खारीचा वाटा: कापडी पिशवी प्रकल्प

मागील काही दिवस आपण भारतवासीय आहोत याचा अभिमान पुन्हा एकदा वाटायला लावणारे वर्तमानपत्रातील मथळे वाचनात येत होते. जसे… ‘भारत जगातील सर्वात प्रगतीशील अर्थव्यवस्था’, ‘बुद्धीबळाच्या खेळात भारत देश जगात आघाडीवर.’ इ. पण याच महिन्यात वर्तमानपत्रातील एक अस्वस्थ करणारा मथळा वाचण्यात आला.. ‘भारत हा जगातील क्रमांक एकचा प्लास्टिक प्रदूषक! भारत दरवर्षी ९.३ दशलक्ष टन प्लास्टिक कचऱ्याची पर्यावरणात भर घालतो आहे’. इतके दिवस अस्वच्छतेच्या बाबतीत आपल्या देशाच्या परिस्थितीची लज्जा वाटायची त्यात आता ह्याची भर! खूपच वाईट वाटले, मनाची अस्वस्थता वाढली. आपल्याला ह्यावर काय करता येईल याचे विचार मनात सुरु झाले. समविचारी मैत्रिणींबरोबर बोलले, घरात चर्चा केली ! त्यांचे पाठबळ मिळाले. हाताशी कन्या आणि तिचे उत्साही मित्रमंडळ होतेच. पालकांच्या मदतीने ही लहान मंडळी काही ना काही सामाजिक उपक्रम करून आपला ‘खारीचा वाटा’ उचलतच होती. या सर्वांची मदत घेता येईल आणि प्लास्टिक प्रदुषणाशी लढा देण्यासाठी कशी पावले उचलता येतील याचे विचारचक्र सुरु झाले. भाजी मंडईत किंवा किराणा दुकानांतून ज्या प्रकारे प्लास्टिक कॅरीबॅग्स वापरून भाज्या/फळे/ वस्तूंची विक्री होते त्याचा वीट येतच होता. चर्चा झडल्या ! पर्यावरण संवर्धनासाठी जगभरातील देश काय आणि कशी पाऊले उचलत आहेत, हे काही शॉर्ट फिल्म्स च्या माध्यमातून समजाऊन घेतले. उपस्थितांशी माहिती, प्रश्न, आराखडा यावर चर्चा केली,सुचना स्वीकारल्या. आणि त्यातून ‘कापडी पिशवी प्रकल्प’ या संकल्पनेने आकार घेतलापहिल्या प्रयत्नात भाजी मंडईतुन ५००० प्लास्टिक कॅरी बॅग्स चे उच्चाटन करण्याचे लहानसे ध्येय घेतले. कापडी पिशव्यांना प्रोत्साहन देण्याचे ठरले. पण त्यासाठी केवळ जुनेच कपडे रिसायकल करायचा घाट घातला. (नवीन कपडा खरेदी .. म्हणजे मग पुन्हा उत्पादन प्रक्रियेत येणारी रसायने, प्रदूषण इ. ची जी मालिका सुरु होते ती खंडित करण्यासाठी.) मुलांनी/पालकांनी घरोघर जाऊन न वापरातील, जुने पण चांगले कपडे गोळा करण्यास सुरुवात केली. पिशवी शिलाईतून रोजगार मिळवू शकतील अशा गरजू महिलांचा शोध घेतला. हळूहळू जमणारे सर्व कपडे शिंपी महिलांना देऊन त्यातून पिशव्या तयार होऊ लागल्या. नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाइंड्स अर्थात NAB या संस्थेतील अंध बांधवांकडून पिशवी शिलाई होऊ लागली. यातून पर्यावरण संरक्षण आणि समाज बांधवांच्या हातांना काम असा दुहेरी हेतूही साध्य होऊ लागला. नासिक मध्ये होणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या ठिकाणी लहान मुलांनी त्यांचे प्रयत्न सांगण्यास आणि शिलाईसाठी डोनेशन जमविण्यास सुरुवात केली. त्यासाठी अल्पारंभा फाऊंडेशन ही संस्थाही मदतीस उभी राहिली. आजमितीस या उपक्रमात तयार केलेल्या ५००० कापडी पिशव्यांनी बाजारातील प्लास्टिक कॅरी बॅग्सची जागा घेतली आहे. अशाप्रकारे कापडी पिशव्या तयार करून, भाजी मंडईत आणून भाजी विक्रेत्यांमार्फत ग्राहकांच्या प्लास्टिक कॅरीबॅग्स मागायच्या सवयीशी दोन हात करण्याचा निर्धार आहे. आमच्या कामाची दखल अनेक संस्था घेऊ लागल्या असून त्यांच्याकडून मदतीचे हात पुढे येत आहेत.
कधी वाटते, आपल्या देशाची प्लास्टिक प्रदूषणात क्रमांक एकची स्तिथी बघता, आपला हा ‘खारीचा वाटा’ कितपत पुरेसा पडणार आहे? पण सरकारी यंत्रणा, कर्तव्यतत्पर अधिकारी यांची मदत मिळेल तेव्हा मिळेल. तोपर्यंत स्वस्थ न बसता आपल्या पातळीवर आपण जे काही प्रयत्न करू शकतो ते करून बघायला हवेत. त्यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्यही अपेक्षित आहे. आपला देश प्लास्टिक प्रदूषणात क्रमांक एकवर आहे, याची जाण आपण सर्वच देशवासीयांनी ठेवली पाहिजे. त्यासाठी आमचे प्रयत्न लहान पडणार आहेत. तेव्हा देणार का तुम्ही आम्हाला मदतीचा हात ? पर्यावरण रक्षणासाठी उचलणार का तुमचा वाटा? या प्रकल्पात काम करणेसाठी तुमचे स्वागत आहे.
कशी कराल आम्हाला मदत ?
१.कापडी पिशव्या शिवण्यासाठी जुने कपडे डोनेट करा
२.कापडी पिशवी शिलाईसाठी आम्हाला आर्थिक मदत करा
३.सामान आणण्यासाठी कापडी पिशव्यांचाच आग्रह धरा
४.विक्रेत्यांकडून प्लास्टिक पिशव्या स्वीकारू नका
या प्रकल्पामध्ये चालू असणाऱ्या प्रयत्नांची काही क्षणचित्रे :
१) पर्यावरण संवर्धनासाठी जगभरातील देश काय आणि कशी पाऊले उचलत आहेत, हे काही शॉर्ट फिल्म्स च्या माध्यमातून समजाऊन घेतले. उपस्थितांशी माहिती, प्रश्न, आराखडा यावर चर्चा केली, सुचना स्वीकारल्या.

