विश्वेश सुवर्णकार
आज रोटरी क्लब ऑफ नाशिक नॉर्थ तर्फे दिल्या जाणार्या, आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी, प्रमुख पाहुणे म्हणुन आलेल्या अनोख्या व्यक्तिमत्वाची भेट झाली !भारतातील एक महान व्यक्तिमत्त्व, दोन वेळा राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित, सीनियर साइंटिस्ट, संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज माऊली यांच्या काकांचे वंशज असणारे श्री. डॉ ओमप्रकाश गणपतराव कुलकर्णी ! यावेळी त्यांना ऐकण्याचा आणि भेटण्याचा योग आला.

त्यांचा मला झालेला हा अल्पसा परिचय.
२०१० साली UPSC च्या परिक्षेत ‘जगातील पहिल्या सोलार उष्णतेवर चालणाऱ्या एअर कंडीशनरचा शोध लावणारे शास्त्रज्ञ कोण?’, हा प्रश्न विचारण्यांत आला होता व त्याचे उत्तर, प्रा. डॉ. ओमप्रकाश गणपतराव कुलकर्णी, असे आहे.
डॉ कुलकर्णी हे, माजी राष्ट्रपती आणि प्रक्षेपास्त्र शास्त्रज्ञ श्री A P J अब्दुल कलाम सर, यांच्यासोबत त्यांच्या ‘नॅनो कार्बन फायबर फ्लेक्सिबल सोलर टेक्नोलॉजी परियोजन’ प्रकल्पाचे प्रमुख म्हणुन साडेतीन वर्षे कार्यरत होते. ते १६ विद्यापीठे आणि ३७ शैक्षणिक संस्थांचे मार्गदर्शक आणि सल्लागार आहेत. आणि त्यांच्या कर्तृत्वाची अनोखी उंची म्हणजे त्यांच्याकडे विविध अशा २३ वैज्ञानिक शोधांचे पेटन्ट आहेत. राष्ट्रीय व आंतर्राष्ट्रीय पातळीवर त्यांना आजवर २५६ पेक्षा अधिक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यापैकी काही पुढील प्रमाणे :
१) जगातील १०० तरुण शास्त्रज्ञांपैकी सर्वोत्कृष्ठ शास्त्रज्ञ ( भारतातील एकमेव ) – द्वारे स्टॉकहोम
२) आंतरराष्ट्रीय युरोप गुणवत्ता पुरस्कार – द्वारे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन
३) देशाच्या प्रगतीत उल्लेखनीय वैज्ञानिक योगदाना बद्दल राष्ट्रपती पुरस्कार – २ वेळा
४) सर्वोत्कृष्ठ प्रथितयश अभियंता (Outstanding Engineer) – द्वारे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स, इंडिया
५) राजीव गांधी अक्षय ऊर्जा पुरस्कार महाराष्ट्र शासन ऊर्जा अभिकरण संस्था
६) अपारंपारिक ऊर्जा आधारित उपकरणांचे सर्वोत्कृष्ठ उत्पादक – द्वारे अपारंपारिक ऊर्जा मंत्रालय, दिल्ली.
७) कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे यांचे विशेष उल्लेखनीय प्रतिष्ठित माजी विद्यार्थी म्हणून सन्मानित
८) वॉलचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सांगली यांचे विशेष उल्लेखनीय प्रतिष्ठित माजी विद्यार्थी म्हणून सन्मानित
९) इंडिया स्मार्ट ग्रिड फोरम कडून २०२२ साली ऑर्डर ऑफ मेरिट (विद्युत वाहनांसाठी ऊर्जा संग्रहण – पेटंट आहे)
१०) इंडिया स्मार्ट ग्रिड फोरम कडून २०२३ साली प्लॅटिनम पुरस्कार (चुंबकरहित स्केलेबर रुफटॉप विंड इलेक्ट्रिक जनरेटर
पेटंट आहे)
११) इंडिया स्मार्ट ग्रिड फोरम कडून २०२३ साली सुवर्ण पुरस्कार (धरणांच्या स्पिलवेवरुन वाहून वाया जाण्याऱ्या पाण्यापासून अतिरिक्त विद्युत निर्मिती – पेटंट आहे)
इत्यादी अनेक !
भारतातील तसेच विविध २९ + देशांमधे अनेक वेळेस संशोधकांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत – सम्मेलनांत/विद्यापीठांत मुख्य अतिथी / मुख्य / तज्ञ व्याख्याते म्हणून त्यांची उपस्थिती आहे. आजवर भारतांत व विविध देशांत विज्ञान-तंत्रज्ञान, बौध्दिक संपदा, पर्यावरण संवर्धन- कॉर्बन न्यूट्रॅलिटि, वैदिकांची विज्ञान निष्ठा, भारतीय अध्यात्माची वैश्विक व्यापकता, रामायण, श्री मदभग्वद्गीता, उपनिषदे, महायोगी अरबिंदो, मूर्तिपूजेची वैज्ञानिक बैठक, इत्यादी विषयांवर त्यांनी ११,७०० पेक्षा अधिक व्याख्याने दिलेली आहेत.

अशा व्यक्तिमत्वाची भेट होणे हे सौभाग्यच म्हणावे लागेल ! नाही का ?
-विश्वेश सुवर्णकार
क्लस्टर मॅनेजर क्लस्टर मॅनेजर
आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड

Leave a comment