।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन


आर्थिक साक्षरतेसाठी, ‘अर्थ साक्षरता दूत’ ॲप

 

आर्थिक साक्षरतेसाठी, ‘अर्थ साक्षरता दूत’ ॲप 

नाशिक  येथीलमविप्र समाजाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या, तृतीय वर्षीय संगणक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी, अल्परंभा सांस्कृतिक आणि शैक्षणिक फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली  अर्थसाक्षरता दूतहे  मोबाईलअप्लिकेशन विकसित केले आहे.  आपल्यादेशातील अर्थ साक्षरतेचे प्रमाण केवळ २४% इतके अत्यल्प आहे. अनेक नागरिकांना आर्थिक क्षेत्रासंबंधित  मुलभूतज्ञान अवगत नसते.   तेव्हासमाजामध्ये  आर्थिकसाक्षरतेचा प्रसार  व्हावाआणि याविषयी जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देश्याने  हे ॲप विकसित केलेगेले आहे. आत्मनिर्भर भारत या देशाच्या ध्येयाशीसुसंगतता साधणारे हे ॲप, युजर्सनाआर्थिक स्वातंत्र्याच्यादिशेने पाउल उचलण्यास प्रवृत्त करेल  असेआहे.

 याॲपच्या माध्यमातुन  जनसामान्य, महिला वर्ग तसेच किशोरवयीन मुलांच्या   आर्थिकसाक्षरते संबंधित, उपयुक्त विषय, लेखक्षेत्रातीलताज्या घडामोडी, व्हिडिओ यांच्या माध्यमातुन  विविधआर्थिक विषयाचे ज्ञान मिळविता येते. तसेच आपली अर्थ साक्षरता तपासण्यासाठी प्रश्नमंजुषेचाही उपयोग करून घेता येते. समाजातील विशेष करून मुख्य आर्थिक प्रवाहापासून दुर असलेल्या व्यक्तींसाठी, अर्थसाक्षरता दूत  म्हणूनकाम करणाऱ्या स्वयंसेवकांसाठीही हे ॲप उपयुक्तआहेयाद्वारेविविध उपयुक्त सरकारी योजनांची माहिती, असे  स्वयंसेवकजनसामान्यांपर्यंत पोहोचवू शकतात तसेच आपण केलेल्या कामाची नोंदणीही याॲपमध्ये करू शकतात. ॲपमध्ये अर्थ साक्षरतेसंबंधित   इंग्रजीतसेच मराठी भाषेतील लेखही उपलब्ध आहेत.

आपलेसामाजिक दायित्व ओळखून या विद्यार्थ्यांनी ॲप विकसितकेले असून ते लवकरच गुगलप्लेस्टोर वरअर्थ साक्षरता दूतया नावाने उपलब्धहोईल. अल्पारंभ फाउंडेशनतर्फे डॉ. रूपाली कुलकर्णी तसेच महाविद्यालयातर्फे प्राचार्य डॉ. सतीश देवणे आणि प्राध्यापक डॉ. वैशाली तिडके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. यशराज निकम, श्रीकांत डेरे, यश तळेले, हितेशपाटील आणि मीनल मैन याविद्यार्थ्यांनी या प्रकल्पामध्ये सहभागघेतला. देशाच्या ७५व्या  स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधुन  ॲपविषयी महाविद्यालयीन मुलांना त्यासंबधीत  माहिती देण्यात येणार आहे. हे ॲपसमाजातील आर्थिक साक्षरता सुधारण्यास नक्कीच मदत करेल, असा आशावाद सर्वानी व्यक्त केला आहे.


Discover more from ।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

Subscribe to get the latest posts sent to your email.



Leave a comment