२) मुले आणि पालक यांचे नेटवर्क ‘पिशवी शिलाईसाठी कपडे गोळा करणे’ या कामास लागले.


३) NAB या संस्थेतील पिशवी शिलाई आणि मदतनीस


४) प्रकल्पाची माहिती देण्यासाठी स्टॉलची तयारी

५) प्रकल्पाची माहिती देण्यासाठी स्टॉलवर काम करतांना लहान मदतनीस

६) जागरूकता पथनाट्य सादर करतांना खारीचा वाटा सदस्य.

७) केलेल्या शिवणकामाचे मानधन स्वीकारताना मदतनीस


८) फायनल इम्पॅक्ट ! भाजी आणि फळ/ सामान विक्रेत्यांमार्फत ग्राहकांच्या हातात प्लास्टिक कॅरी बॅग ऐवजी कापडी पिशव्या ! लवकरच हे चित्र सार्वत्रिक होवो !


या प्रकल्पात काम करणेसाठी तुमचे स्वागत आहे.
कशी कराल आम्हाला मदत ?
१.कापडी पिशव्या शिवण्यासाठी जुने कपडे डोनेट करा.
२.कापडी पिशवी शिलाईसाठी आम्हाला आर्थिक मदत करा.
३.सामान आणण्यासाठी कापडी पिशव्यांचाच आग्रह धरा.
४.विक्रेत्यांकडून प्लास्टिक पिशव्या स्वीकारू नका.
‘खारीचा वाटा’ @ विविध माध्यमे
पथनाट्य @ युट्युब : लिंक खालील प्रमाणे
https://www.youtube.com/watch?v=C2nQD01z35g
युनिक फीचर्सने कव्हर केलेला लेख
https://unique-features.com/articles/lekh/small-contribution-in-environment-protection-paryavaran-sanrakshanat-kharicha-vata
देशदूत कट्टा मुलाखत
https://www.youtube.com/watch?v=H7Br43DSxrs&feature=youtu.be
अधिक माहिती:

खारीचा वाटा: कापडी पिशवी प्रकल्प
स्वाती : ९९२३८३०९२०
प्राची : ७७१९० ०७६४८
रुपाली : ९०११८९६६८१
सहाय्य्क संस्था : अल्पारंभा फाऊंडेशन, नासिक
उपक्रमासाठी आर्थिक मदत @ https://alparambha.com/payment.php
किंवा तुम्ही खालील QR कोड स्कॅन करूनही तुमची आर्थिक मदत आमच्यापर्यंत पोहोचवू शकता.
संस्थेला दिलेल्या देणगीसाठी , ८०G अंतर्गत टॅक्स बेनेफिट/ कर लाभ सुविधा उपलब्ध आहे !


Leave a reply to moneycheantarang Cancel reply