।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन


अल्पारंभ

  • सकारात्मक भाषा

    एकदा दोन मैत्रिणींची मुलं झाडावर चढली होती. मुलं झाडावर उंच पोहचल्यावर अचानक जोराचं वादळ आलं. ते झाड वा-यानं गदागदा हालू लागलं.  पहिल्या मुलाची आई तिच्या मुलाला म्हणाली, “पडशील”. तर दुस-या मुलाची आई म्हणाली, “सांभाळ, घट्ट पकडून ठेव” ! खरंतर दोन्ही मैत्रिणींना आपापल्या मुलांना पडण्यापासून वाचवायचं होतं. परंतु त्यांच्या मुखातून निघालेल्या संदेशांमध्ये मात्र विरोधाभास होता. परिणामी Continue reading

  • भारतात लवकरच डिजिटल करन्सी !

      भारतात लवकरच  डिजिटल करन्सी ! बिटकॉइन, इथर सारख्या खासगी क्रिप्टोकरन्सीला पर्याय म्हणून रिझर्व्ह बँकच नव्हे तर जगभरातील केंद्रीय बँका डिजिटल चलनावर काम करत आहेत.  डिजिटल क्रांतीमध्ये भारत कुठेही मागे राहता कामा नये यासाठी हे पाऊल उचलले जात आहे. आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर यांच्या मते  भारतालाही डिजिटल चलनाची गरज आहे. हे बिटकॉइनसारख्या खासगी व्हर्च्युअल करन्सी अर्थात क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक Continue reading

  • चांगल्या विचारांचा दिवा…. 🙏🏻🙂

    चांगल्या विचारांचा दिवा…. 🙏🏻🙂 दीपोत्सवाच्या  निमित्याने “चांगले विचार “रुजवायचा छंद लावण्याचा एक दिवा नक्की लावा 👍👍👍 माझ्या सर्व छंदांमध्ये हा छंद माझ्या सर्व अडचणीनं मधे खूप कामाला आला …येत आहे. जीवनात यशस्वी व्हायचंय कीं स्थिरता हवी!!… ह्यावर विचार केला… चांगल्या विचारांनी स्थिरता तर येतेच पणं तब्बेतही सुदृढ  रहाते,हें लक्षात आलं आणि स्थिरता महत्वाची वाटली आणि Continue reading

  • मिट्टी वाले दीये जलाना..अबकी बार दीवाली में !!

      राष्ट्रहित का गला घोंटकर,                      छेद न करना थाली में… मिट्टी वाले दीये जलाना,                     अबकी बार दीवाली में ! देश के धन को देश में रखना,                   Continue reading

  • थोडी गंमत, थोडा भाषाविलास: विरोधाभासी शब्दप्रयोग – शशि थरूर

      थोडी गंमत, थोडा भाषाविलास: विरोधाभासी शब्दप्रयोग  –   शशि थरूर               माझ्यासारख्याराजकारण्याला  oximoron म्हणजे विरोधाभास  या अलंकाराच्याउपयोगाचीनीट ओळख असणे फारच आवश्यक आहे. वरवर परस्परविरोधीअसणारे शब्द यात एकत्र योजिलेलेदिसतात. आता हेच वाक्य पहा. “ पक्षनेत्याबद्दलची आपली  अविचल निष्ठा शपथपूर्वकप्रकट करत असतानाच आपल्यालाअन्यत्र कुठे अधिक चांगली  संधी लाभते आहे का याकडे त्याची Continue reading

  • आर्थिक साक्षरतेसाठी, ‘अर्थ साक्षरता दूत’ ॲप

      आर्थिक साक्षरतेसाठी, ‘अर्थ साक्षरता दूत’ ॲप  नाशिक  येथीलमविप्र समाजाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या, तृतीय वर्षीय संगणक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी, अल्परंभा सांस्कृतिक आणि शैक्षणिक फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली  “अर्थसाक्षरता दूत” हे  मोबाईलअप्लिकेशन विकसित केले आहे.  आपल्यादेशातील अर्थ साक्षरतेचे प्रमाण केवळ २४% इतके अत्यल्प आहे. अनेक नागरिकांना आर्थिक क्षेत्रासंबंधित  मुलभूतज्ञान अवगत नसते.   तेव्हासमाजामध्ये  आर्थिकसाक्षरतेचा प्रसार  व्हावाआणि याविषयी जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देश्याने  हे ॲप Continue reading

  • माणुसकी ची भिंत : नीला सत्यनारायण (संकलित )

       “9/11‘ला दहशतवादी हल्ला झाला, त्या वेळची एक हृदयस्पर्शी कथा आहे. दोन विमाने वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन टॉवरवर आदळली आणि दोन्ही टॉवर जमीनदोस्त झाले, तर दुसऱ्या.मार्गावरून जाणारे आणखी एक विमान पाडण्यात आले. ही खबर मिळताच सुरक्षा यंत्रणा सक्रिय झाली. जगभरातून जी विमाने अमेरिकेकडे येत होती, त्या सगळ्यांनाच रेडिओ मेसेज केले गेले, की अमेरिकेला येण्याचे रद्द करा, Continue reading

  • नाती : डॉ. सौ. रुपाली दिपक कुलकर्णी, नासिक

    नाती… ज्यांच्यामुळे..      मनी आनंद लहरी,  सुखद क्षणांच्याही सरी,      मनोविश्व माझे बहरी, नाती तीच !! ज्यांच्यामुळे..      मनी फुलतो वसंत,समाधानही अनंत,      माझे क्षण शोभिवंत, नाती तीच ! ज्यांच्याकरिता..     मन कल्पिते नवनवे, शोधी भेट प्रयोजने,     आठवांनी भरू पावे, नाती तीच ! ज्यांच्यामुळे..        चढे कळस कतृत्वास, बहर नवे Continue reading

  • जिवतीच्या प्रतिमेचा भावार्थ

      मानवाला अनादी काळापासून घडणाऱ्या घटनांचं कौतुक आणि त्याबद्दल उत्सुकता आहे. याच उत्सुकतेमधून तो नवनवीन आविष्कार आणि गूढ घटना यांबद्दल आदरभाव दाखवत आलेला आहे. या आदराचं रूपांतर त्या अनाकलनीय गूढाचा सत्कार व पूजन करण्यात झालं. यातूनच ते गूढ पिढ्यांपिढ्या पुजल्या जाऊ लागलं . असाच एक गूढ दार पिढ्यांनी पुजलं ते ‘जिवती पूजन’ या रूपात.  कोण Continue reading

  • चंगळवाद ? आपण सूर्य निवडू या

    तुमच्या आयुष्याचं उद्दिष्ट काय आहे?  आत्ता काल-परवापर्यंत “पैसा, समाधान, शांती” हे शब्द ऐकू यायचे. हल्ली थेट विकेट पडते – “मला फक्त मज्जा करायचीये”. विषय संपला.   “मज्जा केलीच पाहीजे” ही बळजबरी माणसं एकमेकांच्या ऊरावर पांघरू लागलीयेत. इथे “मज्जा” ही निवडीची गोष्ट राहीली नाहीये; ती “निकड” झालीये; केली गेलीये. मज्जा कशी करायची हे निवडण्याचंही स्वातंत्र्य नाही;  ती Continue reading