।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन


प्रेरणादायी : राधिका गुप्ता , मुख्य कार्यकारी अध्यक्ष, एडलवाईस

 राधिका गुप्ता या एडलवाईस, वित्तीय सेवा कंपनीच्या एमडी आणि मुख्य कार्यकारी अध्यक्ष आहेत. वयाच्या ३३ व्या वर्षी सीईओ झालेल्या राधिका त्यांच्या शारिरीक व्यंगामुळे  अथवा दिसण्यामुळे नेहमीच हास्याची शिकार व्हायच्या ! त्यांचा जन्म पाकिस्तानात झाला होता आणि जन्मावेळी ओढवलेल्या गुंतागुंतीमुळे त्यांची मान तुटलेली होती ! त्यांना Girl with broken neck म्हणून ओळखले जाई ! पण आज भारताच्या युवा , मुख्य कार्यकारी अध्यक्ष (CEO) पदांवरील अधिकाऱ्यांत त्यांची गणना होते आणि भारतातील म्युच्युअल फंड क्षेत्रात  त्या पहिल्या महिला CEO आहेत !! 
 

वयाच्या २२व्या वर्षी त्यांना जेव्हा  कॉलेजनंतर नोकरी मिळाली नाही आणि आपल्या  सातव्या नोकरीच्या मुलाखतीत त्या अपयशी झाल्या तेव्हा  आत्महत्या करू बघणाऱ्या  राधिका याना मित्रांनी येऊन वाचवले !! 
गुप्ता यांनी २००५ मध्ये मॅकिन्से अँड कंपनीमध्ये व्यवसाय विश्लेषक म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. २००६ मध्ये त्या  पोर्टफोलिओ मॅनेजर म्हणून AQR कॅपिटल मॅनेजमेंटमध्ये  कार्यरत होत्या. २०१७ मध्ये एडलवाईस असेट  मॅनेजमेंटमध्ये  सीईओ म्हणून काम करण्याआधी , गुप्ता यांनी एडलवाईस मल्टी स्ट्रॅटेजी फंड मॅनेजमेंट मध्ये धोरणात्मक दिशा ठरवण्यासाठी, गुंतवणूक, विक्री आणि वितरणावर देखरेख करण्यासाठी काम केले आहे. 

२०२२ मध्ये  मर्सिडीजचे भारत प्रमुख श्री. संतोष अय्यर यांनी विधान केले होते  की, भारतात लक्झरी कारची विक्री शक्य नाही कारण येथे लोक पैसे खर्च करण्यापेक्षा बचत करण्यावर अधिक भर देत आहेत. त्यांनी थेट म्युच्युअल फंडांच्या SIP सारख्या योजनांना लक्ष्य केले, “जर लोकांनी त्यांची एसआयपी गुंतवणूक लक्झरी कार मार्केटकडे वळवली तर हा व्यवसाय खूप सुधारू शकतो,” असे श्री. अय्यर म्हणाले होते. त्यावर राधिका यांनी व्हिडिओ पोस्ट करून त्यांना सडेतोड उत्तर दिले होते आणि गुंतवणुकीचे महत्व अधोरेखित केले होते ! 
“Limitless: The Power of Unlocking Your True Potential” हे त्यांनी, आपल्या जीवन प्रवासावर  लिहिलेले प्रेरणादायी पुस्तक, एप्रिल २०२२ मध्ये प्रकाशित झालेले आहे.      
अशा या निडर, प्रेरणादायी आणि यशस्वी  महिलेस आमचा सलाम  आणि पुढील कार्यकाळासाठी त्यांना शुभेच्छा !!


Discover more from ।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

Subscribe to get the latest posts sent to your email.



Leave a comment