अल्पारंभ
-
बाई….. “माणूस” म्हणून: भाग २९,३०,३१ : डॉ. कल्पना कुलकर्णी
भाग २९:ती तेव्हा तशी! श्रावणसरी संपून जातात. भाद्व्यातला पाऊसही कमी होतो आणि आश्विन येतो. शरदाची चाहूल लागते. झुंजुमुंजु होताना दवानं ओलेती झालेली धरती हिरवी शाल लपेटून बसल्यागत दिसते. दिवस हळूहळू तापायला लागतो. सांजवेळी अंधारून येताच हवेत हळूच गारवा शिरतो. ही थंडी नाजूक किणकिणणारी, जणू झिरझिरीत वस्त्रातून शरीराला स्पर्श करणारी! या अशा भारलेल्या आसमंतात… Continue reading
-
बाई….. “माणूस” म्हणून: भाग २६, २७, २८ : डॉ. कल्पना कुलकर्णी
भाग २६: गर्दी आमचे दातारकाका लक्ष्मी रस्त्यावर राहतात. गणपतीतल्या गर्दीला टाळण्यासाठी ते दरवर्षीप्रमाणे यंदाही त्या दरम्यान गावाला गेले आणि सालाबादाप्रमाणे यंदाही गणपती बघण्यासाठी माणसांचा महापूर लक्ष्मी रस्त्यावर लोटलाच. वेगवेगळ्या गावांहून गाड्या भरभरून रोजच माणसं आली आणि प्रत्येकानं रस्त्यावरच्या गर्दीत भरच टाकली. दातारकाकांचं चूक नाही. दरवर्षी रस्त्यावरच्या गर्दीनं त्यांना त्यांच्याच घरात बांधून टाकल्यासारखं होतं. रस्त्यावर… Continue reading
-
बाई….. “माणूस” म्हणून: भाग २३, २४, २५ : डॉ. कल्पना कुलकर्णी
भाग २३: ई-दिवाळी “तुझा नवरा इथे नसताना तुमचा रोज फोन व्हायचा का गं?” माझी एक मैत्रीण चौकसपणे विचारत होती. मी फोनच्या पुढच्या जमान्यातली विरहिणी असल्याने तत्परतेने नकार दिला आणि सांगितलं, “नाही, आम्ही रोज एकमेकांना ई-मेल करायचो.” आता माझा नवरा परतलाय. त्यामुळे घरातल्या घरात ई-मेल न करता आम्ही एकमेकांशी बोलतोय, पण ह्याच्या मानगुटीवरून मात्र… Continue reading
-
बाई….. “माणूस” म्हणून: भाग २०,२१,२२ : डॉ. कल्पना कुलकर्णी
भाग २० : तीन देवियाँ जागतिकीकरणाचं युग होतं. एक आटपाट नगर होतं. तिथं एक धन्वंतरी राहत होता. धन्वंतरी मोठा सत्त्वशील आणि धैर्यशील होता. आरोग्यदेवतेबरोबरच आहारदेवता आणि व्यायामदेवतेचाही तो उपासक होता. त्यासाठी कडक व्रत करीत होता. धन्वंतर्याचे व्रत काय होते? सकाळी लवकर उठावे. “चितळे”, “साने”, “गोकूळ”, “कात्रज” असे कुठले तरी दूध… Continue reading
-
बालदोस्तांचे काव्यवाचन : ७, ८
भाग ७ चि. ओजस चौगुले कविता : माणसा, तूच तुझा वैरी कवी: चि. ओजस चौगुले भाग ८ कु. ऐश्वर्या रायते कविता : नातं कवयित्री : कु. ऐश्वर्या रायते Continue reading
-
बाई….. “माणूस” म्हणून: भाग १७,१८,१९ : डॉ. कल्पना कुलकर्णी
भाग १७: आमचे व्यायामाचे प्रयोग शालेय जीवनापासूनच आम्हा सर्वांची प्रयोगशीलता अनुकरणातच होती. म्हणजे साहित्य, कृती लिहून मिळालेली, वर्षानुवर्षांची चालत आलेली निरीक्षणं आपली आपण डोळे भरून करायची आणि पुस्तकातल्यासारखाच निष्कर्ष आला की आम्हाला भरून पावायचं. आम्ही प्रयोग तर करायचो हेही नसे थोडके! शालेय शिक्षण संपवून आम्ही संसारात पडलो, पण “प्रत्येक… Continue reading
-
बालदोस्तांचे काव्यवाचन : भाग ४ ते ६
भाग ४ कविता : बॅट्समन कवी: मंगेश पाडगावकर काव्यवाचन: चि. नाथन गाडगीळ भाग ५ कविता : ऑनलाईन शाळा कवयित्री: सिद्धी ढोके, काव्यवाचन: कु. ओवी चौगुले भाग ६ कविता : पतंग कवी:अ. ज्ञा. पुराणिक काव्यवाचन: कु. उत्पला गाडगीळ Continue reading
-
बालदोस्तांचे काव्यवाचन : भाग १ ते ३
भाग १ कविता : कुकर कवी: सुबोध खानोलकर काव्यवाचन: कु. राधा कुलकर्णी भाग २ कविता : ज्याचेत्यासी कवी: कुसुमाग्रज काव्यवाचन: कु. निक्षुभा कापडणीस भाग ३ कविता: अंधार कवयित्री : कु. राज्ञी कापडणीस काव्यवाचन: कु. राज्ञी कापडणीस Continue reading
-
बाई….. “माणूस” म्हणून: भाग १४,१५,१६ : डॉ. कल्पना कुलकर्णी
भाग १४: मनातलं घर सध्या बांधकाम व्यवसायाला चांगलीच मंदी असावी; कारण हल्ली दृकश्राव्य माध्यमात घरांच्या जाहिरातींची अगदी रेलचेल असते. प्रॉडक्ट खपवायला असतात तशा प्रत्येक जाहिरातीचं आकर्षक वेष्टन वेगवेगळं असतं, पण सगळ्याच जाहिरातीतलं घर हे खात्रीनं “ग्राहकांच्या मनातलं”च असतं. प्रत्यक्षातली गृहखरेदी ग्राहकाच्या मनासारखी होते की नाही ते तो ग्राहकच जाणे; पण प्रत्येकाच्या मनात घर करून… Continue reading
-
बाई….. “माणूस” म्हणून: भाग ११,१२,१३ : डॉ. कल्पना कुलकर्णी
भाग ११ : संवाद मुलींच्या परीक्षा चालू होत्या. परीक्षेच्या अभ्यासात जास्त लक्ष न लागता सुटीतल्या कार्यक्रमांचे बेत करण्यातच मैत्रिणींचा जास्त वेळ जाऊ लागला. मी सईला वरवर दामटलं, पण मनातून मला खरं तर खूप छान वाटलं. चला, मुली मोठ्या व्हायला लागल्या. आपले “मैत्रिणी मैत्रिणींचे” कार्यक्रम ठरवायला लागल्या. त्यातलाच एक कार्यक्रम म्हणजे… Continue reading
Recent Posts
