ललित
-
देणाऱ्याची भूमिका ..
कट्टर तत्वनीष्ठ विंदा करंदीकरांची एका लेखक मित्राने सांगीतलेली एक आठवण.आयुष्यात एकाही पुरस्काराचे पैसे त्यांनी कधी घरी सोबत नेले नाहीत. पुरस्कार घेतल्या बरोबर तिथल्या तिथे कोणत्यातरी संस्थेला ते दान करुन टाकायचे. “आमच्या जी. एस्. मेडिकल कॉलेजच्या मराठी वाङ्मय मंडळातर्फे विंदा करंदीकर , मंगेश पाडगावकर आणि वसंत बापटांच्या एकत्रित काव्यवाचनाचा कार्यक्रम ठेवला होता. शनिवार दुपार होती ती. Continue reading
-
वानोळा
“घरी चाललाच आहेस तर जातांना वानोळा घेऊन जा…. रिकाम्या हाताने जाऊ नये….!!”, वरिल वाक्य ऐकले आणि वानोळा शब्द मनात फिरत राहिला नकळत मन बालपणाच्या आठवणीत गेलं. तेव्हा असली चॉकोलेट, कॅडबरी नाही मिळायची हातावर…, किंवा अशी घसघशीत किमतीची चकचकीत मिठाईची पाकिटं देखील नाही मिळायची पाहुण्यांना निघताना. तेव्हा पाहुण्यांना निरोप मिळायचा तो भुईमूगाच्या शेंगा, मक्याची कणसे, घरी Continue reading
-
लाल बहादूर शास्त्री
भारतीय राजकारणातील अत्यंत निस्पृह, स्वच्छ व्यक्तिमत्त्व – लाल बहादूर शास्त्री- जयंती २ ऑक्टोबर. ११८ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! प्रसंग १. देशाच्या केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची आई एका कार्यक्रमात पोचली. अर्थात तिला कोणीच ओळखले नाही. तिने चौकशी केली की, माझा मुलगा तिथे आला आहे. तुम्ही पाहिलं का? लोकांनी विचारले की तो काय करतो? ती म्हणाली की तो रेल्वेत Continue reading
-
हरवून सापडलेल्या मोबाईलची गोष्ट
हरवून सापडलेल्या मोबाईलची गोष्ट सेंट्रल पार्क येथे चालू असलेल्या घे भरारीच्या भव्य प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी भेट देण्यासाठी माझी मावशी आली होती. तशी ती बहुतेक सर्व घे भरारीच्या प्रदर्शनात आवर्जून भेट देतेच. पण काल मात्र प्रदर्शना दरम्यान तिचा मोबाईल हरवला. सध्याच्या दिवसांत मोबाईल म्हणजे प्राणवायू. तो जितका अचानक हरवला तितक्याच आश्चर्यकारक रितीने सापडला देखील. त्याला कारणीभूत Continue reading
-
उगवतीचे रंग : मृत्यूकडून जीवनाकडे…
मृत्यूकडून जीवनाकडे… कधी कधी हे सत्य हे कल्पनेपेक्षा भयानक असते. आपण स्वप्नातही कल्पना करू शकणार नाही अशा गोष्टी प्रत्यक्षात घडतात. अशीच ही एका मुलीची कथा. अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून वाचलेली. जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती कोणता चमत्कार घडवू शकते, त्याचे प्रत्यंतर देणारी. ही घटना आहे २४ डिसेंबर १९७१ ची. ज्युलियन कोपकी, एक १७ वर्षांची मुलगी. पेरू देशाची राजधानी Continue reading
-
हस्ताक्षरातील अक्षर…
काही मान्यवर अन् प्रथितयश साहित्यिकांच्या हस्ताक्षरातलं एक अक्षर जरी कळत असेल तर शपथ.’ असे काही प्रकाशक आणि संपादक सदरहू साहित्यिकांच्या लिखाणाऐवजी ‘लेखना’वर टिप्पणी करताना जरूर बोलून जातात. याला काही माननीय अपवाद असतील, नाही असे नाही. तरीही यथातथा असलेल्या अक्षरातूनच ‘अक्षर’ वाङ्मय निपजते यात कुणाला शंका नसावी. हस्ताक्षर चांगले नाही वा संपादकांना वाचन सुलभ व्हावे म्हणून Continue reading
-
राष्ट्रीय सांख्यिकी दिन (National Statistic Day)
राष्ट्रीय सांख्यिकी दिन (National Statistic Day) दैनंदिन जीवनात सांख्यिकींचा वापर लोकप्रिय करण्यासाठी 29 जून रोजी हा दिवस पाळला जातो. दिवंगत प्राध्यापक प्रशांत चंद्र महालनोबिस यांनी आर्थिक नियोजन आणि सांख्यिकी क्षेत्रात दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल भारत सरकारने राष्ट्रीय सांख्यिकी दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि म्हणून राष्ट्रीय सांख्यिकी दिन त्यांची जयंती म्हणून साजरा केला. प्रोफेसर प्रशांत चंद्र Continue reading
-
निवेदनातील प्रकाशमान सरस्वती अनघा मोडक
महाराष्ट्रभरात आणि महाराष्ट्राबाहेरचे असंख्य कार्यक्रम, व्याख्याने यामुळे लोकांसमोर आज अनघा मोडक हे निवेदन क्षेत्रातलं आघाडीचं नाव आहे. अंधत्वावर मात करून सुरू असलेला अनघा मोडकचा प्रवास सर्वांना नक्कीच प्रेरणादायी आहे. ती कुठेतरी बघून वाचतेय, तिच्या हाताजवळ कागद असणारच त्याशिवाय एवढ कसं बोलेल…. एका कार्यक्रमातील रसिकांमध्ये सुरु असलेली कुजबुज… कार्यक्रमाचा निवेदक किंवा निवेदिका म्हटल कि माईकबरोबरच भरपूर Continue reading
-
सुखी आयुष्यासाठी ९०-१० चे सुत्र
सुखी आयुष्यासाठी ९०-१० चे सूत्र मित्रांनो, जगप्रसिद्ध तत्वज्ञ स्टिफन कोव्हे यांच्या म्हणण्यानुसार आपल्या आयुष्यात, ९०-१० चे सूत्र महत्त्वाचे आहे. काय आहे हे सूत्र ? स्टिफन कोव्हे सांगतात, ‘आपल्या आयुष्यातील फक्त १०% आयुष्य हे ‘आपल्याबद्दल काय घडते’ याने बनलेले असते, आणि ‘आपण त्यावर काय प्रतिक्रिया देतो’ यावर उरलेले ९०% आयुष्य अवलंबून असते. हे खरं वाटत नाही? चला जरा समजावून घेऊ. खरोखरच ज्या आपल्यावर परिणाम करतात, त्या १०% गोष्टी आणि घटनांवर Continue reading
-
सकारात्मक भाषा
एकदा दोन मैत्रिणींची मुलं झाडावर चढली होती. मुलं झाडावर उंच पोहचल्यावर अचानक जोराचं वादळ आलं. ते झाड वा-यानं गदागदा हालू लागलं. पहिल्या मुलाची आई तिच्या मुलाला म्हणाली, “पडशील”. तर दुस-या मुलाची आई म्हणाली, “सांभाळ, घट्ट पकडून ठेव” ! खरंतर दोन्ही मैत्रिणींना आपापल्या मुलांना पडण्यापासून वाचवायचं होतं. परंतु त्यांच्या मुखातून निघालेल्या संदेशांमध्ये मात्र विरोधाभास होता. परिणामी Continue reading
Recent Posts
