काव्यानंद
-
स्वागत गणरायाचे…
स्वागत गणरायाचे… हे गणराया, गजानना, देवराया, करुणाकरा,शुभ आगमने नमन तुजला, बाप्पा कृपासागरा ! भक्तीभावाने केली सज्जता, तुझ्या स्वागताची,तुझ्या आगमने, प्रसन्न दर्शने, मनी आभा चैतन्याची ! शुभ स्वागता मोहक गंध, अन रंगावली नेटकी ,औक्षण घेऊनी गृही प्रवेशा, देवा विसावा मंचकी ! आरास असे मनमोहक, त्यात दिसे मूर्ती साजिरी,रूप तुझे दिसे शोभुनी, वस्त्रलंकार भरजरी ! पुष्प सुगंधी, Continue reading
-
कविता : सद्य परिस्थिती आणि सुरक्षा !
श्री. विजय वैरागी , कीर्ती दामले कळसूत्री बाहुल्यांचा खेळ अद्रुश्य हातातील कठपुतली जनताशक्तीच्या छायेत खेळणारी सत्तासामर्थ्याच्या दिशेने न्यायाचा कलसामान्यांच्या नजरेत असहायतेची सल प्रामाणिक प्रयत्नांना स्वप्नांची धूळहपापलेल्या बाहुबलींना सामान्यांचा शूळअधिकाराच्या वचनांना शब्दांचीच झुलनैतिक हक्कांना ठरवती खुळ पण आशेची पालवी मनात मांडते ठाणबदलाची बीजे आत रोवली जातील ठामयेईल तो दिवस उगवेल नवी पहाटजेथे विवेकाची पुन्हा रुजेल वहिवाट Continue reading
-
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल !
संत तुकाराम यांचा अभंग आणि त्याचा भावार्थ. येऊ घातलेल्या आषाढी एकादशी निमित्त, महाराष्ट्रातील संपन्न अशा संतपरंपरेतील, विठ्ठलावरील रचना वाचत होते. जसजशा या रचना वाचित गेले तसतसा त्यांच्या रचनानाकारांविषयी (ज्ञाना, नाथा, नामा, तुका , चोखा, जना इ.) आदर दुणावत गेला. लौकिक अर्थाचे शिक्षण नाही, घरातील सांपत्तिक परिस्थिती हलाखीची, जातीयव्यवस्थेमुळे समाजातून मिळणारा तिरस्कार.. अशा दुःखी-कष्टी अवस्थेतेतही, केवळ Continue reading
-
जगण्याचा सूर गवसलेला शंतनू !!
“नर्मदा परीक्रमा : एक जीवन दर्शन “ हा श्री. शंतनु गुणे, नर्मदा परिक्रमावासी यांचे ‘दृक-श्राव्य अनुभवकथन’ करणारा कार्यक्रम ३१ मे २०२४ , सायं ६:१५ वाजता, विशाखा हॉल , कुसुमाग्रज स्मारक, नाशिक येथे संपन्न झाला !! या कार्यक्रमास जिज्ञासूंनी उदंड प्रतिसाद दिला . श्री. गुणे यांनी व्यक्त केलेल्या अतिशय भावपूर्ण आणि प्रवाही अशा अनुभूतीमधून श्रोत्यानाही नर्मदा Continue reading
-
Kavita
डाएट नि वेटलॉस… डाएट नि वेटलॉसचा, करून गवगवा फार,भूक लागताच मन, लगेच मानते हार !! बर्गर, पिझा, जंकफुडचे, ऑप्शन चवदार,स्विगी, झोमॅटो तत्सम, पर्याय आहेत फार,डाएटची तपश्चर्या, जिभेपुढे फरार,पदार्थांवर ताव मारून, मन मारते हार !! आरशात पाहून, पोटावरची घडी,मन म्हणते घालवीन ही, तरच नावाची खरी,पण समोर येताच चितळेंची बाकरवडी,फस्त करायला, मी लगेच मारते उडी !! भरमसाठ Continue reading
-
बालविवाह : जनजागृती गीत
भारतामध्ये बालविवाह बेकायदा असला तरी या संदर्भातल्या घटनांना पूर्णपने आळा बसलेला नाही, ही शोकांतिका आहे. अज्ञान, दारिद्र्य, रूढीप्रियता आणि परंपरा या कारणांनी बालविवाह घडून येतात. अशा विवाहामुळे बालकांचे शिक्षण, आरोग्य, खेळण्याचं वय हिरावून घेतलं जातं. बालविवाह या रुढीचे गांभीर्य लक्षात घेऊन राजा राममोहन रॉय, पं. ईश्वरचंद्र विद्यासागर, लाला गिरधारीलाल यांनी या अनिष्ट प्रथेविरुद्ध जनमत जागे Continue reading
-
Soulful Verses: A Symphony of Poems Unveiled
by Ms. Radha Odhekar & Ms. Shatakshi Risbud You Can Failure is okayBut you must try again,You have a second chance,For there’s no winning without pain. You must never say I can’t,For surely it’s not true!And there’s a fighting spirit,Deep down inside of you. You must never feel remorse,You must never feel regret,For surely you’ll have taken,Every Continue reading
-
नदीकिनारी पाऊस !
गोदावरीच्या तीरावरती, आनंद होतो पाहतांना,मुले पोहती पाण्यात, हसता हसता खेळतांना !! झाडे उगवली, फुले उमलली नदीच्या तीराला,शोभा पाहुनी मुले आली, पाने फुले वेचायला,मुलांचे विनोद ऐकुन, ढग हसले पोट धरून,हसता हसता त्यांच्याकडील, पाणी उडाले भरभरून !! मुलेही भिजली, फुले ही भिजली, पावसाच्या पाण्यातसंगतीला आले मोर सारे, नाचू लागले रानात,मोर, फुलं, मुलं सारे, संगतीने नाचु लागलेत्यांना पाहून Continue reading
-
कुब्जा : कवयित्री इंदिरा संत यांच्या कवितेबद्दल मनोगत
– श्री. विनय कुलकर्णी अजून नाही जागी राधा,अजून नाही जागें गोकुळअशा अवेळीं पैलतीरावर,आज घुमे कां पावा मंजुळ ll माझ्या आईचे हे अगदी आवडते गाणे. आपण हे गाणे छान आणि सुरात म्हणतो हे माझ्या आईला पक्के ठावूक आहे. कुठल्याही घरगुती समारंभात माझ्या आईला गाणं म्हणण्याचा आग्रह झाला की, जी काही ठराविक गाणी ती अगदी तयारीने म्हणत Continue reading
-
Path to Change
राधा धनंजय ओढेकर ! बारा-तेरा वर्षांची चिमुरडी ! तिच्या वर्ग शिक्षकांच्या ग्रीटिंग कार्डसाठी तिने ही Path to Change ही इंग्रजी कविता लिहिली आणि आल्या लेकीकडून प्रेरणा घेऊन तिच्या आईने त्या कवितेचा मराठीत स्वैर अनुवाद केला आहे !! या दोन्ही कविता , अल्पारंभाच्या वाचकांसाठी !! Path to ChangeThe path to change is dark and coldTo crosss, Continue reading
Recent Posts
