।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन


चित्रकाव्य : कौलारू घर

 

असावे सुंदर 👌🏽
कौलारू घर 🏠
आणि सभोताली 😇
आप्तांचा वावर 👨‍👩‍👧‍👧
लाल अंगणी साजिरे 🏡
शोभे भरदार वृंदावन 🍃
चाफा, जास्वंदी , मोगरीने 🥀🌺
सतत धुंदाविते मन  😊
नारळी, केळी,पोफळीची 🌴🌴
छपरावरी चामर 
दारी उभे स्वागताला 😊
आंबे, फणस तत्पर 🙏🏼
दरवळ भोजनाचा 
रांधे सुगरणीचा हात 🍤🥙🥭
मन आणि पोट 😊
भर तृप्तीची सुखात 🤩
मऊसूत घावणे,🫓
सोलकढी, मोदक, 🥥
आमरस, कैरीपन्हे 🥤🥭
शांतवाया उदक 😊
घर डुंबते असे  
हस्यकल्लोळात 😆
गप्पांचा फड 👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧‍👧
रंगे हरएक रात 🌚
राहो अशीच अखंड 💞
घर, सवंगड्यांचीही साथ ❤️
जावो आयुष्य सर्वांचे 😊
असे सुखात, सुखात 😇

 डॉ. रुपाली कुलकर्णी,

  ट्रेनिंग हेड,

  SWS  


Discover more from ।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

Subscribe to get the latest posts sent to your email.



Leave a comment