।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन


बाई ..माणुस म्हणून

  • स्त्री आणि काॅॅर्पोरेेट जग

    डाॅ.सौ.मृणालिनी दोडके. गेली २५ वर्ष काॅॅर्पोरेेट जगताचा अनुभव घेतल्यानंतर एक सुजाण स्त्री म्हणुन काॅॅर्पोरेेट जगतातील स्त्रीची वाटचाल आणि त्या अनुषंगाने कार्पोरेट मधील चांगली व वाईट बाजू मांडणे ह्यावर आजचा लेख. नोकरदार स्त्रियांचा कारकिर्दीकडे बघण्याचा दृष्टीकोनही कसा महत्वाचा आहे हेही मांडण्याचा हा प्रयत्न ! सौ. सूधा मूर्ती ह्यांचेकडे आज सारे जग अभिमानाने बघते. त्यांचा प्रवास हा Continue reading

  • बाई….. “माणूस” म्हणून: भाग ४४,४५, ४६ डॉ. कल्पना कुलकर्णी

      भाग ४४: सख्खे शेजारी   माझी आणि आजींची ओळख गेली आठ वर्षे आहे. माझी सई तान्ही होती तेव्हा त्यांची नात एक वर्षाची होती. दोन्ही मुलींना बाबागाडीत फिरवताना आम्ही भेटलो, ओळख झाली. त्यांची नात तिच्या गावाला परत गेली तरी आमची ओळख वाढली. “जाणं-येणं असलेला शेजार” या सदरात आमची दोन्ही कुटुंब गणली गेली. सध्या त्यांच्या ऐसपैस घरात Continue reading

  • बाई….. “माणूस” म्हणून: भाग ४१,४२,४३ डॉ. कल्पना कुलकर्णी

      भाग ४१: आम्ही सर्व भारतीय एक आहोत              कामानिमित्त लुधियानाला जायचे ठरते म्हटल्यावर अमृतसर आणि वाघा सीमेला भेट द्यायलाच हवी, असे जवळपास प्रत्येकानेच सांगितले. अमृता प्रीतमच्या पंजाबजध्ये फिरायचे, या भावनेने मीही हरखले. भारताच्या सीमेवर पाऊल ठेवायला मिळणार या विचाराने ऊर दाटून आला. जालियनवाला बागेतील माती कपाळी लावायची, हे ठरवताना इतिहासाच्या Continue reading

  • बाई….. “माणूस” म्हणून: भाग ३८,३९,४०: डॉ. कल्पना कुलकर्णी

      भाग ३८: इंडियन स्टँडर्ड टाईम   मध्यंतरी मुलीच्या एका स्पर्धेला जायचा योग आला. प्रवेशिका एकदम चकाचक. सोनेरी अक्षरात वेळ, ठिकाण छापलेलं. “वेळेच्या आधी दहा मिनिटे स्थानापन्न व्हावे”. ही सूचनाही आवर्जून छापलेली. स्पर्धेचं ठिकाण घरापासून लांब होतं म्हणून मी आपली तासभर आधीच घरातून निघून वेळेआधी पाच मिनिटं तिथे पोहोचले. सगळा शुकशुकाट. खूप फिरल्यावर आवारात दोन Continue reading

  • बाई….. “माणूस” म्हणून: भाग ३५,३६,३७: डॉ. कल्पना कुलकर्णी

       भाग ३५: आठवण   हल्लीच्या घरांना “लॅच” नावाचं जास्त सुरक्षा देणारं जे कुलूप असतं त्याची मला खूप दहशत आहे. “आई दारात, बाळ घरात, वारा जोरात” असा घटनाक्रम घडतो आणि हे लॅच हमखास लागून जातं. किल्ली कधी कमरेला नसतेच, मग तो हलकल्लोळ! प्रत्येकाच्या ओळखीत कधी ना कधी अशा गोष्टी घडलेल्या असतातच. मी अशा गोष्टी ऐकून धडा Continue reading

