–

२०२५ सालचा खो-खो विश्वचषक हा पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला होता. भारत या विश्वचषकाचा आयोजक देश होता. नवी दिल्लीतील इंदिरा गांधी एरिनामध्ये १३ ते १९ जानेवारी २०२५ दरम्यान या विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जगभरातील २० पुरुष आणि १९ महिला संघांनी सहभाग घेतला होता. भारताने खो-खो विश्वचषकाच्या पहिल्याच आवृत्तीमध्ये पुरुष आणि महिला दोन्ही गटांमध्ये विजेतेपद मिळवून इतिहास रचला आहे.

पुरुषांच्या अंतिम सामन्यात भारताने नेपाळचा ५४-३६ असा पराभव करून विजेतेपद मिळविले आणि प्रियांका इंगळेच्या नेतृत्त्वाखालील भारतीय महिला संघाने नेपाळचा ७८-४० असा दणदणीत पराभव करत विजेतेपद मिळविले. भारतीय लेकींनी सुरवातीपासूनच खेळात आपले वर्चस्व दाखवले. नेपाळ संघाने भारतीय संघापुढे अक्षरशः गुडघे टेकले.

खो-खो हा भारताचा पारंपरिक खेळ असून, या विजयामुळे या खेळाच्या जागतिक स्तरावरील लोकप्रियतेत वाढ होण्याची अपेक्षा आहे.
दोन्ही संघांचे मनापासून अभिनंदन आणि भविष्यातील अशाच नेत्रदीपक कामगिरीसाठी शुभेच्छा !!
– टीम अल्पारंभ आणि SWS

Leave a comment