
गोदावरीच्या तीरावरती, आनंद होतो पाहतांना,
मुले पोहती पाण्यात, हसता हसता खेळतांना !!
झाडे उगवली, फुले उमलली नदीच्या तीराला,
शोभा पाहुनी मुले आली, पाने फुले वेचायला,
मुलांचे विनोद ऐकुन, ढग हसले पोट धरून,
हसता हसता त्यांच्याकडील, पाणी उडाले भरभरून !!
मुलेही भिजली, फुले ही भिजली, पावसाच्या पाण्यात
संगतीला आले मोर सारे, नाचू लागले रानात,
मोर, फुलं, मुलं सारे, संगतीने नाचु लागले
त्यांना पाहून साऱ्या ढगांना, हसु पटकन आले !!
नदीकिनारी पाऊस धुंद,सगळे झाले चिंब, ,
ढगांचा झाला गडगडाट अन पाऊस झाला बंद,
सगळे आले ताळ्यावर, वाजू लागली थंडी,
निरोप घेतला मित्रांचा, पावसाने उडविली दांडी !!
वेदिका प्रविण कुलकर्णी
इयत्ता ७ वी

Leave a comment