  • बाई….. “माणूस” म्हणून: भाग ३२,३३,३४ : डॉ. कल्पना कुलकर्णी

      भाग ३२: मनाचे संकल्प   “नेमेचि येतो पावसाळा” या चालीवर दिवसांमागून दिवस, महिने, वर्षे उलटतच असतात. सुधीर मोघे म्हणतात तसं “काळ धावे म्होरं म्होरं, जणू वाघ लागे पाठी त्येच्या जोडीनं धावनं हेच मानसाच्या हाती…” कालचा दिवस मागे टाकून रोज उठून धावताना “मागील पानावरून पुढे चालू” असे आयुष्याचे रकाने भरताना आपण मागे वळून पाहतच असतो. सरत्या Continue reading

  • बाई….. “माणूस” म्हणून: भाग २९,३०,३१ : डॉ. कल्पना कुलकर्णी

      भाग २९:ती तेव्हा तशी!   श्रावणसरी संपून जातात. भाद्व्यातला पाऊसही कमी होतो आणि आश्‍विन येतो. शरदाची चाहूल लागते. झुंजुमुंजु होताना दवानं ओलेती झालेली धरती हिरवी शाल लपेटून बसल्यागत दिसते. दिवस हळूहळू तापायला लागतो. सांजवेळी अंधारून येताच हवेत हळूच गारवा शिरतो. ही थंडी नाजूक किणकिणणारी, जणू झिरझिरीत वस्त्रातून शरीराला स्पर्श करणारी! या अशा भारलेल्या आसमंतात Continue reading

  • बाई….. “माणूस” म्हणून: भाग २६, २७, २८ : डॉ. कल्पना कुलकर्णी

      भाग २६: गर्दी   आमचे दातारकाका लक्ष्मी रस्त्यावर राहतात. गणपतीतल्या गर्दीला टाळण्यासाठी ते दरवर्षीप्रमाणे यंदाही त्या दरम्यान गावाला गेले आणि सालाबादाप्रमाणे यंदाही गणपती बघण्यासाठी माणसांचा महापूर लक्ष्मी रस्त्यावर लोटलाच. वेगवेगळ्या गावांहून गाड्या भरभरून रोजच माणसं आली आणि प्रत्येकानं रस्त्यावरच्या गर्दीत भरच टाकली. दातारकाकांचं चूक नाही. दरवर्षी रस्त्यावरच्या गर्दीनं त्यांना त्यांच्याच घरात बांधून टाकल्यासारखं होतं. रस्त्यावर Continue reading

  • बाई….. “माणूस” म्हणून: भाग २३, २४, २५ : डॉ. कल्पना कुलकर्णी

       भाग २३: ई-दिवाळी   “तुझा नवरा इथे नसताना तुमचा रोज फोन व्हायचा का गं?” माझी एक मैत्रीण चौकसपणे विचारत होती. मी फोनच्या पुढच्या जमान्यातली विरहिणी असल्याने तत्परतेने नकार दिला आणि सांगितलं, “नाही, आम्ही रोज एकमेकांना ई-मेल करायचो.” आता माझा नवरा परतलाय. त्यामुळे घरातल्या घरात ई-मेल न करता आम्ही एकमेकांशी बोलतोय, पण ह्याच्या मानगुटीवरून मात्र Continue reading

  • बाई….. “माणूस” म्हणून: भाग २०,२१,२२ : डॉ. कल्पना कुलकर्णी

    भाग २० : तीन देवियाँ              जागतिकीकरणाचं युग होतं. एक आटपाट नगर होतं. तिथं एक धन्वंतरी राहत होता. धन्वंतरी मोठा सत्त्वशील आणि धैर्यशील होता. आरोग्यदेवतेबरोबरच आहारदेवता आणि व्यायामदेवतेचाही तो उपासक होता. त्यासाठी कडक व्रत करीत होता. धन्वंतर्‍याचे व्रत काय होते? सकाळी लवकर उठावे. “चितळे”, “साने”, “गोकूळ”, “कात्रज” असे कुठले तरी दूध Continue reading