।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन


शूरा मी वंदिले – अनघा मोडक

 

 

II   स्वातंत्र्यलक्ष्मी कि जय II

भारतीयस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने अल्पारंभा एज्यूकेशनल फाऊंडेशन, नाशिक आणि  महाराष्ट्रसमाज सेवा संघ तसेच  नाशिकशिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने, शूरा मी वंदिले !” याकार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  सुप्रसिद्धआकाशवाणी निवेदिका, अनघा मोडक हिने , स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील शूरवीर सैनिकांच्या कथा, गाथा आपल्या अमोघ वाणीद्वारे  शालेयमुलांसमोर उलगडल्या !!

रचनाविद्यालय नासिक, पुरुषोत्तम हायस्कूल नाशिकरोड, ज्यू..रुंग्टा हायस्कूल सिन्नर येथिल . ना. सारडाविद्यालय या चार  शाळांमध्ये हा कार्यक्रम सादरझाला आणि भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या या अप्रतिम कार्यक्रमांद्वारे, उमलत्या मनांवर राष्ट्रभक्तीचे संस्कार झाले !! आपल्या देशासाठी प्राण वेचलेल्या वीर सैनिकांच्या पालकांच्या बलिदानाचे यानिमित्ताने स्मरण आणि त्यांचा गौरव हे देखील याआयोजनामागचे उद्दिष्ट्य होते.  

महाराष्ट्रभरातआणि महाराष्ट्राबाहेरचे असंख्य कार्यक्रम, व्याख्याने यामुळे लोकांसमोर आज अनघा मोडकहे निवेदन क्षेत्रातलं आघाडीचं नाव आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये निवेदनामध्ये धनश्री लेले, सुधीर गाडगीळ आणि अनेक मान्यवर निवेदकांच्या पंक्तीमध्ये आज अनघाचे नावआदराने घेतले जाते. वयाच्या पंचविसाव्या वर्षी अनघाला आपले दृष्टी गमवावी लागली. परंतु तिने सखोल अभ्यास, इतरांच्या मदतीने केलेले सततचे वाचन, चिकाटी आणि प्रचंड मेहनत यांच्या पाठबळावर आपल्या अधूत्वावर मात केली आहे. तिचा अभयास आणि वैचारिक श्रीमंती तिच्या रसाळ वाणीतुन प्रकट होत असते

शूरा मीवंदिले !” या कार्यक्रमाद्वारे अनघाने शालेय  मुलांच्यादृष्टीने अनुकूल अशा वक्तृत्वामार्फत, भारतीय स्वातंत्र्य सेनानी तसेच सैनिक यांच्या कार्याबद्दल कथांच्या माध्यमातून मुलांशी संवाद साधला.    

१०ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी रचना विद्यालयात झालेल्या पहिल्या व्याख्यानाआधी, अनघाचा सत्कार करण्यात आला. शहीद निनाद मांडवगणे यांचे पालकवडील श्री अनिल मांडवगणे आई सौ. सुषमा मांडवगणे यांच्या हस्ते हा सत्कार  झाला ! त्याच्या आईवडिलांची कार्यक्रमातअसलेली उपस्थिती अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या करून गेली. श्री सौ. मांडवगणेयांच्या चेहयावर मुलाच्या कर्तृत्वाच्या छटा दिसत होत्या. आणि आईवडील म्हणूनमुलास गमाविल्याची अंधुक तरीही स्पष्ट वेदना ही…! यावेळी   मेरे वतनके लोगों जरा आंखमे भरलो पानी…! जो शहीद हुएहै उनकी जरा याद करो कुर्बानी…!” हे गीत  एका विद्यार्थिनीने अतिशय अप्रतिमरित्या  सादरकेले आणि व्याख्यानाआगोदर साजेसा  माहोलनिर्माण झाला.   व्याख्यानातसैनिक या शब्दाची फारसुंदर व्याख्या अनघाने सादर  केली. ‘ “सैद्धांतिककर्तव्यनिष्ठाया शब्दभावार्थासहजीवन जगणारा तो सैनिक असेमत अनघाने मांडले आणि अनेक उदाहरणांचे दाखले देत तिने ही व्याख्या उपस्थितांनासमजाविली. अनघाने मुलांना प्रश्न विचारला , ” मेरा रंग दे बसंती चोला“, यातील बसंती या शब्दाचा अर्थ  कायअसावा ? त्याचा अर्थ वसंत का होतो हेसांगताना वसंत म्हणजे केशरी रंग आणि  केसरियाबाणा म्हणजे राष्ट्रभक्ती कशी ते तिने महाराणाप्रताप, तसेच २३ व्या वर्षीमातृभूमीच्या चरणी बलिदान देणाया शहीद भगतसिंगांच्याकथा सांगितल्या. 

