–

पुरेशी काळजी घेतली नाही ,कागदपत्रांची नीट नोंद ठेवली नाही, आळसापोटी दुर्लक्ष केले की कधी कधी आपलीच संपत्ती आपल्या नकळत गहाळ होते. आणि जेव्हा अशा अनेकांची हीच परिस्थिती होते तेव्हा लहान -सहान ठेवी एकत्रितपणे मोठा आकडा उभा करतात.
जुलै २०२५ च्या आकडेवारीनुसार भारतीय बँकांमध्ये ₹६७,००३ कोटींपर्यंतच्या अवशेष ठेवी (Unclaimed Deposits) जमा आहेत. ही ठेवी अनेकदा खातेदारांच्या मृत्यूनंतर किंवा दीर्घकाळ व्यवहार न केल्यामुळे निष्क्रिय खात्यांमध्ये राहतात. RBI (रिझर्व बँक ऑफ इंडिया) ने नागरिकांना हे पैसे परत मिळवण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे — UDGAM पोर्टल!!
🌐 UDGAM म्हणजे काय?
UDGAM (Unclaimed Deposits – Gateway to Access inforMation) हे RBI द्वारे सुरु करण्यात आलेलं एक सेंट्रल ऑनलाइन पोर्टल आहे. याच्या माध्यमातून तुम्ही विविध बँकांमधील तुमच्या किंवा तुमच्या नातलगांच्या नावे असलेली हरवलेली ठेवी शोधू शकता.

🔎 कोणती माहिती मिळवता येते?
- तुमच्या नावे असलेली निष्क्रिय बँक खाती
- FD किंवा RD चे रकमेचे तपशील
- मृत व्यक्तींच्या नावाने असलेले निधी
- कोणत्या बँकेत आहेत हे तपशील
✅ UDGAM पोर्टलचा वापर कसा कराल?
- पोर्टलला भेट द्या 👉 https://udgam.rbi.org.in
- ‘Register’ वर क्लिक करा — तुमचं नाव, मोबाइल क्रमांक, ईमेल नोंदवा
- OTP द्वारे लॉगिन करा
पोर्टलवर खालील माहिती शोधा:
- खातेदाराचं नाव
- जन्मतारीख
- ओळख क्रमांक (PAN/Aadhaar वैकल्पिक)
- तुमच्या नावावर ठेवी असल्यास, त्याचे तपशील दिसतील
- पुढे त्या बँकेशी संपर्क साधून रक्कम परत मिळवण्यासाठी प्रक्रिया पूर्ण करा
📈 किती लोकांनी वापर केला आहे?
जुलै २०२५ पर्यंत 8.59 लाखाहून अधिक लोकांनी UDGAM पोर्टल वापरून आपले पैसे शोधले आहेत. केवळ SBI मध्येच ₹19,330 कोटी रुपये असे निष्क्रिय ठेव स्वरूपात आहेत!
⚠️ सावधगिरी:
केवळ अधिकृत RBI पोर्टलच वापरा
कुठल्याही लिंकवर OTP शेअर करू नका
माहिती योग्य प्रकारे भरा
💬 लक्षात ठेवा:
हरवलेली संपत्ती तुमच्याच नावे आहे — फक्त शोध घेण्याची आणि प्रक्रिया पार पाडण्याची गरज आहे! आजच https://udgam.rbi.org.in ला भेट द्या आणि तपासा — कदाचित तुमचं किंवा तुमच्या कुटुंबाचं धन तुमची वाट पाहत असेल !पाहत असेल !
टीम अल्पारंभ


Leave a comment