।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन


ऑनलाईन पेमेंट: नवीन फसवणूक प्रकार

Take Care, Avoid Frauds.

नमस्कार मी डॉ आशिष रानडे, गायक आणि संस्थापक, कलाश्री संगीत गुरुकुल, नाशिक ! आमच्या संगीत गुरुकुलामध्ये अनेक विद्यार्थी गाण्याचे शिक्षण घेण्यास येत असतात. सध्या मोठया प्रमाणात चालणारे आर्थिक फसवणुकीचे प्रकार बघता, या संदर्भात मला आलेला एक अनुभव तुमच्याबरोबर शेअर करू इच्छितो जेणेकरून तुमच्या बाबतीत जर असा काही प्रकार झाला तर तुम्ही योग्य ती दक्षता घेऊ शकाल !

आज ‘मला गाणे शिकायचंय” असा एका नम्बरवरून मला मेसेज आला. मेसेंजर अँपवरच त्या व्यक्तीने वर्गासंबधी सर्व चौकशी केली आणि फी बद्दल विचारले. मी ती माहिती देताच मला माझ्या Google Pay अँपवर फीच्या रक्कमेच्या जवळपास दुप्पट रक्कमेचा आकडा आला. मी काळजीपूर्वक तपासले असता तो अँपचा मेसेज (chat) स्वरूपातला आकडा असून पेमेंट रक्कमेचा आकडा नाही हे माझ्या लक्षात आले. त्या व्यक्तीने पुन्हा, Google Pay अँपवर ‘ Payment Done’ असा नवीन मेसेजही मला केला. आणि चॅटवरच मला अनेकदा मेसेज करत राहिला की Advance Payment चुकून जास्त केले गेलेय तेव्हा मला निम्मी रक्कम परत करा !! मला आलेला मेसेज ही चॅट मेसेजमधील रक्कम आहे हे लक्षात आलेच होते. तथापि मी त्या व्यक्तीस, ‘बँक अकाउंट चेक करुन सांगतो’ असे सांगून दूर ठेव्याचा प्रयत्न केला. पण त्याने खूपदा विचारणा केली. नंतर त्याची बोलण्याची भाषाच बदलली. पण मी ‘बँकेत रक्कम जमा झालेली नाही’, असे सांगत माझ्या मतावर ठाम राहिलो. शेवटी त्या व्यक्तीस लक्षात आले की आपली काही डाळ शिजत नाहीये आणि तो प्रकार शेवटी थांबला.

पण त्यावेळी मी घाईत असतो आणि मेसेज चॅट स्वरूपात आहे हे लक्षात आले नसते तर कदाचित मी त्या रक्कमेचे पेमेंट करून टाकले असते. परंतु बँक खात्यात पैसे जमा झाल्याशिवाय कोणताही व्यवहार कन्फर्म करू नये हे माझे सवयीचे धोरण कामात आले आणि माझी आर्थिक फसवणूक टळली !! तेव्हा ऑनलाईन पेमेंट घेणाऱ्यांनी सतर्क रहाणे कसे आवश्यक आहे हे सांगण्यासाठी हा लिखाण प्रपंच !! Take Care, Avoid Frauds !!

डॉ. आशिष रानडे,
संस्थापक,
कलाश्री संगीत गुरुकुल.

Contact No: 91 88887 74373


Discover more from ।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

Subscribe to get the latest posts sent to your email.



Leave a comment