 

याचदिवशी दुपारचे व्याख्यान पुरुषोत्तम हायस्कूल नाशिकरोड, येथे होते. एनसीसीकॅडेटस् नी सैनिकी थाटातकेलेल्या स्वागताने वातावरण निर्मिती फार सुंदर झाली. धामणकर सभागृहातील भव्य रंगमंचावर दोन्ही बाजूने असणारी भारतमातेचे प्रतिमा नजतेल आणि मनात भरत होती. कारगिल युद्धात प्रत्यक्ष कामगिरी बजाविलेले श्री. नामदेव जायभावे, निवृत्त मेजरसुभेदार यांच्या हस्ते अनघाचा सत्कार करण्यात आला. नामदेव हे नाव ऐकताचअनघाने संत नामदेव आणि ज्ञानदेवांचा उल्लेख केला. याच संदर्भात तिच्या व्हाटस्अपस्टेटस वर असलेले वाक्यमनाला स्पर्शून जाते .ते वाक्य म्हणजेज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगातील ओळ आहे, “श्रीगुरुंसारिखा असता पाठीराखा , इतरांचा लेखा कोण करी!” याही व्याख्यानासाठी काही सैन्याधिकारी पालक म्हणून उपस्थित होते, मेजर रोहनचे आईवडील श्री सौ. सुधाकर चव्हाण , कर्नल अविनाशचे आईवडील श्री सौ बाळासाहेब मोगलआणि मेजर श्रीकांत मेजर प्रशांतचेवडील श्री पंढरीनाथ शिंदे यांनाही वंदना देण्यात आली.    

 

१२ऑगस्ट २०२२ रोजी तिसरे व्याख्यान जु. .  रुंग्टाहायस्कूल येथे संपन्न झाले. भव्य  सभागृह, मुलामुलींच्या हातात फडकणारा भारताचा तिरंगा ध्वज यांनी वातावरणात ऊर्जा भरली होती. मंचावर सैन्याधिकारी पालक म्हणून उपस्थित होते.  भारतीयसैन्यात कार्यरत असणाया शुभमचे आईवडील श्री सौ.दीपककुलकर्णी.त्यांच्या हस्ते अनघाचा सत्कार झाला.  व्याख्यानातनंदुरबार येथे शहीद झालेला अवघ्या  चौदावर्षाच्या  शिरीषकुमारची आठवण करीत अनघाने विद्यार्थीवर्गाशी संवाद सुरु केला. महाराणा प्रतापांचा चेतक घोडा आणि सौदागर या शब्दाची पूर्वपीठीकासांगत, झांशीच्या राणीची आठवण करीत अनेक सैनिकांच्या बलिदानाच्या कथा सांगत अनघाने उपथितांच्या मनामध्ये आदर आणि देशप्रेमाच्या भावना जागविलय. युद्धभूमीवर बंकर उडवून देतांना सैनिकांनी केलेले साहस, त्यात अनेकांना  प्राप्तझालेले शहिदपण तसेच अटलबिहारी वाजपेयी यांचा उल्लेख होत व्याख्यान उत्तरोतर देशप्रेमाने भारावून गेले. जयहिंद…! जय भारत …! व्यर्थ हो बलिदान चाप्रेरणासंदेश घेवून कार्यक्रम संपन्न झाला.

 

मगशेवटच्या टप्प्याकडे कार्यक्रम पुढे सरकला. . ना. सारडाविद्यालयातील विद्यार्थ्याशी संवाद साधण्यासाठी अनघा सिन्नरला आली.विद्यालयाचा भव्य परिसर एनसीसी कॅडेटस् चा उस्त्फुर्त सहभाग. श्री वाघ सरांनी विद्यार्थ्यासह तबलावादनावर म्हंटलेले गाणे खूपच  भावपूर्णअसे झाले. तिचा सत्कार स्क़्वाड्रन लीडर चिन्मयचे आईवडील श्री सौ कोरडे यांच्याहस्ते झाला. दोघेही भारावलेले होते. चिन्मयच्या एनडीए तील शिक्षणाच्या आणि तेथील काटेकोर शिस्तीच्या आठवणीनी त्यांनी सांगितल्या राष्ट्र आणि राष्ट्रकार्य या विषयावर बोलतांनाअमृत महोत्सव म्हणजे काय,मृत म्हणजेकाय ? याचा सहज उलगडा अनघाने केला .! 

रात्रीउशिरा अनघा मुबईच्या दिशेने रवाना  झाली  परंतु  याचारही व्याख्यांत झालेला  जयहिंद,भारत माता कि जय, वंदे मातरम्  चाजयघोष,  आम्हातिच्या वाणीने, सैनिकांच्या आणि स्वातंत्र्य सेनानींच्या कार्याने  मंत्रमुग्धझालेल्या श्रोतृवर्गाच्या मनात दुमदुमत राहिला !!  

 

श्रीअविनाश गोसावी,

   ९४२३९६४३१९


Discover more from ।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

Subscribe to get the latest posts sent to your email.



Leave a comment