अल्पारंभ
-
माणसं जनातली ..माणसं मनातली : लेखांक १०: प्रा. मधुसूदन नाडकर्णी आणि लेखांक ११: श्री. अशोक अरोंदेकर — श्री. बलबीर अधिकारी
लेखांक १०: प्रा. मधुसूदन नाडकर्णी खादीचा कोट, सदरा व पतलून, सहा फूट उंची, करडी झाक असणारे केस शांत नजर, चेहर्यावर एक निर्मळ साधेपणा व विषयाचे निरूपण करतांना जाणवणारा आवाजातील एक विशिष्ट गोडवा. एवंगुण विशिष्ट नाडकर्णी सर जेव्हा वर्गात येत तेव्हा आम्ही पदवीला रसायन हा प्रमुख विषय घेतलेले विद्यार्थी, आपलेपणाच्या अनुभवाने चिंब भिजत असू.… Continue reading
-
माणसं जनातली ..माणसं मनातली : लेखांक ९: पुरूषोत्तम मांडे आणि १०: डॉ. ग. ह. टिळक : श्री. बलबीर अधिकारी
पुरूषोत्तम मांडे ““महाराष्ट्रात आजवर केवळ तीन पुरूषोत्तम जन्माला आले आहेत.”“ कोण ! म्हणून भोळसटपणे विचारता, पुरूषोत्तम भास्कर भावे, पुरूषोत्तम लक्ष्मण देशपांडे व…… पुरूषोत्तम रामदास मांडे असे स्फोटक विधान गंमतीने करणारा पु. लं. च्या विनोदाला सर्वांगाने दाद देणारा. पु. भा. च्या प्रखर राष्ट्रवादी विचारांचा मस्तीत जगण्याची मनापासून कदर करणारा अन् इंग्रजी, मराठी व हिंदी… Continue reading
-
माणसं जनातली ..माणसं मनातली : लेखांक ७: सुरेश देखणे आणि ८: अशोक वैद्य : श्री. बलबीर अधिकारी
लेखांक ७: सुरेश देखणे सदा मित्रांच्या घोळक्यात असणारा, आपल्या मधाळ बोलण्याने समवयस्कांबरोबर त्यांच्या आईवडिलांवरच नव्हे तर इतर संबंधितांवरही छाप पाडणारा, सिध्यांशी सीधा अन् बेरक्याशी दादागिरी करू शकणारा, अभ्यासात साधारण पण गाणे व संगीताची जाण असणारा सुरेश जेव्हा माऊथ ऑर्गनवर अथवा ओठावर एखादे भावगीत घेऊन उभा असे तेव्हा तर भगिनीवर्गांचीही मोठी पंचाईत होत असे. त्याच्याशी… Continue reading
-
माणसं जनातली ..माणसं मनातली : लेखांक ५ आणि ६: जया : फकिरा आणि सय्यदनूर : श्री. बलबीर अधिकारी
लेखांक ५ जया उन्हाळ्याची सुटी होती. नाशिकरोडच्या शाळेत शिकणारा मी परीक्षा संपवून घरी परतलो होतो. घरची व वडिलांची बटाईने घेतलेल्या शेतातली काहीबाही कामे चालू होती. आमचे काम करणे व नदीवर पोहणे जोरात सुरू होते. आमच्या गावी राहणार्या रामूकाकांची नातवंडे मुंबईहून गावी हवा पालटायला येत. त्यांच्याभोवती पोरे जमत. पोहणे, विटीदांडू, लगोर्या व पत्ते… Continue reading
-
बाई….. “माणूस” म्हणून: भाग ४४,४५, ४६ डॉ. कल्पना कुलकर्णी
भाग ४४: सख्खे शेजारी माझी आणि आजींची ओळख गेली आठ वर्षे आहे. माझी सई तान्ही होती तेव्हा त्यांची नात एक वर्षाची होती. दोन्ही मुलींना बाबागाडीत फिरवताना आम्ही भेटलो, ओळख झाली. त्यांची नात तिच्या गावाला परत गेली तरी आमची ओळख वाढली. “जाणं-येणं असलेला शेजार” या सदरात आमची दोन्ही कुटुंब गणली गेली. सध्या त्यांच्या ऐसपैस घरात… Continue reading
