।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन


अल्पारंभ

  • देणार का तुम्ही मदतीचा हात ?

    खारीचा वाटा: कापडी पिशवी प्रकल्प मागील काही दिवस आपण भारतवासीय आहोत याचा अभिमान पुन्हा एकदा वाटायला लावणारे वर्तमानपत्रातील मथळे वाचनात येत होते. जसे… ‘भारत जगातील सर्वात प्रगतीशील अर्थव्यवस्था’, ‘बुद्धीबळाच्या खेळात भारत देश जगात आघाडीवर.’ इ. पण याच महिन्यात वर्तमानपत्रातील एक अस्वस्थ करणारा मथळा वाचण्यात आला.. ‘भारत हा जगातील क्रमांक एकचा प्लास्टिक प्रदूषक! भारत दरवर्षी ९.३… Continue reading

  • टाटा – नावातच सर्व काही..

    डाॅ.सौ.मृणालिनी दोडके स्व. श्री. रतन टाटा ह्यांच्या निधनाने संपूर्ण देश हळहळतो आहे. त्यांच्याविषयी असलेले प्रत्येक भारतीयाचे प्रेम हे शुद्ध, सात्विक आणि पवित्र आहे. सहजच मनात विचार आला की ‘विठू माऊली’ हा उच्चार मनात आला की जसे प्रेम दाटून येते तसेच प्रेम ‘टाटा’ हा शब्द उच्चारला गेला की हृदयातून प्रकटते. विठू माऊली ही अनुभवण्याची भावना आहे… Continue reading

  • कहा तुम चले गये..

    स्मरण, गझल सम्राट स्व. जगजीत सिंग यांचे ! भारतीय संगीत सृष्टीची श्रीमन्ती आणि त्यातली विविधता आपण सर्व जाणतोच. आपल्याकडे समृद्ध अशा शास्त्रीय संगीताबरोबरच, उपशास्त्रीय श्रेणीत येणारे संगीताचे अनेक प्रकार आहेत ज्यात ठुमरी, दादरा, भजन, नाट्यसंगीत, कव्वाली यांच्याबरोबरच गझल गायन हा अतिशय लोकप्रिय असणारा संगीत प्रकार ! गझल गायन प्रकाराला अनोखी उंची आणि सर्वाधिक लोकप्रियता देण्यात… Continue reading

  • काव्यानंद …

    सौ. विभा सुनील बोकील सखी… सखी तू येतेस पावसात,चैतन्याची होते बरसात,उत्साहाला आणतेस सोबत,लकेर विजेची जशी काळोखात… ठोठावतेस दार मनाचं,नसे कांही आडपडद्याचं,मनातल्या मोकळ्या गप्पांचं,नातं दिलखुलास सहवासाचं… येतेस स्नेहाचा सांकवं बांधत,भावभावनांची बाग फुलवत,फुला पानांची तोरणे लावत,मैत्रीचे बीज घट्ट रुजवत…. येणे तुझे असे कसे उतावीळ,बरसणे असे की अवखळ,उघडतात मनाची दारं खळखळ,सखी माझी पावसाळी निर्मळ… फुलपाखरू… भिरभिरते फुलपाखरू,किती विहरते… Continue reading

  • ग्रेट भेट ! डॉ ओमप्रकाश कुलकर्णी

    विश्वेश सुवर्णकार आज रोटरी क्लब ऑफ नाशिक नॉर्थ तर्फे दिल्या जाणार्‍या, आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी, प्रमुख पाहुणे म्हणुन आलेल्या अनोख्या व्यक्तिमत्वाची भेट झाली !भारतातील एक महान व्यक्तिमत्त्व, दोन वेळा राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित, सीनियर साइंटिस्ट, संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज माऊली यांच्या काकांचे वंशज असणारे श्री. डॉ ओमप्रकाश गणपतराव कुलकर्णी ! यावेळी त्यांना ऐकण्याचा आणि भेटण्याचा योग… Continue reading

  • Life : Treasure to Enjoy !

    Poems by Vijay Vairagi Light of Life In the quiet of your heart, let this truth be known:  Don’t compare your success with seeds others have sown.  Each life is a journey, a path of its own,  And your joy is a flower that’s perfectly grown. Success isn’t something to weigh or to measure,  It’s… Continue reading

  • स्वागत गणरायाचे…

    स्वागत गणरायाचे… हे गणराया, गजानना, देवराया, करुणाकरा,शुभ आगमने नमन तुजला, बाप्पा कृपासागरा ! भक्तीभावाने केली सज्जता, तुझ्या स्वागताची,तुझ्या आगमने, प्रसन्न दर्शने, मनी आभा चैतन्याची ! शुभ स्वागता मोहक गंध, अन रंगावली नेटकी ,औक्षण घेऊनी गृही प्रवेशा, देवा विसावा मंचकी ! आरास असे मनमोहक, त्यात दिसे मूर्ती साजिरी,रूप तुझे दिसे शोभुनी, वस्त्रलंकार भरजरी ! पुष्प सुगंधी,… Continue reading

  • कर्करोग आणि लक्षणे

    डॉ.क्षमा वैरागी जगभरात  कर्करोगाचे प्रमाण फार वाढत आहे.  भारतातही  कर्करोग रुग्णांची  संख्या बरीच वाढत चालली आहे. कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाणही खूप जास्त आहे. त्यामुळे हा आजार ही  एक गंभीर समस्या  बनली आहे.  जवळजवळ प्रत्येकाच्या  परिचयात  कर्करोग झालेल्या तसेच ककरोगामुळे  मृत्यू  झालेल्या  व्यक्ती असतातच.  पण जसे आजाराचे प्रमाण वाढत आहे त्याच बरोबरीने त्यावरील संशोधनाचे प्रमाणही वाढत… Continue reading

  • कविता : सद्य परिस्थिती आणि सुरक्षा !

    श्री. विजय वैरागी , कीर्ती दामले कळसूत्री बाहुल्यांचा खेळ अद्रुश्य हातातील कठपुतली जनताशक्तीच्या छायेत खेळणारी सत्तासामर्थ्याच्या दिशेने न्यायाचा कलसामान्यांच्या नजरेत असहायतेची सल प्रामाणिक प्रयत्नांना स्वप्नांची धूळहपापलेल्या बाहुबलींना सामान्यांचा शूळअधिकाराच्या वचनांना शब्दांचीच झुलनैतिक हक्कांना ठरवती खुळ पण आशेची पालवी मनात मांडते ठाणबदलाची बीजे आत रोवली जातील ठामयेईल तो दिवस उगवेल नवी पहाटजेथे विवेकाची पुन्हा रुजेल वहिवाट… Continue reading

  • आर्थिक फसवणुक: माझा अनुभव

    -कु. शताक्षी रिसबुड नमस्कार ! मी, नाशिकमध्ये राहणारी कु. शताक्षी हेमंत रिसबुड. मला तुमच्यासोबत, आर्थिक फसवणूकीच्या बाबतीत मला आलेला एक अनुभव शेअर करायचा आहे. २३ जुलै २०२४ रोजी, मला राहुल शर्मा या नावाने फोन आला. मी फोन उचलल्यानंतर राहुल बोलू लागला. “नमस्कार. मी LIC मधुन बोलतो आहे. हेमंत सरांच्या नावे एक रु. १२,००० चे पेमेंट… Continue reading

अल्पारंभाविषयी अधिक माहिती:

Our Officlal Website

 ई-मेल:alparambha@gmail.com

दुरध्वनी: ९०११८९६६८१