माणसं जनातली ..माणसं मनातली !
-
माणसं जनातली ..माणसं मनातली : लेखांक १८: श्री. सुभाष हांडे-देशमुख– श्री. बलबीर अधिकारी
लेखांक १८: श्री. सुभाष हांडे-देशमुख 1967 साली चेंबूरच्या युथ कौन्सिलची स्थापना केल्यावर अनेक युवा व समाजसेवेची कामे जोरात सुरू झाली. भैय्यासाहेब आगाशे या बहुपेडी व्यक्तीमत्त्वाच्या प्रेरणेने व अशोक वैद्य यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या युवासंस्थेने चांगलेच बाळसे धरले. वैद्यकीय सेवा, समाज सेवा, श्रमदान, युवा शिबिरे यांच्या बरोबर रंगभूमीची सेवा करण्यासाठी प्रत्येक सभासद झटू Continue reading
-
माणसं जनातली ..माणसं मनातली : लेखांक १६: श्री. दिवाकर आगाशे आणि लेखांक १७: श्री.राजाराम माने — श्री. बलबीर अधिकारी
लेखांक १६: श्री. दिवाकर आगाशे सुरूवातीस छोटी दाढी ठेवणारा चेहरा, मुत्सद्दी नजर, कोकणस्थ हिशेबीपणा आणि वर्हाडी दिलखुलासपणा यांचे लेणे घेऊन वावरणारे भैय्यासाहेब आगाशे जेव्हा आमच्या संपर्कात आले त्यावेळी त्यांच्या पदरी बुलढाण्याची अविकसित घटकाच्या मुलांसाठी सुरू केली गेलेली शाळा व युवक प्रगती सहयोग ही युवा संस्था यांचे संगठन होते. त्या संस्थेतर्फे ते एक नियतकालिक Continue reading
-
माणसं जनातली ..माणसं मनातली : लेखांक १४: डॉ. सी. आर. कर्णिक आणि लेखांक १५: श्री.उदय शंकर अवस्थी — श्री. बलबीर अधिकारी
लेखांक १४: डॉ. सी. आर. कर्णिक मी नुकताच एफ.वाय.बी.एस्सी. कसा बसा सुटला होतो. एस.एस.सी. पर्यत हॉल ऑफ फेम मध्ये मोडणारा परंतु पुणे विद्यापीठाने नुकत्याच लागू केलेल्या तीन वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्याच तुकडीत सापडून केवळ 17 टक्के निकाल असलेल्या वर्षी प्री डिग्री सुटलेला व ज्यावर्षी भविष्याची दिशा ठरते त्या एफ.वाय. च्या वेळी सायकल अपघातात Continue reading
-
माणसं जनातली ..माणसं मनातली : लेखांक १२: श्री. दिलीप सिंह आणि लेखांक १३: श्री. माधवराव गडकरी — श्री. बलबीर अधिकारी
लेखांक १२: श्री. दिलीप सिंह खरं म्हणजे दिलीप सिंह या व्यक्तीसंबंधी लिहायला घेतले तर एखादे पुस्तक सहज होईल परंतु त्यांच्या स्वभावाची खास वैशिष्ठ्ये सांगायला संक्षिप्त विवेचनच हवे. ही व्यक्ती आर.सी.एफ. सारख्या मातब्बर संस्थेत अध्यक्षाच्या पदापर्यंत चढली हे लौकिक अर्थाने खरे असले तरी ती ज्या ज्या पदावर राहिली त्या पदाची शान त्यामुळे वाढत गेली. Continue reading
-
माणसं जनातली ..माणसं मनातली : लेखांक १०: प्रा. मधुसूदन नाडकर्णी आणि लेखांक ११: श्री. अशोक अरोंदेकर — श्री. बलबीर अधिकारी
लेखांक १०: प्रा. मधुसूदन नाडकर्णी खादीचा कोट, सदरा व पतलून, सहा फूट उंची, करडी झाक असणारे केस शांत नजर, चेहर्यावर एक निर्मळ साधेपणा व विषयाचे निरूपण करतांना जाणवणारा आवाजातील एक विशिष्ट गोडवा. एवंगुण विशिष्ट नाडकर्णी सर जेव्हा वर्गात येत तेव्हा आम्ही पदवीला रसायन हा प्रमुख विषय घेतलेले विद्यार्थी, आपलेपणाच्या अनुभवाने चिंब भिजत असू. Continue reading
