चाल : सुखकर्ता , दुःखहर्ता … गणपतीची आरती प्रमाणे

जय देवी, जय देवी, जय गोदावरी, दक्षिणगंगे माते गोदावरी !!
पावन शिवभुमी त्रिंबक नगरी, येथेचि माता गोदा अवतरी
ब्रह्मगिरीद्वारे आली गंगाद्वारी, प्रकटे प्रवाहे माता गोदावरी ।। १ ।।
जय देवी, जय देवी …
श्रीराम सान्निध्य लाभले जीवनी, तपोकाले तटे भरे कुंभपर्वणी,
साधूसंतांची हो लागते वर्णी, पितरेही स्वर्गस्थ हिच्याच चरणी ।। २ ।।
जय देवी, जय देवी …
नितळ, निर्मळ, पात्र विशाल, मंदिरे-राउळे पावक भवताल,
माते बहुराष्ट्रे हो केली सुफल, धरणे जलसाठा होतो विपुल ।। ३।।
जय देवी, जय देवी …
बहुजन तृषार्थ अमृतजल, कृषी-उद्योगा देई नित्य बल,
विद्युतदायी असे समर्थ जल, लोककल्याणार्थ मातेचा कल ।। ४।।
जय देवी, जय देवी …
मंत्र ते तंत्र विस्तारी नगरे, मातेचे उपकार जनता विसरे,
लोकसंख्येचा सागर पसरे, माता संकोचली, प्रदूषण गहिरे ।। ५ ।।
जय देवी, जय देवी …
मातेचे विसरू नये औदार्य, घेऊ हाती चला स्वछताकार्य,
कचरा-अशुद्धी वा असो निर्माल्य, व्यवस्थापने मिटवू मातेचे शल्य ।। ६ ।।
जय देवी, जय देवी …
मातेचे उपकार स्मरा सकळ, गोदावरी राखू स्वच्छ-नितळ,
समर्पूनिया आपुले तन-मन, गोदामाता करू पुनः प्रसन्न ।। ७ ।।
जय देवी, जय देवी …
– डॉ. रुपाली दिपक कुलकर्णी, ट्रेनिंग हेड,
SWS Financial Solutions Pvt Ltd,
नासिक

Leave a comment