
राधा धनंजय ओढेकर ! बारा-तेरा वर्षांची चिमुरडी ! तिच्या वर्ग शिक्षकांच्या ग्रीटिंग कार्डसाठी तिने ही Path to Change ही इंग्रजी कविता लिहिली आणि आल्या लेकीकडून प्रेरणा घेऊन तिच्या आईने त्या कवितेचा मराठीत स्वैर अनुवाद केला आहे !!
या दोन्ही कविता , अल्पारंभाच्या वाचकांसाठी !!
Path to Change
The path to change is dark and cold
To crosss, you must be brave and bold
Twists and turns along the path
To feel its blessings
To feel its wrath
But after change comes peaceful light
A new beginning
That’s ever bright
The path to change is dark and cold,
But now I’m ready,
And brave and bold.
Radha Odhekar
तुझा ध्यास घेताना का एवढी हुरहूर
उंबरठा ओलांडायचाच आणि मारायचाच सूर
खाच खळग्यांनी केलंय जरी त्यांचं काम मन लावून
मी ठरवलंच आहे निघायचंय तावून सुलाखून
कारण ठाऊक आहे मला –
ह्या अभेद्य अंधारापलीकडे आहे प्रकाशाची वाट
एका स्वप्नाचं स्पंदन, एक नवी सुरुवात
©️ प्राची देशमुख


Leave a comment