श्री. दुर्वेश सांबरे
बोलता… बोलता… बोलतो आपण…
बोलता… बोलता… चालतो आपण…
बोलता… बोलता… पळतो आपण…
बोलता… बोलता… थबकतो आपण…
बोलता… बोलता… दिस उजाडतो..!
बोलता… बोलता… दुपार टाळतो..!
बोलता… बोलता… सांज येते..!
बोलता… बोलता… रात्र छळते..!
बोलता… बोलता… सूर लागतो..!
बोलता… बोलता… ताल मिळतो..!
बोलता… बोलता… ती दिसते..!
बोलता… बोलता… कविता सुचते..!
बोलता… बोलता… ओळख होते..!
बोलता… बोलता… भेट होते..!
बोलता… बोलता… डेट होते..!
बोलता… बोलता… प्रेम होते..!
बोलता…बोलता… Good morning..!
बोलता… बोलता… Good night..!
बोलता… बोलता… जेवलीस का ?
बोलता… बोलता… भेटायचं का ?
बोलता… बोलता… ती कधी चंद्र, कधी तारा..!
बोलता… बोलता… कधी फुल, कधी मोराचा पिसारा..!
बोलता… बोलता… ती जणू थंड वारा..!
बोलता… बोलता… तिच्यातच स्वर्ग सारा..!
बोलता… बोलता… क्षण सरतात..!
बोलता… बोलता… दिस सरतात..!
बोलता… बोलता… महिने सरतात..!
बोलता… बोलता… आठवणीच उरतात..!
बोलता… बोलता… मीच बरोबर !
बोलता… बोलता… तूच बरोबर ?
बोलता… बोलता… तूच चूक !
बोलता… बोलता… मीच चूक ?
बोलता… बोलता… चढतो पारा..!
बोलता… बोलता… वाजतात बारा..!
बोलता… बोलता… पडतात पेच..!
बोलता… बोलता… लागते ठेच..!
बोलता… बोलता… बोलून जातो..!
बोलता… बोलता… चिडून जातो..!
बोलता… बोलता… रडून जातो..!
बोलता… बोलता… समजून जातो..!
बोलता… बोलता… येते आठवण..!
बोलता… बोलता… आसवांचे सांत्वन..!
बोलता… बोलता… हरवतो आपलेपण..!
बोलता… बोलता… उरते एकटेपण..!
बोलता… बोलता… असे न काही की बोलतच जावे..!
बोलता… बोलता… मग खोटे ठरतात दावे..!
बोलता… बोलता… म्हणून बोलतात वडीलधारे..!
बोलता… बोलता… जरा मध्ये थांबावे..!

श्री. दुर्वेश सांबरे


Leave a comment