-
बाई….. “माणूस” म्हणून: भाग ४१,४२,४३ डॉ. कल्पना कुलकर्णी
भाग ४१: आम्ही सर्व भारतीय एक आहोत कामानिमित्त लुधियानाला जायचे ठरते म्हटल्यावर अमृतसर आणि वाघा सीमेला भेट द्यायलाच हवी, असे जवळपास प्रत्येकानेच सांगितले. अमृता प्रीतमच्या पंजाबजध्ये फिरायचे, या भावनेने मीही हरखले. भारताच्या सीमेवर पाऊल ठेवायला मिळणार या विचाराने ऊर दाटून आला. जालियनवाला बागेतील माती कपाळी लावायची, हे ठरवताना इतिहासाच्या… Continue reading
-
बाई….. “माणूस” म्हणून: भाग ३८,३९,४०: डॉ. कल्पना कुलकर्णी
भाग ३८: इंडियन स्टँडर्ड टाईम मध्यंतरी मुलीच्या एका स्पर्धेला जायचा योग आला. प्रवेशिका एकदम चकाचक. सोनेरी अक्षरात वेळ, ठिकाण छापलेलं. “वेळेच्या आधी दहा मिनिटे स्थानापन्न व्हावे”. ही सूचनाही आवर्जून छापलेली. स्पर्धेचं ठिकाण घरापासून लांब होतं म्हणून मी आपली तासभर आधीच घरातून निघून वेळेआधी पाच मिनिटं तिथे पोहोचले. सगळा शुकशुकाट. खूप फिरल्यावर आवारात दोन… Continue reading
-
बाई….. “माणूस” म्हणून: भाग ३५,३६,३७: डॉ. कल्पना कुलकर्णी
भाग ३५: आठवण हल्लीच्या घरांना “लॅच” नावाचं जास्त सुरक्षा देणारं जे कुलूप असतं त्याची मला खूप दहशत आहे. “आई दारात, बाळ घरात, वारा जोरात” असा घटनाक्रम घडतो आणि हे लॅच हमखास लागून जातं. किल्ली कधी कमरेला नसतेच, मग तो हलकल्लोळ! प्रत्येकाच्या ओळखीत कधी ना कधी अशा गोष्टी घडलेल्या असतातच. मी अशा गोष्टी ऐकून धडा… Continue reading
-
माणसं जनातली ..माणसं मनातली : लेखांक ३, ४: जयसिंग सोलंकी , जी. रामास्वामी : श्री. बलबीर अधिकारी
जयसिंग सोलंकी तुर्भे खत कारखाना 1965 साली सुरू झाला. त्या दरम्यान वेगवेगळ्या पदांवर रूजू झालेल्या मंडळीने आता आपला सेवाकाळ संपवला आहे. या प्रदीर्घ काळात ज्यांचा विविध अंगानी विकास झाला त्यात जयसिंग सोलंकी यांचे नाव पहिल्या काही नावात येऊ शकेल. आम्ही एकत्र यायला चेंबूरचे यूथ कौन्सिल प्रामुख्याने कारणीभूत ठरले. या युवा संस्थेत अशोक… Continue reading
-
बाई….. “माणूस” म्हणून: भाग ३२,३३,३४ : डॉ. कल्पना कुलकर्णी
भाग ३२: मनाचे संकल्प “नेमेचि येतो पावसाळा” या चालीवर दिवसांमागून दिवस, महिने, वर्षे उलटतच असतात. सुधीर मोघे म्हणतात तसं “काळ धावे म्होरं म्होरं, जणू वाघ लागे पाठी त्येच्या जोडीनं धावनं हेच मानसाच्या हाती…” कालचा दिवस मागे टाकून रोज उठून धावताना “मागील पानावरून पुढे चालू” असे आयुष्याचे रकाने भरताना आपण मागे वळून पाहतच असतो. सरत्या… Continue reading
Recent Posts
