।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन


थोडी गंमत, थोडा भाषाविलास: विरोधाभासी शब्दप्रयोग – शशि थरूर

 

थोडी गंमत, थोडा भाषाविलास: विरोधाभासी शब्दप्रयोग  –   शशि थरूर

 

            माझ्यासारख्याराजकारण्याला  oximoron म्हणजे विरोधाभास  या अलंकाराच्याउपयोगाचीनीट ओळख असणे फारच आवश्यक आहे. वरवर परस्परविरोधीअसणारे शब्द यात एकत्र योजिलेलेदिसतात. आता हेच वाक्य पहा.

पक्षनेत्याबद्दलची आपली  अविचल निष्ठा शपथपूर्वकप्रकट करत असतानाच आपल्यालाअन्यत्र कुठे अधिक चांगली  संधी लाभते आहे का याकडे त्याची नजर लागून राहिली होती. पण त्याच्या खरोखरीच्या ढोंगाला त्या फसल्या.” (यात खरोखरीचे  ढोंग हा विरोधाभासहोय.)

 

         Oximoron हा शब्द oksus  आणि moros या दोन ग्रीक शब्दांपासूननिर्माण झाला. Oksus म्हणजे टोकदार आणि moros म्हणजे मंदबुद्धी, येडबंबू. अर्थात कोणताही विरोधाभासअलंकार ठरायचा तर दोन विरोधी शब्दांचीमिळून झालेली रचना अर्थपूर्णअसायला हवी. नुसते Black White असे दोन शब्द एकत्र आल्याने काही लोक वाहवा करत दाद देणार नाहीत. पण आपण मि. व्हाईट नावाच्याएखाद्या कृष्णवर्णीयमाणसाबद्दलहे शब्द वापरले तर मात्र तो गमतीशीर विरोधाभासठरेल.

 

         खरं सांगायचंतर विरोधाभासाचावापर आपल्यालावाटतो त्यापेक्षाखूपच जास्त प्रमाणातहोतो. एखादी व्यक्ती एखाद्या अनपेक्षितठिकाणी गेलेली असेल तर अनेकदा आपण तिलाअगदी सहजपणाचादेखावा कर हं  असं सांगतो. Act naturally! आता आपण सहज असलो तर त्याचा देखावा कशाला करावा लागेल? अभिनय करणे आणि नैसर्गिकवागणे हे परस्परविरोधीनाही काय? पण हे दोन्ही शब्द अर्थपूर्णरीत्या एकत्र आणले की झाला विरोधाभास. कितीतरी ज्ञानी वाटणाऱ्यामाणसांनीतुम्हालाएखादे उघडे गुपित ( open secret) सांगितलेलेअसेल. गुपित आहे ते उघडे  कसे बरे? आणि खिडकीतल्या कारकूनाने कितीतरी वेळा तुमच्याकडेमूळ प्रतमागितली असेल. 🙂

किंवा तुम्हाला हव्या असलेल्या सेवेच्या एकूण खर्चाबद्दल बोलताना समोरच्याला एकूण  खर्चाचा  “ नेमका अंदाजसांगा असे तुम्ही  म्हणता. हे सारे विरोधाभास होत. कारण यातला एक शब्द पाहिलात तर तो  दुसऱ्याच्याअगदी विरोधी अर्थाचा आहे आणि तरी  त्या दोन्हींचा मिळून होणारा एकच  अर्थ समोरच्यालानिःसंदिग्धपणेकळतो.

 

      एकदा मी cattle class असा शब्द विमानाच्यासामान्य दर्जाच्याप्रवासासाठीवापरला. राजकारणीआणि माध्यमपटुयांनी त्यावेळीमाझ्यावरएकच हल्लाबोलकेला. माझ्या म्हणण्याचात्यांनी विपर्यस्तअर्थ घेतला होता. शब्द तेच वापरले होते मी पण माझ्या टीकाकारांनावाटला तसा त्यांचा अर्थ नव्हता. एकदा एका निवासी शाळेत हजेरी घेण्यात आली तर एक मुलगी हरवल्याचेआढळले ( found missing).  हा  तसा विरोधाभासहोता पण शालेय प्रशासनाच्यादृष्टीनेतर  ती एक भयावह समस्या होती. (मुलगी हरवली होती. कुठे आहे ते आढळून येणे गरजेचे होते. ) मुलांच्या वसतिगृहात अर्थातच मुलींच्याबद्दल बरंच बोललं जात असतं.   तऱ्हेतऱ्हेचेउथळ शेरे मुलींवर मारले जात असतात. त्यातल्याअनेकांत विरोधाभासदिसून येतो. “ कसली भारी कुब्जा दिसते बघ.” ( pretty ugly) “ काय भयानक सुंदर आहे नाही?”( awfully beautiful)   ती अगदी barely dressed आहे.”  bare की dressed? 🙂  मुली मात्र एव्हढया उथळ नसतात. त्या आपल्या परिचयाच्या मुलांचं वर्णन करताना वेगळ्या प्रकारचे विरोधाभास वापरतात. उदाहरणार्थ एखाद्या चे वर्णन करतानातो  seriously funny आहे.” असे म्हणतात. किंवा मग  तो भयंकर चांगला आहे . ” ( terribly fine )

