।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन


Simple Options for Investments: सोप्या गुंतवणुकीचे विविध पर्याय

आर्थिक गुंतवणूक हा शब्द बव्हंशी लोकांना खूप क्लिष्ट वाटतो. बऱ्याच लोकांचा असा समज असतो की गुंतवणूक ही खूप तणावपूर्ण प्रक्रिया असून ती आपल्याला जमणार नाही. परंतु प्रत्यक्षात मात्र बरेच असे गुंतवणुकीचे पर्याय आहेत जे सरकारी आहेत आणि सोपे आणि तुलनेने कमी / विना रिस्कचे आहेत. आपण अश्या गुंतवणूक पर्यायांबद्दल जाणून घेऊ या.

पोस्ट ऑफिस बचत खाते
• देय व्याज, दर, आवर्तन इ. – वैयक्तिक/ संयुक्त खात्यांवर वार्षिक ४.० %
• खाते उघडण्यासाठी कमीत कमी रक्कम आणि जास्तीत जास्त शिल्लक ठेवता येईल – खाते उघडण्यासाठी किमान रक्कम ५००/- रुपये जमा करावी लागेल.

५ वर्षीय पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉजिट अकाउंट (R.D. )
• दिनांक १.१.२०२३ पासून व्याजदर पुढीलप्रमाणे :- वार्षिक ५.८% (त्रैमासिक चक्रवाढ)
• खाते उघडण्यासाठी किमान रक्कम आणि जास्तीत जास्त शिल्लक ठेवली जाऊ शकते – खाते उघडण्यासाठी दरमहा किमान १००/- रुपये किंवा १०/- रुपयांच्या पटीत कोणतीही रक्कम चालते. कमाल मर्यादा नाही.

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉजिट अकाउंट ( T. D. )
• गुंतवणुक कमीत कमी रु. १०००/- आणि १०० च्या पटीत करावी.
• गुंतवणुकीला कमाल मर्यादा नाही.

पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम अकाउंट (M. I. S.)
• दिनांक १. १. २०२३ पासून व्याज दर ७.१% वार्षिक देय आहेत.
• १०००/- रुपयांच्या पटीत गुंतवणूक करावी.
• जास्तीत जास्त गुंतवणुकीची मर्यादा सिंगल अकाउंटमध्ये ४.५ लाख रुपये आणि जॉइंट अकाउंटमध्ये ९ लाख रुपये
• एखादी व्यक्ती एमआयएसमध्ये जास्तीत जास्त ४.५ लाख रुपये गुंतवू शकते (संयुक्त खात्यातील त्याच्या वाट्यासह)
• संयुक्त खात्यातील व्यक्तीच्या वाट्याची गणना करण्यासाठी, प्रत्येक संयुक्त खात्यात प्रत्येक संयुक्त धारकाचा समान वाटा आहे.

सुकन्या समृद्धी योजना
• व्याजदर ७.६% प्रति वर्ष (१. १. २०२३ पासून), वार्षिक आधारावर गणना , वार्षिक चक्रवाढ.
• एका आर्थिक वर्षात कमीत कमी रु.२५०/- आणि जास्तीत जास्त रु. १,५०,०००/, – ५०/- रुपयांच्या पटीत आवर्ती ठेवी.
• ठेवी एकरकमी करता येतात.
• एका महिन्यात किंवा आर्थिक वर्षात ठेवींच्या संख्येवर कोणतीही मर्यादा नाही

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (N.S.C.)
• ५ वर्षांचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (आठवा अंक)
• ७.०% वार्षिक चक्रवाढ परंतु परिपक्वतेच्या वेळी देय आहे.
• कमीत कमी रु. १000/- आणि रु. १00/- च्या पटीत गुंतवणूक करावी.
• गुंतवणुकीला कमाल मर्यादा नाही

किसान विकास पत्र (K.V.P.)
• वार्षिक ७.२% चक्रवाढ व्याज मिळते.
• गुंतवलेली रक्कम १२० महिन्यांत दुप्पट होते (१0 वर्षे )
• कमीत कमी रु. १०००/- आणि रु. १००/- च्या पटीत गुंतवणूक करावी.
• गुंतवणुकीला कमाल मर्यादा नाही.

प्रधानमंत्री जनधन योजना
• बचत योजना विशेषत: अशा व्यक्तींसाठी डिझाइन केली गेली आहे ज्यांचे भारतात बँक खाते नाही.
• खातेधारक कोणत्याही परिस्थितीत ३०,००० रुपयांचे आयुर्विमा संरक्षण आणि एक लाख रुपयांचे अपघाती विमा संरक्षणासाठी पात्र आहेत.
• खातेदाराला रु.५००० पर्यंत ओव्हरड्राफ्ट सुविधा दिली जाते, जी प्रति व्यक्ती एकापेक्षा जास्त खात्यांना लागू नाही.

अटल पेन्शन योजना
• ही योजना असंघटित क्षेत्रात काम करणार्या कोणत्याही व्यक्तीसाठी आणि ज्यांना सरकार पुरस्कृत कल्याणकारी कार्यक्रमातून आर्थिक मदतीची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी लागू आहे.
• व्यक्तींना अत्यंत कमी प्रीमियम भरावा लागेल आणि या योजनेचा लाभ घ्यावा लागेल.
• ही एक मजबूत सेवानिवृत्ती योजना आहे जी समाजातील दुर्बल घटकांना आणि असंघटित क्षेत्रात काम करणार्या व्यक्तींना नियमित उत्पन्नाचा लाभ देते.
• १८ ते ४० वर्षे वयोगटातील व्यक्ती यासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
• योजनेचा प्रीमियम दर खूप कमी आहे आणि कमीतकमी २० वर्षांच्या कालावधीसाठी भरावा लागेल.

राष्ट्रीय पेन्शन योजना
• राष्ट्रीय पेन्शन प्रणाली किंवा एनपीएस हा भारत सरकारने सर्व नागरिकांना वृद्धापकाळ ाचे उत्पन्न आणि सामाजिक सुरक्षा कव्हरेज प्रदान करण्यासाठी सुरू केलेला एक उपक्रम आहे.
• या योजनेचा लाभ भारतातील १८-६५ वर्षे वयोगटातील सर्व नागरिक घेऊ शकतात.
• टियर-१ खात्यासाठी, ग्राहकांना वार्षिक ६,००० रुपये आणि ५०० रुपये एकरकमी योगदान म्हणून देणे आवश्यक आहे.
• टियर -२ खात्यासाठी, ग्राहकांना वार्षिक २००० रुपये आणि २५० रुपये एकरकमी योगदान देणे आवश्यक आहे.

ह्या सगळ्या योजना समजायला खूप सोप्या आहेतच आणि ह्यांची माहिती सहजरित्या पोस्ट ऑफिसेसमध्ये, बँकांमध्ये उपलब्ध आहे. तसेच ह्या सगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूक सल्लागारांचाही सल्ला घेता येऊ शकतो. तर मग गुंतवणुकीचा श्रीगणेशा लवकरच करू या !

प्राची देशमुख,

संचालिका – BuffBrainery – An Advanced Learning Lab


Discover more from ।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

Subscribe to get the latest posts sent to your email.



Leave a comment