–

जगास साऱ्या सुखात ठेवा, हेच मागणे गणरायाला,
संकटकाळी तुम्हीच धावा, हेच मागणे गणरायाला..
जरी वेगळे विचार अमुचे, माणुस म्हणुनी नको दुरावा,
मनामनातिल मिटवा हेवा, हेच मागणे गणरायाला..
दुर्वांची मी जुडी वाहतो, मोदक लाडू अर्पण करतो,
खिरापतीचा प्रसाद घ्यावा, हेच मागणे गणरायाला..
लहानग्यांचे तुम्ही लाडके, ज्येष्ठांचेही आवडते हो,
तरुणाईला रस्ता दावा, हेच मागणे गणरायाला..
अनेक नावे जरी तुम्हाला, एकोप्याचे प्रतिक तुम्ही,
विघ्नविनाशक मानव घडवा, हेच मागणे गणरायाला..
मंगलदायक तुमचे येणे, चराचराला उजळुन जाणे,
इथे रहावे असेच देवा, हेच मागणे गणरायाला !!

- प्रशांत केंदळे,नाशिक
(८०८७१७२२४१)

Leave a comment