 

            विरोधाभासाचेस्वरूपच असे आहे की त्याचा उपयोग हलक्या विनोदनिर्मितीसाठीही  केला जातो. प्रत्यक्षात विरोधी नसलेले दोन शब्द एकत्र आणले जातात आणि त्यात विरोधाभास नसताना विनोदनिर्मितीसाठी विरोधाभास असल्याचे भासवले जाते. यात विनोद हाच असतो की प्रत्यक्षात विरोधाभासी  नसताना ती शब्दजोडीतशी मानली जाते. काही ब्रिटिशांनाविचाराल तर अमेरिकन संस्कृतीहा एक विरोधाभासआहे. वदतोव्याघातहा यासाठी योग्य शब्द होईल.  ( अमेरिकेची? ती आणि कसली संस्कृती?) अमेरिका जगभर आपले वजन टाकत  रहायची ना तेव्हा ugly American असा शब्दप्रयोगहोई. त्याकाळातकाही समीक्षक कठोरपणे म्हणत की अमेरिकन डिप्लोमसी( अमेरिकेचीमुत्सद्दीराजनीती) हाही असाच एक विरोधाभासआहे. याला प्रत्त्युत्तरम्हणून बरेच  अमेरिकन मुत्सद्दी United Nations हाच एक विरोधाभासआहे असे म्हणत. ( कारण एकी तर नव्हतीच) स्पेल्लिंग्जauto-correct  होत नव्हती तेव्हा United Nations बऱ्याचदाUntied Nations  ( धरबंध नसलेल्याराष्ट्रांचासमूह) असे छापले जाई! ( typos कधी कधी असे सत्यदर्शीहोतात.)

 

         लष्कराला  सुद्धा विरोधाभास परका नाही. ते लोक friendly fire म्हणतात. आपल्याच सैनिकांचा  यात पाडाव होतो. firing पण friendly! काही छद्म बुद्धिवादीजरा जास्तच आगाऊपणे military intelligence हाचएक वदतोव्याघातआहे असे म्हणतात. प्रामाणिकसैनिकालाकाही विचारच करता येत नाही ही खोटी  प्रतिमा त्यांना दृढ करायची असते. आपल्या देशासाठी शिर तळहातावर घेऊन युद्धावर जातात ते मंदबुद्धीच  असतात असा उपहास त्यांना करायचा असतो. ( मराठीत गुढघ्यातमेंदू म्हणतात. हा उपहास अर्थातच त्याज्य आहे.) पण लष्करी संदर्भातलायाहून वाईट विरोधाभासीशब्द आहे सिव्हिल वॉर. नागरी युद्ध. मला सांगा युद्धाइतकी  uncivil ( असभ्य, असंस्कृत, अनागरी ) गोष्ट दुसरी कोणती असेल? आमचे कित्येक  सैनिक मागतात ना त्या सैनिकी सेवेतून निवृत्तीसाठीअसलेला शब्द मात्र खराखुरा मजेदार विरोधाभासआहे. त्याला म्हणतात active retirement! क्रियाशीलनिवृत्ती!

 

           काही दोषैकदृष्टीचेलोक असे म्हणत असावेत कीप्रामाणिकराजकारणीहाही एक वदतोव्याघातचआहे. यावर  राजकारणी business ethics ( व्यावसायिकनीतिमत्ता) हाच  वदतोव्याघात असल्याचा टोला देतील. शैक्षणिक टेलिव्हिजन या शब्दप्रयोगाला अनेक लोक कायच्या काय नाव म्हणून हसतील.

 

          कॉम्पुटरवापरून वापरून डोकं पिकलेल्यामाणसांनात्यांच्यादैनंदिन अनुभवातीलएखादा विरोधाभासकिंवा वदतोव्याघातसुचवायलासांगून पहा. बरेचजण पटकन म्हणतील, “मायक्रोसॉफ्टवर्क्स” ! तुमच्याकडेचालते का हो मायक्रोसॉफ्ट?

 

                 शशि थरूर

  – (खलिज टाईम्स 15 जुलै 2021)

      भाषांतर : अनंत घोटगाळकर


Discover more from ।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

Subscribe to get the latest posts sent to your email.



Leave a comment