।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन


Kavita

डाएट नि वेटलॉस…

डाएट नि वेटलॉसचा, करून गवगवा फार,
भूक लागताच मन, लगेच मानते हार !!

बर्गर, पिझा, जंकफुडचे, ऑप्शन चवदार,
स्विगी, झोमॅटो तत्सम, पर्याय आहेत फार,
डाएटची तपश्चर्या, जिभेपुढे फरार,
पदार्थांवर ताव मारून, मन मारते हार !!

आरशात पाहून, पोटावरची घडी,
मन म्हणते घालवीन ही, तरच नावाची खरी,
पण समोर येताच चितळेंची बाकरवडी,
फस्त करायला, मी लगेच मारते उडी !!

भरमसाठ पैसे भरून, लावते जिम,
नवीन ड्रेस नि बॅग मिरवत, जाते दिवस तीन,
वर्षाच्या मेम्बरशिपचे, पैसे होतात दान,
अजून पाच मिनिट म्हणत, snooze होतो अलार्म !!

जेव्हा म्हणते आता माझा control नाही ढळणार,
नेमके तेव्हाच येतात पाहुणे आणि सणवार,
मन म्हणते एखाद्या, लाडू करंजीने काय होणार ?
कधी एखादा चिरोटा, जिभेवर विरघळणार ?

मध्येच सुरु होतो, कॅलरीजचा हिशोब,
पदार्थांमध्ये चालू होतो, प्रथिनांचा शोध,
खाल्लेली कर्बोदके, आता कशी जाळणार ?
खाण्याची इच्छा कशी आणि किती मारणार ?

डाएटीशीअन, प्रोटीन-शेक ची चुकवून बिलं,
शरीर मात्र राहतं आहे तसच थुलथुलं,
तेव्हा वाटते उगीच केला, प्रयत्नांचा भडीमार,
काही उपयोग नाही, यांचा वेटलॉसला फार !!

मन म्हणते आजच्या क्षणात, जगण्याचा आनंद फार,
चमचमीत पदार्थांवर ताव मारून, मन होते गुलजार !!

  • सौ. कीर्ती हृषीकेश वाकदकर

Discover more from ।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

Subscribe to get the latest posts sent to your email.



Leave a comment

अल्पारंभाविषयी अधिक माहिती:

Our Officlal Website

 ई-मेल:alparambha@gmail.com

दुरध्वनी: ९०११८९६६८१