
आपल्या सर्वाना माहीतच आहे की भारत हा जगातील क्रमांक एकचा प्लास्टिक प्रदूषक देश आहे. भारत दरवर्षी ९.३ दशलक्ष टन प्लास्टिक कचऱ्याची पर्यावरणात भर घालतो आहे. धरती, पाणी, वायू यांचे अतिरेकी प्रदूषण जगभरात सुरु आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन ‘खारीचा वाटा’ या विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या लहान मुलांच्या संघटनेने आपल्याला ह्यावर काय करता येईल यावर समाधान शोधायला सुरुवात केली. भाजी मंडईत किंवा किराणा दुकानांतून ज्या प्रकारे प्लास्टिक कॅरीबॅग्स वापरून भाज्या/फळे/ वस्तूंची विक्री सुरु असते आणि प्लास्टिकचा अतिरेक सर्वत्र दिसत असतो ते बघून त्यांनी ‘प्लास्टिक कॅरी बॅग्स’ च्या वापराविरुद्ध काम करण्याचे ठरविले.
पहिल्या प्रयत्नात भाजी मंडईतुन ५००० प्लास्टिक कॅरी बॅग्स चे उच्चाटन करण्याचे लहानसे ध्येय त्यांनी घेतले आहे. पर्यावरण जपणूक साधण्यासाठी केवळ जुने, चांगले कपडे रिसायकल करून त्यापासून पिशव्या शिवून घेण्याचा संकल्प त्यांनी घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत मुले/पालक घरोघर जाऊन न वापरातील, जुने पण चांगले कपडे गोळा करून नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाइंड्स अर्थात NAB या संस्थेतील अंध बांधवांकडून पिशवी शिलाई करून घेत आहेत. यातून पर्यावरण संरक्षण आणि समाज बांधवांच्या हातांना काम असा दुहेरी हेतू ते साध्य करीत आहेत. पिशवी शिलाईसाठी लागणारा खर्च ते देणगींच्या माध्यमातुन उभा करत आहेत. नासिक मध्ये होणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या ठिकाणी स्टॉल लावून ही लहान मुले जागरूकता कार्यक्रम , पथनाट्य अशा माध्यमातून या विषयावर काम करीत आहेत.
आजमितीस या उपक्रमात तयार केलेल्या ४५०० कापडी पिशव्यांनी बाजारातील प्लास्टिक कॅरी बॅग्सची जागा घेतली आहे. अशाप्रकारे कापडी पिशव्या तयार करून, भाजी मंडईत आणून भाजी विक्रेत्यांमार्फत ग्राहकांच्या प्लास्टिक कॅरीबॅग्स मागायच्या सवयीशी दोन हात करण्याचा निर्धार आहे.
त्यांच्या कामासाठी त्यानां शुभेच्छा !!‘

पथनाट्याचे शब्द :
फार फार पूर्वी होती, नगरे सगळी आटपाट 📜
पशुपक्षी, जलचर-मानव, एकत्र नांदत होते सुखात 🐘🐦🐠
प्रदूषण मुक्त होते बर का, भूमी-वायू आणि जल 🌍💨💧
सकस अन्नग्रहण होते, आजारांची नव्हती सल 🍛🥗
वाणसामान-भाजीपाला, यायचा कापडी पिशव्यांतून 🛍️🥦
दुध-दही-ताक, मिळे काचेच्या बाटल्यांतून 🥛🍶
सर्व जीवजंतू होते, स्वस्थ आपुल्या घरांतून 🏡🦜🐶
प्रदूषणाची चिंताच नव्हती, कोणाच्याही मनांतून 🧘♀️
विज्ञानाने मग लावला, प्लास्टिकचा शोध 🔬🧪
वाणसामान, भाजीपाला, प्लास्टिक पिशव्यात सरळसोट 🛒🍅
दुध-दही-ताक-पाणी, आता प्लास्टिक मध्ये विराजमान 🥤🧴
वापरा-फेका तत्वामुळे, होतोय कचरा आणि घाण 🚮♻️
भूमी-नद्या-सागरही, प्लास्टिक कचऱ्याने व्यापू लागला 🌊🏞️🌐
पशुपक्षी, जलचरांचा, जीव त्यात कोंडू लागला 🦢🐠
मायक्रो प्लॅस्टिक मिश्रित अन्न, माणूस लागला करू ग्रहण 🍽️⚠️
कॅन्सर आदी आरोग्य समस्या, बनू लागल्या अधिक गहण 🏥🎗️
मग आम्हा लहानांनी ठरविले, हताश बसणे सोडूया 👧🧒
प्लास्टिकच्या घातक प्रदूषणाशी, लढा एकत्र देऊया 🤝🌱
कापडी पिशव्यांचा वापर, आता आपण सुरु करू 🧵👜
सर्व जीवांसाठी आपला, खारीचा वाटा नक्की उचलू 🌿💚
आमच्या या कार्यामध्ये, तुम्हीही घ्यावा सक्रिय सहभाग 🙏👫
जुने-चांगले कपडे देऊन, साधावा आपला कार्यभाग 👚🎽
कापडी पिशव्या शिवून होताच, त्यांचाच वापर जरूर करा 🪡🛍️
प्लास्टिकच्या विळख्यातून, पृथ्वी आपली मुक्त करा 🌏🚫🛍️
पृथ्वी आपली मुक्त करा 🌍💫
‘खारीचा वाटा’ @ विविध माध्यमे
पथनाट्य @ युट्युब : लिंक खालील प्रमाणे
https://www.youtube.com/watch?v=C2nQD01z35g
युनिक फीचर्सने कव्हर केलेला लेख
https://unique-features.com/articles/lekh/small-contribution-in-environment-protection-paryavaran-sanrakshanat-kharicha-vata
देशदूत कट्टा मुलाखत
https://www.youtube.com/watch?v=H7Br43DSxrs&feature=youtu.be
अधिक माहिती:
खारीचा वाटा: कापडी पिशवी प्रकल्प
स्वाती : ९९२३८३०९२०
प्राची : ७७१९० ०७६४८
रुपाली : ९०११८९६६८१
सहाय्य्क संस्था : अल्पारंभा फाऊंडेशन, नासिक
उपक्रमासाठी आर्थिक मदत @ https://alparambha.com/payment.php

Leave a comment