-
माणसं जनातली ..माणसं मनातली : लेखांक ९: पुरूषोत्तम मांडे आणि १०: डॉ. ग. ह. टिळक : श्री. बलबीर अधिकारी
पुरूषोत्तम मांडे ““महाराष्ट्रात आजवर केवळ तीन पुरूषोत्तम जन्माला आले आहेत.”“ कोण ! म्हणून भोळसटपणे विचारता, पुरूषोत्तम भास्कर भावे, पुरूषोत्तम लक्ष्मण देशपांडे व…… पुरूषोत्तम रामदास मांडे असे स्फोटक विधान गंमतीने करणारा पु. लं. च्या विनोदाला सर्वांगाने दाद देणारा. पु. भा. च्या प्रखर राष्ट्रवादी विचारांचा मस्तीत जगण्याची मनापासून कदर करणारा अन् इंग्रजी, मराठी व हिंदी Continue reading
-
माणसं जनातली ..माणसं मनातली : लेखांक ७: सुरेश देखणे आणि ८: अशोक वैद्य : श्री. बलबीर अधिकारी
लेखांक ७: सुरेश देखणे सदा मित्रांच्या घोळक्यात असणारा, आपल्या मधाळ बोलण्याने समवयस्कांबरोबर त्यांच्या आईवडिलांवरच नव्हे तर इतर संबंधितांवरही छाप पाडणारा, सिध्यांशी सीधा अन् बेरक्याशी दादागिरी करू शकणारा, अभ्यासात साधारण पण गाणे व संगीताची जाण असणारा सुरेश जेव्हा माऊथ ऑर्गनवर अथवा ओठावर एखादे भावगीत घेऊन उभा असे तेव्हा तर भगिनीवर्गांचीही मोठी पंचाईत होत असे. त्याच्याशी Continue reading
-
माणसं जनातली ..माणसं मनातली : लेखांक ५ आणि ६: जया : फकिरा आणि सय्यदनूर : श्री. बलबीर अधिकारी
लेखांक ५ जया उन्हाळ्याची सुटी होती. नाशिकरोडच्या शाळेत शिकणारा मी परीक्षा संपवून घरी परतलो होतो. घरची व वडिलांची बटाईने घेतलेल्या शेतातली काहीबाही कामे चालू होती. आमचे काम करणे व नदीवर पोहणे जोरात सुरू होते. आमच्या गावी राहणार्या रामूकाकांची नातवंडे मुंबईहून गावी हवा पालटायला येत. त्यांच्याभोवती पोरे जमत. पोहणे, विटीदांडू, लगोर्या व पत्ते Continue reading
-
माणसं जनातली ..माणसं मनातली : लेखांक ३, ४: जयसिंग सोलंकी , जी. रामास्वामी : श्री. बलबीर अधिकारी
जयसिंग सोलंकी तुर्भे खत कारखाना 1965 साली सुरू झाला. त्या दरम्यान वेगवेगळ्या पदांवर रूजू झालेल्या मंडळीने आता आपला सेवाकाळ संपवला आहे. या प्रदीर्घ काळात ज्यांचा विविध अंगानी विकास झाला त्यात जयसिंग सोलंकी यांचे नाव पहिल्या काही नावात येऊ शकेल. आम्ही एकत्र यायला चेंबूरचे यूथ कौन्सिल प्रामुख्याने कारणीभूत ठरले. या युवा संस्थेत अशोक Continue reading
-
माणसं जनातली ..माणसं मनातली : लेखांक २:गंगाधर पुरुषोत्तम : : श्री. बलबीर अधिकारी
लेखांक २:गंगाधर पुरुषोत्तम डोक्यावर करडे परंतु भरपूर केस, भावुक डोळे, वरकरणी हसरा पण मधूनच गंभीर होणारा चेहरा, सामान्य मराठी माणसाचा बुशशर्ट व पँट हा पेहराव, कधी चौकटी वा निळा कोट घालून एक्झिक्युटिव्ह दिसण्याचा वा थंडी आवरण्याचा गोंडस प्रयत्न, कशालाही हो म्हणून डावा हात केसावरून फिरवत आत्मविश्वास वाढवण्याची ढब एवं गुणविशिष्ट गंगाधर पुरूषोत्तमंचा आणि अस्मादिकांचा परिचय Continue reading
Recent Posts
