
भारतामध्ये बालविवाह बेकायदा असला तरी या संदर्भातल्या घटनांना पूर्णपने आळा बसलेला नाही, ही शोकांतिका आहे. अज्ञान, दारिद्र्य, रूढीप्रियता आणि परंपरा या कारणांनी बालविवाह घडून येतात. अशा विवाहामुळे बालकांचे शिक्षण, आरोग्य, खेळण्याचं वय हिरावून घेतलं जातं. बालविवाह या रुढीचे गांभीर्य लक्षात घेऊन राजा राममोहन रॉय, पं. ईश्वरचंद्र विद्यासागर, लाला गिरधारीलाल यांनी या अनिष्ट प्रथेविरुद्ध जनमत जागे केले. बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६च्या कलम ९ व १०नुसार बालविवाह लावणाऱ्याला दोन वर्षांपर्यंत कठोर कैद व १ लाख रुपये दंड सुनिश्चित केला गेला आहे. गेल्या १० वर्षांपासून बिहार बालविवाहाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. इथल्या ६९% मुलींचे विवाह १८ वर्षे वयापेक्षा कमी वयात झालेले आहे. दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान (६५%), नंतर झारखंड (६३%), उत्तर प्रदेश (६०%) आणि मध्य प्रदेश (५९%) अशी आकडेवारी आहे. पुरोगामी महाराष्ट्रात आजही अनेक ठिकाणी मुलींची लग्न १८ वर्षं पूर्ण होण्यापूर्वीच होतात.
या विषया संदर्भात जनजागृती करण्याचे कार्य अनेकविध प्रकारे केले जात आहे. नासिक येथील काही कलाकारांनी मिळून , या विषयावर आधारित गीत रचले आहे. हे गीत आपण जरूर ऐकावे !
गीत : पं. अविराज तायडे
संगीत : ज्ञानेश्वर कासार
संगीत संयोजक : ऋषी पाटील, अभिजित शर्मा
गायक : सुरज बारी
गायिका : आरती पिंपळकर
सहगायन : आर्या कापूरे, जागृती नागरे
ध्वनीमुद्रण : प्रशांत पंचभाई, श्रीरंग स्टुडिओ, नाशिक
Link:
https://drive.google.com/file/d/1g5_qV-XCNPusQ83GBHWy02yJtu-kEU6h/view?usp=drive_link

Leave a comment