,
आनंदाचा स्वार्थ,
चोहीकडे !
शोध मग जीवा,
असे शांत जग,
जिथे नसे तगमग,
कोणाचीही!
-सौ. रुपाली दिपक कुलकर्णी


Leave a comment